टिक टॉकच्या व्हिडीओवरुन पैसे कमवता येतात, पण कसे काय ? 

अय अय पोरांना आणि त्यांच्या बापांनो पोरगं काय करितं अय, टिक टॉक्क करित महाराज…

टिक्क टॉक्क…

इंदोरीकर महाराज्यांच्या शब्दिक बाणातून देखील टिक टॉक सुटलेलं नाही. काय करतय कुणास ठावून दिवसभर कसल्या कसल्या आवाजाचं व्हिडीओ करत असतय इतकच आईबापाला माहित असताय पण आत्ता तस राहिलं नाही महाराज. आत्ता आई बाप, आज्जा आज्जी सुद्धा टिक टॉकवर धुरळा करायला लागल्यात. १५ सेकंदात जादू बघा सारखा कार्यक्रम झालाय महाराज. नुसता राडा. 

असो,

तर टिक टॉक माहित नसणाऱ्या काही अबला मराठी वाचकांना आधी टिकटॉक म्हणजे काय ते विस्कटून सांगतो.

टिकटॉक म्हणजे व्हिडीओ पहा, व्हिडीओ करा. इथं पंधरा सेकंदापर्यन्त व्हिडीओ करायचे. त्यात स्वत:चा आवाज नसतो, आवाज गावचा उधार घ्यायला लागतो. म्हणजे पाठीमागं इंदोरीकर महाराजांचा डायलॉग आणि पुढं हे गावातलं पोरगं. शांताबाई पासून भाऊ कदम, बच्चन पासून अजय देवगण पर्यन्त जे काही असेल त्यांच खास इरसाल डायलॉग आणि त्यांच्या सोबत या आपल्या पोरा पोरींचे, आईबापाचे, आज्जा आज्जीचे व्हिडीओ. 

आत्ता तिथं हे असले व्हिडीओ पहायला येणारे पण असतात आणि असे व्हिडीओ करणारे देखील असतात. म्हणजे बघायचं असलं तर फक्त बघा नसलं बघायचं तर जत्रेत सहभागी व्हा. आत्ता भारताबद्दल आकडेवारी सांगायची झाली भारतात दोन कोटी एॅक्टिव्ह युझर आहेत. 

चीन च्या बाईट डान्स या कंपनीची मालकी असणारं अॅप म्हणजे हे टिकटॉक प्रकरण. सप्टेंबर २०१६ साली या कंपनीने हे किडे केले. त्यानंतर आजतागायत नुसत्या ८० लाख लोकांनी अॅपला रिव्हू दिलाय. २०१८ मध्ये अमेरिकेत सर्वात जास्त डाऊनलोड केलेलं हे अॅप्लीकेशन आहे. 

च्या गावात, बेरोजगारीने छळलय म्हणुन चार व्हिडीओ करायचे पैसै मिळवायचे असा विचार करुन आत आलो तर हे काय टिक टॉकची माहिती द्यायचं काम लावलय, 

सांगतो बाबांनो, थेट सांगतो टिकटॉकवर व्हिडीओ करुन पैसे कसे मिळवायचे.

आत्ता असे व्हिडीओ करताना समोरचा युजर लाईव्ह असेल तर त्याला इमोजी पाठवण्याचा ऑप्शन असतोय. आत्ता हे इमोजी घेण्यासाठी आणि पुढच्याला आपल्या भावना पोहचवण्यासाठी काही पैसे द्यावे लागतात ते पण इमोजीच्या स्वरुपात त्यासाठी नाव देण्यात आलय कॉइन्स बॅलन्स. तुम्ही इमोजी पाठवता म्हणजे त्याची व्हॅल्यू कॉइन्सच्या स्वरुपात असते. थोडक्यात काय तर तुझ्या व्हिडीओवर मी दहा रुपयचं हसतोय असा प्रकार असतो. मग ते दहा रुपयचं हसणं त्याच्या अकाऊंटवर जातं. इमोजी पाठवताना स्क्रिनशॉट काढला तर किंमत कळते अस टिकटॉक करणारे पोट्टे सांगतात. 

आत्ता हे सगळ्या गावाला करता येत का तर नाही. त्यासाठी आपणाला अगोदर टिकटॉकचं बादशहा व्हायला लागतं. म्हणजे चांगले फॉलोअर्स झाले की त्यासाठी टिकटॉक लाईव्ह असावं लागतं. टिकटॉक लाईव्ह असेल तरच तुम्हाला इमोजी मिळवता येतात आणि पाठवता येतात. तुम्ही लाईव्ह नसाल तर तुम्हाला कोणी इमोजी पाठवू शकत नाही. 

दूसरा प्रकार असतो तो हॅशटॅगचा. टिकटॉकचा एखादा हॅशटॅग असेल तर तिथे नंबर काढायला लागतो. म्हणजे हॅशटॅग टाकायचा आणि जत्रेत सहभागी व्हायचं तस झालं तर तुमचा नंबर लागतो. तो लागला की स्वत: टिकटॉक तुमच्या खात्यावर काईन्स टाकतं, बक्षीस देत. मग ते काईन्स तूम्ही पेटिएमवर फिरवुन घेवू शकता. 

झालं असे हे दोन प्रकार असतात.

अजून काही किडे करता येत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे.   

 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.