हजारो ज्यूंची निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्माचं ८० वर्षांनी थडगं फोडून टाकण्यात आलं होतं…

हुकूमशहा म्हटलं की जर्मनीचा अडॉल्फ हिटलर प्रत्येकालाचं आठवतो. त्याच्या क्रृरतेचे अनेक किस्से आजही चर्चीले जातात. हिटलर आणि त्याच्या नाझींनी दुसऱ्या महायुद्धात प्रचंड अत्याचार केले ज्याला लाखो लोकं बळी पडली. त्यातीलच एक समाज होता ज्यू समाज.

खरं तर ज्यू समाज हा व्यापारात चलाख असलेला समाज होता. ज्याप्रमाणे भारतात गुजराती-मारवाडी समाजाचा व्यापारात  हात  मानला जातो त्याचप्रमाणे जर्मनीत  ज्यू समूदाय व्यापारात डोकं असलेला समाज होता.

या समुदायाची व्यापार साखळी वाढतचं चालली होती. ते काय हिटलरला पटलं नाही. यासाठी त्याच्या नाझी जर्मन पार्टीने 1933 ते 1945 दरम्यान  जवळपास 44,000 कॅम्प्स बांधले. या कॅम्प्सचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जायचा.

यातलचं एक कारण होतं जर्मनीच्या शत्रूंचा छळ. या कॅम्पमध्ये एकाचवेळी हजारो लोकांचा जीव घेतला जायचा.

1943 मध्ये दुसऱ्या महा युद्धादरम्यान हिटलरच्या या नाझी पक्षाकडून भयंकर नरसंहार करण्यात आला. 3 आणि 4 नोव्हेंबर 1943 मध्ये ऑपरेशन हारवेस्ट फेस्टिवलमध्ये माज्देनेक, पोन्तातोवा आणि त्राव्निकी कॅम्पातील जवळपास 40 ते 45 हजार ज्यू लोकांची त्यांनी हत्या केली होती. याचं कारण त्यांनी या हुकूमशहा विरुद्ध केलेला उठाव असल्याचं सुद्धा म्हंटलं गेलं.

2 नोव्हेंबरला नाझी सैनिकांनी ऑपरेशनची योजना बनवली. ज्यू कैद्यांना दुसऱ्या कैद्यांपासून वेगळे करण्यात आलं आणि एका दिवसात 18,400 ज्यू लोकांना गोळ्या मारण्यात आल्या. तसचं त्राव्निकी कॅम्पमध्ये 6000 लोकांची हत्या करण्यात आली. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी पोन्यातोवा कॅम्पमधील 14,500 ज्यूंना गोळ्या मारण्यात आल्या.

हुकूमशहानं या ज्यू लोकांना इतकी क्रूर वागणूक दिली की, मरताना सुद्धा त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या सगळ्या कॅम्पात त्यांना निर्वस्त्र करण्यात आलं, तिथं  जोरजोरात गाणी वाजवण्यात आली, जेणेकरून गोळ्यांचा आवाज आणि कैद्यांचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाणार नाही.  दोन दिवसात जवळपास 45 हजार ज्यू लोकांचा जीव घेण्यात आला होता. 

ऑपरेशन हारवेस्ट फेस्टिवलला हिटलरच्या नाझी सैन्याचे सर्वात खतरनाक ऑपरेशन म्हंटलं जातं. ज्यामूळे माज्देनेकमध्ये 3 नोव्हेंबर हा दिवस ‘ ब्लॅक डे’ म्हणून पाळला जातो.

राइनहार्ट हायड्रिख हा या ऑपरेशनचा प्रमुख होता.  जो हिटलरचा नाझी सैन्यातला सर्वात जवळचा अधिकारी मानला जायचा. ज्यूंसाठी उभारण्यात आलेल्या या कॅम्पाच्या नियोजनात त्याची मुख्य भूमिका होती.

हायड्रिख ‘the Butcher  म्हणजेच खाटीक हे टोपणनाव होतं. तो राईश मेन सिक्युरिटी ऑफिस’चं नेतृत्व करायचा.

ब्रिटिशांनी प्रशिक्षित केलेल्या चेक बंडखोरांनी त्याच्या लिमोझिनवर हल्ला केला होता, ज्यात तो जखमी झाला. आणि उपचार सुरू असतानाचं त्याचा मृत्यू झाला. चेकोस्लोव्हाकियाच्या समर्थकांनी त्याची हत्या केल्याचं म्हंटलं जातं.

त्याच्या मृत्यूनंतर बिथरलेल्या नाझींनी लिडित्स हे चेक रिपब्लिकमधलं अख्खं गावच उद्ध्वस्त केलं. गावातील सगळ्या पुरुष आणि तरुणांना मारून टाकण्यात आलं, तर महिला आणि लहान मुलांना या कॅम्पात नेण्यात आलं.

काही वर्षांपूर्वी २०१७ साली सेंट्रल बर्लिनमधील इनव्हॅलीड दफनभूमीमधलं हायड्रिखचं थडगं फोडल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी या प्रकरणानं मोठा पेट घेतला होता. नाझी वादावर , ज्यूंवर झालेल्या अत्याचारावर भडकलेल्या काही तरुणांनी हे कृत्य केलं असल्याची शक्यता बोलली गेली.

मात्र जर्मनीतील कायद्यामध्ये कोणाच्याही थडग्याशी छेडछाड करणं हा गुन्हा समजला जातो.

याआधी सुद्धा बर्लिनमधील निकोलाय दफनभूमीमधलं होर्स्ट वेसेल या नाझी अधिकाऱ्याचं थडगं उघडलं होतं.  डाव्या विचारांच्या एका गटानं हे कृत्य केल्याचं  म्हंटलं गेलं.

1930 साली या अधिकाऱ्याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर त्याला शहीद असा दर्जा देऊन नाझी राष्ट्रगीताचा सन्मान देऊन दफन केलं गेलं.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.