पूर्वीच राहूल गांधींच म्हणणं ऐकलं असत तर आजची परिस्थिती वेगळी असती..?

ऑक्सिजनच्या अभावामुळे दिल्लीतल्या जयपुर गोल्डन हॉस्पीटलमध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आज सकाळी आली. देशात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची आकडेवारी दुर्देवी आहेच पण त्याहून अधिक दुर्देवी गोष्ट म्हणजे प्राथमिक आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूंच्या घटना दुर्देवी आहेत. 

कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे औषधे नाहीत. कुठे डॉक्टर्स उपलब्ध नाहीत तर कुठे बेड मिळत नाहीत. अशा या तुटवड्यांमुळे दुसरी लाट ही अधिकाधिक विस्फोटक ठरतेय. इथे सरकारचा हलगर्जीपणा असल्याची टिका होत आहे… 

अशा वेळी विरोधी पक्षाला देखील प्रश्न विचारला पाहीजे की ते सरकारला याची जाणिव करुन देत होते का…? 

हा प्रश्न विचारला आणि विरोधी पक्षाचा एक घटक म्हणून राहूल गांधी कोणत्या गोष्टी केंद्र सरकारला सांगत होते हे पाहिलं तर नक्कीच वाटतं,

राहूल गांधींच्या सूचना मोदी सरकारने मनावर घेतल्या असत्या तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी असती… 

पण गेल्या एक वर्षातील घटनाक्रम पाहीला तर एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे राहूल गांधी केंद्र सरकारला परिस्थिती बिघडण्यापूर्वीच दक्षता घेण्याची जाणीव करून देत गेले आणि सत्ताधारी पक्षाने राहूल गांधींना पप्पू म्हणून चिडवण्यातच धन्यता मानली.. 

याची सुरवात होते ती कोरोनाच्या अगदी सुरवातीच्या काळात… 

फेब्रुवारी २०२० देशात कोरोना रुग्णांची नोंद होवू लागली. त्या वेळी बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदीजी दौरे आखत होते. 

अशा काळात राहूल गांधींनी १२ फेब्रुवारी २०२० मध्ये ट्विट केलं. तेव्हा देशात ५०० रुग्णांची नोंद होती. या ट्विटमध्ये ते म्हणतात, 

‘भारतातील लोकांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी कोरोना  गंभीर धोका आहे. मला वाटत कि,  केंद्र सरकार हा धोका गांभीर्यानं घेतना दिसत नाही. वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे, कोरोना महामारीला गंभीरपणे घेतलं नाही तर हा रोग अर्थव्यवस्थेला डबघाईस आणेल.

यासोबतच राहूल गांधींनी सांगितल होत कि, सर्वप्रथम इंटरनॅशनल एअरपोर्टवर कडक निर्बंध आणून, विदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी.

मात्र सत्ताधारी पक्षातील लोकांनी यावर पप्पू पप्पू म्हणत राहूल गांधींची संभावनाच केलेली होती. खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहूल गांधींच्या बोलण्याची मस्करी उडवली होती, 

ते म्हणाले होते कि,

“कोरोनाचा आणि अर्थव्यवस्थेचा काय सबंध.?

हे कॉंग्रेसच्या राजकुमारला कोणीतरी समजवा ..!”

३ मार्च आणि ५ मार्चला ट्विट करत राहूल गांधींनी पून्हा एक इशारा दिला होता. त्यात ते म्हणाले होते, 

‘प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण येतात, जेव्हा त्या राष्ट्राच्या नेत्याची परीक्षा घेतली जाते. एक प्रामाणिक नेता भारत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी पूर्णपणे लक्ष्य केंद्रीत करेल,’

तर आपल्या ५ मार्चच्या ट्वीटमध्ये सरकारल म्हटल होते कि, “देशातील आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसचं संकट पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणात आहे. हे म्हणजे टायटॅनिकचा जहाजाच्या कॅप्टननं जहाजातील प्रवाशांना घाबरू नका, असं सांगण्यासारखं आहे. जसं की जहाज बुडण्यासारखं नाही.

या संकाटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं कृती योजनेची अमलबजावणी करण्याची वेळ आली असल्याच राहून यांनी यावेळी म्हंटल होत. मात्र सरकारनं त्याकडे गांभीर्याने लक्ष दिल नाही. दरम्यान, राहूल गांधी यांनी जेव्हा हे ट्विट केले तेव्हा देशातील परिस्थिती जवळपास नियंत्रणात होती. 

https://twitter.com/RahulGandhi/status/1235479539666399234

यांनतर वाढती संख्या पाहून राहूल गांधींनी एप्रिल २०२० मध्ये पुन्हा एकदा सावध करत म्हटले कि, लॉकडाऊन हा एकमेव उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी टेस्ट सेंटर आणि हॉस्पिटल्सना सुसज्ज करावं लागेल.’

मात्र त्यावेळी देखील भाजपकडून पप्पू अशी संभावना करत त्यांच बोलणं गांभीर्याने घेण्यात आलं नाही.

दूसरी लाट ही दुर्लक्षपणाचे परिणाम

सरकारचा हाच शहाणपणा आज गळ्याशी आलाय, दरोरोज लाखोंचा आकडा समोर येतोय. लसीकरण मोहम सुरु असली तरी त्याचा तुटवडा सुद्धा जाणवू लागलाय.

याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राहुल गांधीही पंतप्रधानांना पत्र लिहून परदेशी लसींना मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक जलद गतीने करण्यासंदर्भात मागणी केली होती. सोबतच, देशातून परदेशात लसींची होणारी निर्यात थांबवण्याची मागणी त्यांनी केली होती. जेणेकरून देशात सगळ्यांनाच लस उपलब्ध होईल.

मात्र, भाजपने यावरून त्यांनाच धारेवर धरल होत.

रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर लॉबिंग केल्याचा आरोप केला होता .

“पार्ट टाईम राजकारणी म्हणून अपयशी ठरल्यानंतर आता राहुल गांधी पूर्णवेळ लॉबिंग करू लागले आहेत की काय? आधी त्यांनी फायटर विमानं बनवणाऱ्या कंपन्यांसाठी लॉबिंग केलं. आता ते परदेशी लसींना मान्यता देण्याची मागणी करून या फार्मा कंपन्यांसाठी लॉबिंग करत असल्याच प्रसाद यांनी म्हंटल होत.”

एवढेच नव्हे तर रविशंकर म्हणाले होते कि,

“कोरोनासारख्या साथीशी लढा देणं काही खेळ नाही. लसीकरणासोबतच चाचण्या करणं, बाधितांचं ट्रेसिंग करणं आणि त्यांच्यावर उपचार करणं देखील महत्त्वाचं आहे. पण राहुल गांधींची समस्या ही आहे की त्यांना हे सगळं कळत नाही”.

या सगळ्यानंतर आता, भारत सरकारने परदेशी लसींच्या आयातीला हिरवा कंदील दाखवलाय.  ज्यानंतर आता भारताच्या लसीकरण मोहिमेत विदेशी लसी देखील दिल्या जाणार असल्याच समजत. या सगळ्यात असा प्रश्न उपस्थित होतो कि ,

जर आधीच पप्पूच म्हणन ऐकल असत तर  कोरोनाच्या लढाईत भारत आतापर्यंत पास होऊ शकला असता का?

हे ही वाच भिडू :

कोरोनाच्या निमित्ताने मोदी सरकार महाराष्ट्रावर खरंच अन्याय करतय का?

१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचं श्रेय नेमकं कोणाचं हे आता मोदींनीच सांगावं..

राहूल गांधी आयकीडो मध्ये ब्लॅक बेल्ट आहेत.. 

Leave A Reply

Your email address will not be published.