मोठमोठ्या कंपन्या मागे पडल्या आणि या साध्या पोराने लक्झरी कार बनवणारी कंपनी उभारलीय…..

आपली ड्रीम कार कशी असावी याची अनेक स्वप्न  आपल्या मनात चालू असतात. जगभर दिसणाऱ्या वेगवेगळ्या आणि महागातल्या गाड्या बघून आपल्या मनात विचार चालू होतात कि आपल्याला पण अशी गाडी पाहिजे. मर्सिडीझ, रोल्स रॉयल्स अशा अजून बऱ्याच गाड्या असतील. भारतातल्या एचआय [ HI ] प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अशा ड्रीम कार बनवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.

आजच्या जगात आपण मेड तू ऑर्डर शूज, सूट, ज्वेलरी आणि बॅग्सच्या युगात असताना ह्रीदेश कुमार नामदेव या तरुणाने मेड टू ऑर्डर लक्झरी कार कारचा प्रोजेक्ट उभा केला आहे. वर्ल्ड वाइड कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तो उभी करण्याच्या तयारीत आहे आणि यातून आपल्या ग्राहकाला त्याची ड्रीम कार बनवून देण्याचं तो काम करतो. २०१५ मध्ये तयार झालेला हा एचआय प्रायवेड लिमिटेड कंपनीचा ब्रँड आज फक्त ऑर्डर येणाऱ्या गाड्या तयार करून देतो. 

ह्रीदेश कुमार यांनी उत्कृष्ट दर्जाची बनवलेली पहिली आलिशान कार म्हणजे मॉरिस स्ट्रीट.

हाताने तयार केलेली हि त्यांची पहिली कार होती. जयपूरमध्ये मॉरिस स्ट्रीट आहे. खाजगी बँकिंग, एचएनआय आणि अनेक राजघराण्याची संपत्ती हाताळण्याच्या कारकिर्दीनंतर ह्रीदेश कुमारला जाणवलं कि भारतातले लोकं जागतिक पातळीवर बेस्ट ब्रॅण्डच्या कारच्या शोध असतात. यावर उपाय म्हणून भारताची कार बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

जेव्हा जेव्हा कंपनीमध्ये कार बनवण्याची ऑर्डर येते तेव्हा कॉम्प्युटर स्क्रीनवर ग्राहकाला त्याच्या ड्रीम कारबद्दलचे सगळे सिक्वेन्स दाखवले जातात. त्या व्यक्तीची ड्रीम कार कशी असेल याच्या स्लाईड दाखवल्या जातात. अनेकदा विचित्र मागण्यासुद्धा येतात कि फुलपाखराची गाडी बनवून द्या वैग्रे, आता जरी त्यांनी फुलपाखराची गाडी बनवून दिली तरी ती रस्त्यावर पळलीही पाहिजे. 

बहुतेक मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट हे एनसीआर आणि मुंबई प्रॉडक्टच्या सेटपमध्ये तयार केली जातात. जर क्लायंटला कोणत्या प्रकारची यंत्रसामग्री आवश्यक आहे आणि आमच्याकडे नसली तरी ती आम्ही जगभरातून धुंडाळून तो पार्ट गाडीत लावतो म्हणजे लावतोच.

सध्या एचआय या भारतीय ब्रॅण्डला जगभर विस्तार करण्याच्या बेतात आहे. आर्थिक आणि तांत्रिक अडचणी येत असल्या तरी ह्रीदेश कुमार हे नेटाने जगभर आपले हात पसरवत आहेत. आज जगातल्या विविध भागातून ३०० पेक्षा नवीन कार मॉडिफाय करण्याच्या ऑर्डर एचआयला मिळालेल्या आहेत. ह्रीदेश कुमार सांगतात कि सतत नवीन काहीतरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो.

२०२० पर्यंत ३० हजार लक्झरी कारची विक्री त्यांनी पार केली होती. भारतात ब्रँड न्यू कारची खरेदी करणारे लोक भरपूर आहेत. बीएमडब्ल्यूचे अध्यक्ष फिलिप वॅन यांनी एचआय बद्दल सांगितलं होतं कि भविष्यात लोकांचा ओढा हा ड्रीम कारकडे वाढेल त्याचा अशा नवीन गाड्या बनवणाऱ्या कंपनींना होईल. 

जगात ऑडीज आणि बीएमडब्ल्यूचं मार्केट वेगळं आहे पण एचआयच्या ड्रीम कार बनवून देणाऱ्या ऑर्डरकडे लोक वळतील असा विश्वास ह्रीदेश कुमार यांना आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.