या दोन फोटोतला फरक माहित आहे का ?

हेमा मालिनी आणि इंदिरा गांधी. तुलना करण्याचा प्रश्नच येवू शकत नाही. मात्र सध्या हेमा मालिनी आणि इंदिरा गांधी यांच्या फोटोंची तुलना चालू आहे. 

झालं अस की हेमा मालिनी मथुरा लोकसभा मतदार संघातून उभा आहेत. प्रचारादरम्यान त्यांनी मथुरेच्या ग्रामीण भागाला भेट दिली. त्यानंतर शेतात काम करणाऱ्या महिलांसोबत फोटो काढले. स्वत: हातात गव्हाची पेंडी घेवून फोटो काढला. हे फोटो सोशल मिडीयावर शेअर करण्यात आले आणि लोकांनी टिका करण्यास सुरवात केली. निवडणुकांच्या प्रचारदरम्यान करण्यात येणारी “नाटकी” म्हणून या फोटोंकडे पाहण्यात आलं. हेमा मालिनी यांनी शेतकरी, ग्रामिण महिला यांच्यासाठी नेमकी कोणती विकासकामे केली असे प्रश्न लोकांकडून विचारण्यात आले. 

यावर उत्तर देताना हेमामालिनी मथुरा लोकसभा मतदार संघात एक खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कामांची यादी सोशल मिडीयावर दिली. विशेष म्हणजे या यादीत शेती, शेतकरी व ग्रामीण महिला यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कोणत्याच विकासकामांचा उल्लेख नव्हता.

स्वत: हेमा मालिनी यांनी या फोटोंबद्दल स्पष्टीकरण दिलं त्या म्हणाल्या, 

मुंबईमध्ये असं वातावरण नसतं, प्रचारासाठी गावागावात गेल्यानंतर तिथे अस वातावरण मिळतं. मी एक अभिनेत्री आहे. शेतात काम करण्याची मी एक्टिंग जरी केली असली तरी मज्जा आली त्यात वाईट काय आहे. 

थोडक्यात स्वत: हेमामालिनी हि एक्टिंग होती हे मान्य करतात. मात्र त्या अभिनेत्री म्हणून नाही तर खासदार म्हणून लोकांशी असणारी बांधिलकी विसरतात. 

हेमामालिनी यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर नसल्याने भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधीचे फोटो व्हायरल करण्यात आले. या फोटोमध्ये इंदिरा गांधी देखील हातात गव्हाची पेंडी घेवून उभा आहेत. दोन्ही फोटोंचा आधार घेवून भाजप कार्यकर्त्यांकडून हेमा मालिनी यांनी केले ते नाटक आणि इंदिरा गांधी काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 

Screenshot 2019 04 12 at 2.02.02 PM

या प्रश्नासाठी आपण हा फोटो कुठला ते पहावं लागतं आणि मुळात या दोन फोटोंमागे कोणते उद्देश होते ते पहाव लागतं. 

त्यासाठी थोडा इतिहास पहावा लागतो. 

भारतात साठ आणि सत्तरच दशक हे हरित क्रांन्तीच दशक म्हणून ओळखल जातं. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला अन्नधान्यात स्वयंपुर्ण करण्याच्या दिशेने पाऊले टाकली होती. शेतीतील संशोधनासोबत वेगवेगळ्या संकरित जातीविषयी संशोधन चालू होते. लाल बहादूरशास्री यांनी जय जवान जय किसान चा नारा देत कृषी क्रांन्तीला पुढे घेवून जाण्याचा संकल्प केला होता. त्याचाच परिणाम म्हणून १९६४ साली भारतामध्ये गव्हाचे उत्पादन १२० लाख टन इतक्या उच्चांकावर पोहचलं होतं.

या दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांच्या अकस्मात मृत्यूनंतर इंदिरा गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यांच्या काळात म्हणजे १९६८ साली गव्हाचे उत्पादन १७० लाख टन इतक्या उच्चांकाला पोहचले होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी गव्हाच्या क्रांन्तीची घोषणा केली. जगभरातून अन्नधान्याच्या उत्पादनात भारताने केलेली कामगिरी पाहून कौतुक होत होतं. १९६८ साली अमेरिकेचे कृषीतज्ञ विलियन गुआड यांनी याच क्रांन्तीला हरित क्रांन्ती अस नाव दिलं. 

सन १९६८ ते १९७३ या कालावधीत सरकारमार्फत शेतीमध्ये केली जाणारी गुंतवणूक दुप्पट करण्यात आली. कमी किंमतीत शेती कर्ज उपलब्ध करुन देणे, शेतीपुरक उद्योगांना वित्तपुरवठा करणे, किमान हमीभाव देणे यांसारखे निर्णय याच कालावधीत घेण्यात आले. याच कालावधीत एम.एस. स्वामीनाथन यांच्या पुढाकारातून गव्हासोबत इतर अन्नधान्याच्या संकरीत जाती निर्माण करण्यात येत होत्या. 

१९६४ ते १९७० च्या काळावधीत अन्नधान्याच्या उत्पादनात ३७ टक्यांची वाढ झाली होती. १९६६ साली   असणारी अन्नधान्याची आयात १ करोड तीन लाख टनांवरुन १९७० साली ३६ लाख टनांपर्यन्त आली होती. पुढे १९८० च्या दरम्यान भारताकडे ३० लाख टन अन्नधान्य राखीव होते व भारत पुर्णपणे अन्नधान्यावर आत्मनिर्भर झालेला होता. हे निर्णय इंदिरा गांधींच्या कालावधीत घेतले होते हे कोणिही नाकारू शकत नाही. 

आत्ता मुद्दा येतो हा फोटो कोणता ? 

तर जेष्ठ पत्रकार अद्वैत बहुगणा आपल्या फेसबुकवरील पोस्टबद्दल याबद्दल अधिक माहिती देतात ते म्हणतात, २७ एप्रिल १९७० रोजी स्वामीनाथन यांच्या प्रयत्नातून भारतात गव्हाची जी सुधारीत जात सर्वात पहिल्यांदा कापण्यात आली त्या प्रसंगाचा हा फोटो आहे.   

Screenshot 2019 04 12 at 2.03.47 PM

माहिती : सत्याग्रह.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.