मराठवाड्याला आधी दुष्काळानं मारलं, आता अतिवृष्टीने झोडपलयं.

विदर्भ, मराठवाडा म्हणलं कि आपल्याला कोरडाठाक दुष्काळ नजरेसमोर दिसतो. सतत या  भागांमधून अनेकदा दुष्काळ आणि पाणीटंचाईच्याच तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. पण अलिकडे या भागांमध्येही होणारी अतिवृष्टी, पूर अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत.  मराठवाडा तसंच विदर्भात अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.

ज्या मराठवाड्यामधून नेहेमी दुष्काळाच्याच बातम्या येतात त्या मराठवाड्यामधून आता ढगफुटीच्या, पुराच्या बातम्या वाढत चालल्या आहेत. एका पावसात सगळीकडे नुकसानच नुकसान वाढते.  सद्या असाच पाऊस चालू आहे. 

गेल्या २-३ दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचे थैमान चालू आहे. जोराच्या पावसाने शेतावरची माती पूर्णपणे निघून गेली आहे आणि गोटे येऊन पडलेले आहेत. अनेक गावांमध्ये पाच-पाच सहा-सहा फूट जमीन वाहून गेली आहे. खरीप आणि रब्बी पिकाचं नुकसान झालं आहे .

मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद जिल्यात मोठा पाऊस झाला आहे.  

२ दिवसात ३१ जणांचा बळी तर ५ जण बेपत्ता आहेत. ३ लाख हेक्टर शेतजमिनीमधील पिकाचं नुकसान झालं.

तर हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर होता. या जिल्ह्यातील जवळपास  मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यातल्या त्यात नांदेड, हिंगोलीला पावसाने अक्षरश: झोडपून काढलेय.

औरंगाबाद – शहरात काल रात्री एका तासाच्या ढगफुटीने हाहाकार उडाला आहे. शेकडो घरे, दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी धावा घेतला. एक तास अग्निशमन विभागाचे फोन खणखणत होते. त्यानंतर रात्रभर अग्निशमन विभागाच्या जवानांनी धाव घेत २५ ठिकाणी तळमजला व घरात शिरलेले पाणी उपसून काढले.  दिवसभर मदतकार्य सुरूच होते, असे अग्निशमन विभागाने माहिती

पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांना वेळच मिळाला नाही. घाबरलेल्या नागरिकांनी अग्निशमन विभागाकडे मदतीसाठी याचना सुरू झाली. तासभर फोन खणखणत असल्याने अग्निशमन विभागही गोंधळून गेला होता.

गंगापूर तालुक्यातील शिरस गावात पुरामुळे एका गावातील विहिर वाहून गेल्याची घटना घडली आहे.

नांदेड – जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, नायगाव तालुक्यातील ८० मंडळात अतिवृष्टीसह जोरदार पाऊस झाला आहे. सोमवार पासून सलग पाऊस चालू आहे.  जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्पातून ९५ हजार २०८ क्युसेक विसर्ग झाला असून धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. हा आकडा अजूनही वाढू शकतो याची शक्यता आहे.

किनवट –  दोन दिवसापासून किनवट -नांदेड राष्ट्रीय महा मार्ग बंद झाला आहे . हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला असुन त्याप्रमाणे अती पाऊस झाल्यास शेतातील पिकांचे मोठे नुकसान होईल भीतीने शेतकरी धास्तावला आहे. काही खेड्यांचा तालुक्याचा संपर्क तुटला आहे .तसेच किनवट – नांदेड राष्ट्रीय महामार्ग वरील बांधकाम चालू असलेल्या पुला जवळील पयार्यी रस्ता वाहून गेला आहे.

इसापूर धरण ९० टक्के भरलं असून विष्णूपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

अर्धापूर तालुक्यातील्या मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यातील अनेक गावात पावसाचे पाणी शिरले असून तेथील गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहेआता काढणीला आलेल्या  सोयाबीनचं पीक पाण्याखाली गेल्यामुळं हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे.

अर्धापूर महसूल मंडळात १२३ मिमीची नोंद

बीड -जिल्ह्यातील माजलगाव, बिंदुसरा धरण १०० टक्के भरली आहेत, माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले. दुधना नदीसह लाभक्षेत्रातील नद्या-ओढ्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला, शेतांमध्ये पाणी शिरले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे.

बुलढाणा- बुलढाणा शहर व तेरा गावना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरणाचे १० दरवाजे स्वयंचलित गोडबोले गेट उघडल्याने पाणी संकट दूर झाले. पडलेल्या संततधार पावसाने धरण १०० टक्के भरले आहे.

अमरावती – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची अतिवृष्टी झाल्याने अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. तसेच तिवसा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. निर्माण झालेल्या परिस्थिती सांभाळत  बचाव पथक आज सकाळापासूनच अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

वर्धा – जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सूरू असून प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पहाटेपासून या धरणाचे एकूण १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

प्रकल्पातून २१३८ घनमीटर प्रतीसेकंद विसर्ग सुरू आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आला आहे.  धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच याठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे..

बुलढाणा- बुलढाणा शहर व तेरा गावना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरणाचे १० दरवाजे स्वयंचलित  उघडल्याने हे धरण १०० टक्के भरले आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर, नायगाव तालुक्यातील ८० मंडळात अतिवृष्टी सह जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी जनतेतून होत  आहे. लोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पुलावरून पाणी जात असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यासाठी नागरिक अडकले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.