3D प्रिंटिंगच्या पहिल्या पोस्ट ऑफिसचं उद्घाटन, जाणून घ्या काय आहे 3D प्रिंटिंग?

जगात दररोज नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यात भारतही पाठीमागे नाही. जेंव्हा जेंव्हा आपल्या मनात प्रिंटचा प्रश्न येतो तेव्हा आपण एका एखाद्या जाड अशा कागदावर फोटो कॉपी करण्याचा किंवा इतर कोणत्याही डिझाइन प्रिंट करण्याचा विचार करतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की प्रिंटरच्या माध्यमातून इमारत किंवा घरही बनवता येतात. कदाचित हा विचार आधी कधी आला नसेल, पण आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल.

पण, भारतात असं घडलं आहे. देशात 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने पोस्ट ऑफिसची इमारत बांधण्यात आली असून त्यात ऑफिसही सुरू करण्यात आलं आहे.

देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बंगळुरूमध्ये उघडण्यात आलं आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलं आहे . या पोस्ट ऑफिसला थ्रीडी प्रिंटेड पोस्ट ऑफिस असं नाव देण्यात आल आहे. या इमारतीच्या बांधकामाचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केला आहे. थ्रीडी प्रिंटिंग मदतीने इमारत बनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण टीमचं अभिनंदनही केले आहे.

3D  प्रिंटरच्या मदतीने बनवलेल्या या पोस्ट ऑफिसची खास गोष्ट म्हणजे ते बनवण्यासाठी ४५ दिवसांच टार्गेट ठेवण्यात आलं होतं, मात्र, ते अवघ्या ४३ दिवसांत पूर्ण झालं आहे. ही इमारत IIT मद्रास आणि L&T यांनी एकत्रीत येऊन बांधली आहे. बरं हे 3D प्रिंटिंग काय आहे? 3D प्रिंटिंग काम कसं करत? हेच जाणून घेऊयात.

सुरवातीला पाहू ज्याच्या माध्यमातून ही ऑफीसची इमारत उभी राहीली हे 3D प्रिंटिंग काय आहे?

3D  प्रिंटिंगला  अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग असंही म्हटलं जातं. या पद्धतीत डिजिटल फाईलमधून थ्री डायमेन्शनल सॉलिड ऑबजेक्ट बनवला जातो. या पद्धतीत एकावर एक असा थर रचून ऑबजेक्ट बनवला जातो. यात छत, भींत रोबोटिक्स मशिनच्या साहाय्याने तयार केले जातात. गेल्या एक-दोन वर्षात 3D प्रिंट‌िंगची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

वास्तविक बघताता ८० च्या दशकात या प्रिंटरचा शोध लागला. १९८४ मध्ये 3D सिस्टीम कॉर्पोरेशनच्या चक हल यांनी सर्वप्रथम हा प्रिंटर तयार केला.

मात्र, सुरुवातीच्या काळात त्याची किंमत खूपच होती. पण जसजसं याचं उत्पादन वाढत गेलं, तसतसं या प्रिंटरच्या किंमती कमी होऊ लागल्या. कागदावर अक्षरे छापणारा प्रिंटर सगळ्यांना माहित आहेच. पण वेडिंग रिंग पासून अख्खी घरेच्या घरे आणि छोट्या खेळण्यापासून कान, किडणी सारख्या मानवी अवयवाना प्रिंट करू, छापू शकणारा प्रिंटर नवीन आला आहे.

बरं हा   3D प्रिटींग काम कसं करत हा महत्वाचा प्रश्न पडतो.

3D म्हणजे तिसरी मिती. लांबी, रुंदी आणि उंची ह्या तीन मिती असतात. काही काळापर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून कागदावर फक्त दोनच मिती आणणे शक्य होतं. इमारत बांधण्यासाठी साइटवर मोठ्या आकाराच्या रोबोटिक काँक्रीट प्रिंटरचा वापर केला जातो. रोबोटिक प्रिंटर कॉंक्रीटच्या थराने थर जमा करतो ज्यापासून भिंत बनविली जाते. या तंत्रज्ञानामध्ये कॉम्प्युटरमध्ये इमारतीचे डिझाईन सेट केले जाते आणि त्यानंतर फक्त कमांड द्याव्या लागतात.

थ्रीडी प्रिंटरने डिझाईननुसार इमारत तयार केली जाते. आपल्याला फक्त सिमेंटचं मिश्रम तयार करायचा आहे. इमारत उभी करण्यासाठी मशीनद्वारे सिमेंटचे थर टाकून भिंत तयार केली जाते. 3D प्रिटींगचे वेगवेगळे प्रकार आहेत. फ्यूज्ड डिपोजिशन मॉडलिंग, स्टीरियोलिथोग्राफी, सेलेक्टिव लेजर सिंटरिं.

या 3D प्रिटींगचे अनेक उपयोग आणि फायदेही होऊ शकतात.

थ्रीडी प्रिंटर आता जगभरात लोकप्रिय होत आहेत. ते विविध कामांसाठी वापरलं जात आहेत जसे की इमारती बांधण्यासाठी असो किंवा अगदी खाद्यपदार्थांसाठी प्रिंटिंग मॉडेल बनवणे असो या सगळ्या गोष्टी यामुळे शक्य होतं आहेत. याचा फायदा असा आहे कि अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात या सगळ्या गोष्टी तयार करून मिळत आहेत. यामुळे एखादा व्यवसाय उभारायचा असेल तर त्या संदर्भातील संकल्पना तयार असेल तर अगदी कमी वेळात ते आपण आमलात आणू शकतो.

अजुन एखाद उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या ठिकाणी भुकंप झाला तर त्या गावाचं लवकर पुर्नवसन करू शकतो. 3D प्रिटींगमुळे जे काही खराब वस्तु आहेत त्याचा नव्याने वापर होईल आणि ते कामी येईल. या सगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी मोठमोठे कारखाने आणि बनवणाऱ्यांची गरज पडणार नाही. त्याचे फिलामेंट ही  फार महाग नाही. याच्या माध्यमातून आपण अगदी अवघड दिसणार्‍या गोष्टीही सहज प्रिंट करू शकतो.

कोणत्याही गोष्ट असेल त्याचा जसा फायदा असतो अगदी तसाच तोटाही असतोच. 3D प्रिटींगमुळे अनेक कामगारांच्या हाताला काम मिळण्याची शक्यता कमी होते.

जसेकी एखाद घर जर 3D प्रिंटरच्या माध्यमातून बांधयाचं असेल तर त्यासाठी कमी मनुष्यबळ लागणार त्यामुळे अनेकांनां यामुळे रोजगार मिळणं कठीण  होऊ शकतं. 3D प्रिंटरमुळे आपल्याला विजेचा वापर जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच काही  3D प्रिंटर पाहिजे तसे वेगाने कामही करत नाहीत.

3D प्रिंटीगचा पहिली इमारत ही बंगरूळमध्ये तयार करण्यात आली आहे.  त्यामुळे हा प्रयोग जर यशस्वी झाला आणि येणाऱ्या काळात 3D सहजतेने कंपन्यांना मिळाले तर नक्कीच वेळेची आणि पैशाची बचत या माध्यमातून होईल आणि संकल्पना लवकर मार्गी लागायला मदत होईल.

 

हे ही वाच भिडू :

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.