हार्मोनियमवाला अब्बा सुषमा स्वराज आणि मुशर्रफ दोघांचा लाडका होता

सुषमा स्वराज म्हणजे भारताच्या रणरागिणी. त्यांचा ज्यांनी नाद केला त्या सगळ्यांचा रीतसर बाजार उठला. त्यामुळे की काय त्यांच्यावर विनोद करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं.

त्यांचा खाक्याच असा होता की त्यांच्या भयाने सगळे कॉमेडीयन त्यांच्यापासून दूर राहायचे. देशामध्ये सगळेजण त्यांना घाबरत होतेच, पण एक परराष्ट्र मंत्री म्हणूनही भारताच्या शेजारच्या देशांमध्ये त्यांची इमेज कडक शिस्तीच्या बाणेदार नेत्या अशीच झाली होती.

पण पाकिस्तान मधला एक बहाद्दर कॉमेडियन यांच्यावरती विनोद करतो. त्यांच्या सारखी साडी घालतो. त्यांच्या गालावरून जोक करतो आणि इतकच नाही तर सुषमा स्वराज त्याला फोन करून दाद देतात! रागवणे तर सोडाच पण त्याच्या अभिनयाची आणि विनोदाची प्रशंसा करतात…

असा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा अन आपल्याकडे हार्मोनियमवाला अब्बा म्हणून फेमस झालेला दर्दी कलाकार म्हणजे मोईन अअख्तर!

2019 झाली भारत आणि पाकिस्तान मध्ये अचानक प्रसिद्धी पावलेल्या हार्मोनियम वाल्या बाबाचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला यात अब्बा झालेला तो माणूस म्हणजे मोईन अखतर साहब. पाकिस्तानच्या ज्या थोड्याशा लोकांना भारतात लोकांनी मनापासून जीव लावला त्यांच्यामध्ये मोईन साहेबांचा वरचा नंबर लागतो.

अख्तर यांचा जन्म 24 डिसेंबर 1950 रोजी पाकिस्तानमध्ये कराची येथे झाला. त्यांचे वडील उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद शहरातील होते. फाळणीनंतर ते तिकडे गेले.

अख्तरला पाकिस्तानच्या बहुरंगी संस्कृतीचा फार आकर्षण होतं. त्यामुळे त्यांनी इंग्रजी, बंगाली, हिंदी, मेमोनी, सिंधी, अदिवासी समाजाची पश्तो, गुजराती आणि उर्दू या भाषांवर त्यांनी एकहाती प्रभुत्व मिळवले.

वयाच्या 13व्या वर्षापासूनच त्यांनी नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली.

त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती रोजी या नाटकानंतर या नाटकांमध्ये मोहन अख्तर यांनी एका महिलेचा रोल केला होता. हे नाटक या हॉलीवुड चित्रपटावरून बसवलं गेलं होतं. या नाटकाने त्यांना ओळख मिळवून दिली.

या नाटकामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली 2005 झाली त्यांचे मित्र आणि पाकिस्तानच्या मोठ्या फिलिं मध्ये संयोजन करणारे अन्वर मसूद यांच्याकडे एका कार्यक्रमाचा प्रस्ताव घेऊन आले याचं लेखनही मसूर साहेबांनी केलं होतं प्रत्येक एपिसोडमध्ये मोहितकर यांना वेगवेगळे रोल करायचे होते मसूद साहेब प्रश्न विचारतील तर साहेब त्याला उत्तर देतील असं या कार्यक्रमाचं स्वरूप होतं

या कार्यक्रमाला बीबीसीच्या एका जुन्या कार्यक्रमावरून त्यांनी लूज टॉक असं नाव दिलं. भारत आणि पाकिस्तान मधील अनेक व्यक्तींची तसेच क्रिकेटपटूंची सोंगे त्यांनी  हुबेहूब वठवली.

गाय्नाठी त्यांनी आपलं नाव गाजवलं. त्यांचि अनेक गाणी आणि अल्बम्स पाकिस्तानमध्ये आजही लोकप्रिय आहेत.

हा शो एवढा प्रचंड गाजला की आजही त्याचे नाव भारत आणि पाकिस्तानच्या टीव्ही इतिहासामधील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये घेतले जाते. या शोमध्ये ज्या लोकांची नक्कल केली जाईल त्यांच्या लोकप्रियतेला भरती येई.

पाकिस्तानचे तेव्हाचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनीही आपण या शोचे फॅन असल्याचे मान्य केले होते. नुकत्याच भारतात झालेल्या सीएए एनआरसी आंदोलनाच्या दरम्यान त्यांच्या डायलॉग वरून अनेक पोस्टर्स बनवण्यात आली होती इतकी प्रचंड लोकप्रियता क्वचितच कोणाला मिळाली असेल त्यांनी पाठवलेली सद्दाम हुसेन यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली.

त्यांनी मनमोहनसिंग यांच्यावर केलेला एपिसोड तर प्रचंड लोकप्रिय झाला. पाकिस्तानात मनमोहन सिंग अजून प्रसिद्ध असण्याचं हे एक कारण मानलं जातं.

पाकिस्तानमध्ये स्टँड अप कॉमेडी सुरू करणारे आणि त्याला लोकांमध्ये लोकप्रिय करणारे म्हणून मोइन  यांचं नाव घेतलं जातं. उर्दू कॉमेडी मध्ये त्यांनी एवढा हातखंडा मिळवला की त्यांना अनेक बाहेरच्या देशांमधूनही बोलवण्यात यायला सुरुवात झाली.

आपल्याकडच्या कोण बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या पाकिस्तानी वर्जन मध्ये ‘क्या आप बनेंगे करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करण्याची संधी त्यांना मिळाली या कार्यक्रमाबद्दल लता मंगेशकर माधुरी दीक्षित दिलीप कुमार यांनी सहभाग घेतला होता.

22 एप्रिल 2011 रोजी यांचे कराचीमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले यावेळी अनेक बॉलीवूड अभिनेते आणि कलाकार यांनी शोक व्यक्त केला होता.

त्यांच्या मृत्यूनंतर लंडनच्या सुप्रसिद्ध ‘मादाम तुसा’ संग्रहालयामध्ये त्यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे अशी घोषणा स्वतः संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. असे झाल्यास ते ‘मादाम तुसा’ संग्रहालयामध्ये पुतळा असणारे पाकिस्तानचे पहिले कॉमेडीयन ठरतील.

पाकिस्तान सरकारने त्यांना त्यांच्या इकडचा पद्मभूषण म्हणजे सितारा-ए-इम्तियाज हा किताब दिला आहे. या कलाकारावर सीमेच्या अडयाल आणि पल्याडच्या जनतेने भरभरून प्रेम केलं. वयाच्या १६ व्या वर्षापासून हा माणूस लोकांना हसवत राहिला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.