गावात पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्ष आलेला पण बायका पदर खाली घ्यायला तयार नव्हत्या…

आग्र्यातलं ताजमहाल अख्ख्या जगात फेमस आहे. म्हणूनचं जगातल्या ७ आश्चर्यात आग्र्याच्या ताजमहालचा समावेश होतो. भारतातल्या पर्यटकांनी या महालाचा परिसर कायम गजबजलेला असतोचं, पण विदेशातला कोणताही पर्यटक आधी हा आग्र्यातला ताजमहाल पाहतो. आणि फक्त पर्यटकचं नाही तर अनेक देशांचे पंतप्रधान- राष्ट्राध्यक्ष सुद्धा भारताला आल्यावर या ऐतिहासिक ताजमहालला आवर्जून भेट देतातचं.

अश्याच आपल्या १९५९ च्या भारत दौऱ्यावर अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड आयसेनहॉवर ताजमहालला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान होते.

आता ही एकप्रकारची परंपराच आहे कि, जेव्हा कधी आपल्या देशात एखादे विदेशी नेतृत्व पाहुणे म्हणून येतं, तेव्हा त्यांच्या प्रवासाचा मार्ग, तिथला परिसर एकदम चकचकीत  केला जातो. याच साखळीत जेव्हा डेव्हिड आयसेनहॉवर ताजमहालला भेट देण्यासाठी येत होते, तेव्हा तिथून जवळपास ९ किलोमीटर अंतरावर असणार लरामदा गाव २  महिन्यांच्या आत हायटेक बनवलं गेलं होतं. 

नेहरू आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी खुल्या जीपमध्ये गावाचा दौरा केला. इथे दोघांनीही ग्रामीण वातावरण जवळून पहिले. या दरम्यान गावातील महिलांशी चर्चा केली गेली. नेहरूंनी जेव्हा त्यांना डोक्यावर मोठालाट पदर घेतलेलं पाहिलं तेव्हा विचारलं कि, “या सगळ्यांची काय गरज, मी तुमच्या वडिलांसारखा आहे. मोकळ्या मनाने बोला.”

१३ डिसेंबर १९५९ रोजी गावकऱ्यांना भेटल्यानंतर डेव्हिड आयसेनहॉवर म्हणाले होते की,

मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. जेव्हा मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो तेव्हा मी माझ्या गावात असतो आणि मातीच्या जवळ असतो. आज, जेव्हा मी इथे आलो आहे, तेव्हा मी शेतकऱ्यांचे दुःख, अडचणीव समजू शकलोयं.

खरं तर, पंतप्रधान नेहरू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आग्रामधला ताजमहाल पाहण्यापूर्वी. त्यांचा एका गावाला भेटण्याचा प्लॅन होता. त्यामुळे दोन महिन्यांत कोणत्या गावाला हायटेक बनवायचं, ही अडचण प्रशासनासमोर होती. त्यासाठी प्रमुखांची खुली बैठक बोलावली होती. ज्यामध्ये खुलेपणाने विचारण्यात आले की, कोणता गाव प्रमुख निर्धारित वेळेत आपले गाव हायटेक करेल.

यावर लरामदाचे तत्कालीन प्रधान, करण सिंह आणि त्याचा भाऊ टिकम सिंह सरपंच यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एक आदर्श गाव बनवलं. यासाठी गावात पंचायत घर बांधलं गेलं. तलावामध्ये बदकं सोडण्यात आली. २ शाळा उभारण्यात आल्या. शौचालयं बांधली गेली आणि संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आली. 

या दौऱ्यावर जेव्हा पंडित नेहरूंसोबत अमेरिकेचे अध्यक्ष खुल्या जीपमध्ये गावाच्या मेन गेटवर उतरले. तेव्हा ते चालत सगळ्यात आधी गावच्या प्रधानाच्या घरी गेले आणि नंतर पंचायत भवनात गेले. घराबाहेर गावाच्या लेकी- सुनांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे टिळा, आरती आणि पुष्पहार घालून स्वागत केले. या दरम्यान, घरातील महिलांनी मोठा पदर आपल्या डोक्यावर घेऊन चेहरा लपवला होता.

यावर अमेरिकेचे अध्यक्ष आयझेनहॉवर  यांनी पंतप्रधान नेहरूंना विचारले, या सर्वांनी पदर का घेतलाय? नेहरूंनी विचारल्यावर महिलांनी सांगितले, ‘आम्ही आमचा भाऊ, पती, वडील आणि मुलगा वगळता कोणत्याही वयस्कर लोकांना आपला चेहरा दाखवत नाही. मग नेहरू म्हणाले- तुम्ही आम्हाला तुमचे वडीलचं माना. यानंतर महिलांनी त्यांना आपला चेहरा दाखवला.

तिथल्या गावकऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले तेव्हा सगळता गावात उत्साहाचे वातावरण होते, शहरात आनंदाचे वातावरण होते. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर गावात मोठी प्रगती झाली आणि लोक जागरूक झाले. आमच्या गावात अनेक प्रकारच्या सुविधा आहेत ज्या इतर कोणत्याही गावात क्वचितच पाहायला मिळतील.

जसं कि,  या गावात जलसंधारण, प्राथमिक शाळा, तलाव आणि संपूर्ण गावात पाणीपुरवठ्यासाठी पाईप लाईन जोडली गेली. पाण्याच्या टाक्या आहेत. २४ तास वीज आणि दोन ट्यूबवेल सुद्धा आहेत. ७५ टक्के गावे सुशिक्षित आहेत आणि ९५ टक्के पक्की घरं आहेत.

आता अश्याच सोयीसुविधा प्रत्येक गावात व्हायला पाहिजे. बाहेरच्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी नाही तर आपल्याच गावकऱ्यांच्या सुविधेसाठी.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.