युपीचा एन्काउंटर पॅटर्न राबवून हेमंता बिस्वा योगींच्या पावलांवर पाऊल ठेवतायत..

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हयरल होतोय. जो आसामच्या दरांग भागातला असल्याचं म्हंटलं जातयं. लुंगी आणि बनियान घातलेला एक ग्रामस्थ दांडकं घेऊन पोलिसांच्या दिशेने धावतो.  यांनतर पोलीस त्याला गोळ्या घालून त्याच्यावर लाठ्यांचा मारा करतात. एवढंच नाही या पोलिसांसोबत असलेला फोटोग्राफर सुद्धा पोलिसांच्या समोरचं त्या अर्धमेल्या व्यक्तीच्या अंगावर उड्या मारतो, त्याच्या शरीराला पायाने तुडवतो.  आसाम पोलिस आणि कॅमेरामनची क्रूर वागणूक बघून तुम्ही सुद्धा हँग पडाल.

हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आसाम पोलीस तसेच मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा याचं भाजप सरकार आता टार्गेट बनलंय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॅमेरामनला अटक करण्यात आली. त्याचबरोबर आसाम सरकारने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

आता याबाबत पोलिसांचं स्पष्टीकरण सांगायचं झालं तर,

आसाम पोलिसांनी दरांगच्या परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम सुरू केली. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत आतापर्यंत ८०० कुटुंबांना इथून काढण्यात आलं. याच दरम्यान गुरुवारी झालेल्या चकमकीत दोन नागरिक ठार झाले, तर नऊ पोलीस कर्मचारी जखमी झाले. ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि हवेत  गोळीबार केला. बेकायदा अतिक्रमण करून लोक येथे राहत असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला. त्यापैकी बहुतेक बांगलादेशी घुसघोर असल्याचे सांगितले जाते.

घटनेनंतर लोकांमध्ये पोलिसांविरोधात नाराजी वाढली. घटना पाहता काही सामाजिक आणि राजकीय संघटनांनी आज बंदची हाक दिली आहे. संघटनांनी दरांग १२ तास बंद ठेवण्याची घोषणा केली.

टीकाकार आणि संघटनांनी म्हंटले की, धोलपूर गावातील या व्हिडिओने राज्य पोलिसांचा नवा निर्दयी चेहरा उघड केला आहे. काही महिन्यापूर्वी जेव्हा सरमा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी गुन्हेगारी संपवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांचं हे आश्वसन ते कोणत्या पद्धतीने पूर्व करतायेत हे दिसून येतंय. आसाम पोलीस बाती- बातीला गोळीबार करतंय.

आता या संघटनांनी या गोष्टीचा पुरावा म्हणून मे महिन्याच्या सुरुवातीपासून पोलिसांच्या गोळीबारात मारल्या गेलेल्या सुमारे दोन डझन लोकांचा हवाला दिलाय.

यात सांगितल्याप्रमाणं,जुलै महिन्यात आणखी एक संशयित डाकू पोलिस चकमकीत ठार झाला. त्याच सुमारास, कथित गुरंढोराच्या तस्करालाही पायात गोळी लागली, जेव्हा तो पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

ऑगस्टमध्येच २४ तासांच्या आत दोन घटनांमध्ये, दोन कथित गुन्हेगारांना गोळ्या घालून जखमी केले गेले. यातला एक जण दरोडा, अंमली पदार्थांची तस्करी आणि जमीन हडपल्याचा कामात असल्याचा संशय होता. त्याला पोलिसांच्या प्रत्यत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गोळी मारण्यात आली. आणि यातला दुसरा जो हफ्ता वसुली आणि अपहरणाचा संशयित आरोपी होता, तो कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. दोघांच्या पायात गोळ्या लागल्या होत्या. 

२८ ऑगस्टच्या रात्री गोलपारा येथे आसाम पोलिसांनी आणखी एक कथित गोळीबार केल्यानंतर दोन संशयित डाकूंना ठार केले. याच महिन्यात तीन संशयित दरोडेखोर एका बँकेवर दरोडा टाकण्याच्या मार्गावर असताना ठार झाले.

त्यांनतर १२ सप्टेंबरला धुबरी येथे एका संशयित डाकूवर गोळीबार करण्यात आला.  ज्याचा अनेक प्रकरणांमध्ये कथितपणे शोध सुरु होता. त्यानंतर काही दिवसांतचं, १८ सप्टेंबरला आसाम पोलिसांनी कोकराझारमध्ये कथित गोळीबारानंतर दोन संशयित अतिरेक्यांना ठार केले.

आसाम पोलिसांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, १० मे ते २७ सप्टेंबर दरम्यान चकमकीच्या ५० घटना घडल्या आहेत, ज्यात २७ लोक ठार झाले आणि ४० जखमी झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा  सरमा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांच्या पायांवर पोलिसांच्या गोळीबाराचे समर्थन केले आहे. काही टीकाकारांनी या प्रकरणात आसामची तुलना उत्तर प्रदेशचे समकक्ष योगी आदित्यनाथ यांच्याशी केली. ज्यांच्यावर अनेक चकमकीचे आरोप आहेत.

 उत्तर प्रदेश सरकारची गुन्हेगारी विरुद्ध कारवाई देशभरात चर्चित आहे. आता आसाम सरकारही उत्तर प्रदेशाच्या पावलांवर पाऊल ठेवत असल्याचा आरोप केला जातोय. 

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.