पोराचं सोडा शाहरुखच्या बायकोला सुद्धा ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं होतं?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान भले सिनेमांमध्ये जास्त दिसला नसेल पण आता काही दिवसांपासून तो भयंकर चर्चेत आहे कारणच तस आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि आर्यन खानला ताब्यात घेतलं. बॉलिवुड आणि ड्रग्ज कनेक्शन थांबायचं नावचं घेत नसल्याचं दिसून येतंय.

मागच्या दीड वर्षात एनसीबी आणि पोलीस अधिकारी बॉलिवूडमध्ये पसरत चाललेलं जाळं उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक सेलिब्रिटीज जे मादक पदार्थांची नशा करतात अशा लोकांचा पिच्छा पोलीस अधिकारी पुरवत आहेत. पण हे ड्रग्ज प्रकरण बॉलीवूडला काही नवीन नाही याहीआधी बऱ्याच सेलिब्रिटी गँगला पोलिसांनी अटक केली होती. ड्रग्ज स्कँडल काय लोकांना नवीन नाही.

पण आर्यन खानच्या या बातम्यांच्या आणि अटकेच्या रणधुमाळीत एक किस्सा हाती लागला तो तर याहीपेक्षा जबरी आहे. पोराचं सोडा हो शाहरुखची बायको गौरी खानसुद्धा या ड्रग्जच्या प्रकरणात अडकली होती. काय होता किस्सा जाणून घेऊया.

गौरी खानने शाहरुख ची पत्नी म्हणूनच नाही तर एक सेलिब्रिटी इंटेरियर डिझाइनर म्हणून मुंबईत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गौरी व ह्रितिक रोशनची एक्स वाइफ सुझेन खान या दोघीनी एक इंटेरियर डेकोरेटिंग कंपनी स्थापन करून अनेक मोठमोठी कामे हाती घेतली हत्ती. गौरीने वैयक्तिकरित्या  मुकेश अंबानी, राल्फ लॉरेन जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर यांच्यासाठी डिझाईनिंगचं काम केलं आहे.

 गोष्ट आहे सात वर्षांपूर्वीची. 

फॉरेनमध्ये तेव्हा ड्रग्ज प्रकरण तेजीत होतं आणि तेव्हा एअरपोर्ट वर जोरदार चेकिंग केली जात असे. अशीच एक घटना घडली आणि त्यात शाहरुख खानच्या बायकोचं म्हणजे गौरी खानचं नाव आलं तेही औषध/ ड्रग्ज घोटाळ्यात. द फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, गौरी खानला मारिजुआना ताब्यात घेण्यासाठी बर्लिन विमानतळावर पकडण्यात आलं. अशी ती बातमी होती.

यावर बरीच चर्चा झाली आणि असा अहवाल तेव्हा सादर केला गेला की गौरी खान ही ड्रग्ज ऍडीक्ट आहे म्हणून. पण गौरी खानने तेव्हा आपण ड्रग्ज सेवन करत नसल्याचं सांगितलं होतं. आणि ठामपणे रोखठोक बोलून तिने त्या अफवेला उडवून लावलं होतं. 

आपण एक निरोगी जीवन जगतो, ड्रग्जच्या नावाचाही मला तिटकारा असल्याचं गौरी खानने सांगितलं होतं. हा कोणीतरी बदनाम करण्याचा प्लॅन आखल्याचं तिने सांगितलं होतं आणि अशा त्रासाला आपण भीती नाही असं रोखठोक पणे सांगितलं होतं. शाहरुख खान तेव्हा सुपरस्टार होता आणि तेव्हा सेलिब्रिटीच्या लोकांनी असे प्रकार करणे म्हणजे डेंजर काम होतं.

पण पुढे या प्रकरणावर पडदा पडला. या घटनेला सात वर्षे उलटून गेली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. पण खरंच हि अफवा होती का गौरी खान खरोखर बर्लिनमध्ये ड्रग्जसोबत बर्लिनमध्ये सापडली होती याबद्दल कधी खुलासा समोर आलाच नाही. बॉलिवूडला ड्रग्जच्या संस्कृतीने व्यापलं आहे असं म्हणतात. नुकताच आर्यन खानला मुंबई गोवा क्रूझमध्ये पकडण्यात आलं आणि गौरीबद्दलची तेव्हाची फ्री प्रेस मधली बातमी पुन्हा चर्चेत आली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.