कोरोनाच्या निमित्ताने मोदी सरकार महाराष्ट्रावर खरंच अन्याय करतय का?

सध्या देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यातही विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस खूप वेगाने वाढत आहे. जसा कोरोना वाढत चालला आहे त्याच प्रमाणात राजकारणाचा कलगीतुरा देखील वाढत चाललाय. ठाकरे सरकार लॉकडाऊन करू म्हणतंय तर विरोधातले भाजप नेते आरोप करतंय की

महाविकास आघाडी सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी हा लॉकडाऊन आणू पाहत आहे.

सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला केंद्र सरकारमधून मदत मिळतच नाही.  वैद्यकीय उपकरणे आणि साधने पुरवताना महाराष्ट्रासोबत राजकारण केल्याची टीका त्यांच्याकडून केली जात आहे. अशातच ‘भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी?’ असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला.

शिवसेनेचे सख्खे शत्रू समजले जाणारे मनसे आणि त्यांचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून महाराष्ट्राच्या पाच मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्यांमध्ये महाराष्ट्राला अपुऱ्या कोरोना लस मिळत असतील तर लॉक डाऊन शिवाय दुसरा पर्याय तरी काय उरतो? असा सवाल विचारलं आहे.

कोरोनाच्या निमित्ताने महाराष्ट्रावर खरंच अन्याय होतोय का?

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधे वेगाने वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. त्यातच लागणाऱ्या औषधाचा तुटवडा जाणवत आहे, रुग्णांना बेड भेटत नाहीत, पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, व्हेंटिलेटर कमी पडत आहेत.

राज्यसरकारच म्हणणं आहे की केंद्राकडून दिली जाणारी मदत अपुरी पडत आहे किंवा ती जाणूनबुजून इतर राज्याच्या तुलनेत कमी दिली जात आहे महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. याचाच आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत.

लस पुरवठा?

आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाच्या सरकारी आकड्या नुसार महाराष्ट्र सरकारला १२ एप्रिल २०२१ पर्यंत  1,01,92,353 एवढ्या लसी दिल्या गेल्या आहेत यामध्ये पहिला डोस 92,20,610 एवढ्या लोकांना देण्यात आला आहे.

तर दुसरा डोस 9,71,743 एवढ्या लोकांना देण्यात आला आहे. हे आकडे दाखवतायत कि महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळाल्या आहेत आणि लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल राज्य आहे.

पण महाराष्ट्र सरकारच म्हणणं असं आहे कि शेजारील गुजरात या राज्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे आणि आमच्या राज्यात लसी अभावी लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत.या ठिकाणी आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून घेतलेली माहिती सोबत देत आहे.

Untitled1

रेमडेसिवीर इंजेक्शन?

सध्या महाराष्ट्रामध्ये दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहेत. वाढती रुग्णसंख्येमुळे या रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज खूप वाढली आहे आणि हा एवढा पुरवठा  पुरेसा पडत नाही असं राज्यसरकारच म्हणणं आहे.

जेवढ्या तुलनेत रुग्ण वाढत आहेत तेवढे रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळत नाहीत असा राज्य सरकारच म्हणणं आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली असून रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार देशातील औषध निर्मती कंपन्यांच्या संपर्कात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

व्हेंटिलेटर?

माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार महाराष्ट्रावर फक्त लसी देण्यातच नाही तर इतर वैद्यकीय उपकरणे आणी मदत देण्यात पण दुजाभाव केला आहे. लोकसभेमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार N९५ मास्क, PPE किट्स आणि व्हेंटिलेटर देण्यामध्ये महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केला आहे आणि केरळला तर अजून कमी दिल आहे असं ते बोलले.

गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यांना जास्त प्रमाणात हि साधने दिली गेली असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य

N९५ मास्क PPE किट्स व्हेंटिलेटर

महाराष्ट्र

१५६० २२३ २.२

गुजरात

९६२३ ४९५१ १२.९

उत्तर प्रदेश

३९१६ २४४६ ६.७

 हि आकडेवारी दर हजारी रुग्ण व्यक्तीप्रमाणे दिली आहे.

वरील आकड्यांवरून असं समजतंय महाराष्ट्रामध्ये वाढत्या रुग्णाच्या प्रमाणात खूप साधनांचा तुटवडा जाणवत आहे कोरोनाशी दोन हात करायला जास्तीत जास्त वैद्यकीय उपकरणे आणि साधने मिळणे गरजेचं आहे.

सध्या केंद्र राज्य राजकारण बाजूला ठेवून एकत्र येउन आलेल्या संकटाशी सामना करावा लागणार आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.