पैसे न घालवता इंस्टाग्राम अकाउंटवरचे फॉलोअर्स कसे वाढवायचे ते वाचा.

आपण सगळेच सध्या सोशल मिडीयाचा भरपूर वापर करतो. इंस्टाग्राम, ट्वीटर, फेसबूक अशा विविध अकाऊंटवरून आपण आपले फोटो, व्हीडीओ, लिखाण आणि बरच काही पोस्ट करत असतो. याला किती लाईक मिळाले किती लोक आपल्याला फॉलो करतात याच्यावर देखील आपले सातत्याने लक्ष असतेच. आपल्याकडे सुरवातीला फेसबूक सगळ्यात जास्त वापरल गेल पण हळू हळू जसा काळ बदलला तसे आपले अकाउंट देखील बद्दलत गेले आता तरुणांच्यात instagram सगळ्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळेच अनेक व्यवसायिक देखील इकडे वळत आहेत. तर तुम्ही instagram वरून जर व्यवसाय करणार असाल किंवा तुम्हला तुमची व्यक्तीक इमेज वाढवण्यासाठी फॉलोअर्स वाढवायचे असतील तर हे नक्की वाचा. भिडू तुम्हाल अशा काही टिप्स देतोय ज्यात पैसे न खर्च करता तुम्ही तुमचे फॉलोअर्स वाढवू शकता.

  • नवीन पेज उघडता क्षणी पैसे देऊन पेड जाहिरात करणे व्यर्थ ठरेल. त्यामुळे साधारण १००-२०० फॉलोवर्सचा टप्पा पार केल्यानंतरच पेड जाहिरात करा.
  • आपल्या कोणत्या पोस्टला लोक कसा प्रतिसाद देतात यावरून कशाप्रकारच्या पोस्ट्स जास्त करायला हव्यात आणि कोणत्या पोस्ट टाळायला हव्यात याचा अभ्यास करा आणि त्यानुसार पोस्ट करा.
  • तुमच्या अकाउंटचा रीच वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे पर्याय म्हणजे हॅशटॅग, स्टोरीज, लोकेशन आणि इंस्टाग्राम साजेशन्स. या सर्वाचा कुठे, किती आणि केवढा वापर करायचा हे समजायला हवेच.
  • नवे पेज उघडल्यावर रोज साधारण दोन-तीन स्टोरीज पोस्ट केल्यात तर तुमचे अकाऊंट ऍक्टिव्ह असल्याची खात्री समोरच्याला होते.
  • आपल्या फॉलोवर्समध्ये अशा लोकांचा जास्तीतजास्त समावेश असायला हवा ज्यांना आपल्या उत्पादनांची आवड किंवा गरज आहे जर तुमचे अकाउंट व्यवसायासाठी असेल तर.
  • फॉलोवर्सची हजारी गाठेपर्यंत इतरांना फॉलो करण्यात कंजुषी करणे व्यर्थ ठरेल, परंतु जे फॉलो बॅक करत नाहीत त्यांना unfolow करणेच योग्य आहे.
  • तुमच्या पोस्टमधील हॅश टॅग हे त्या पोस्टशी निगडीत असावेत हे लक्षात ठेवा.
  • तुमच्या उद्योगाशी निगडीत हॅश टॅग सर्च करून हे हॅशटॅग फॉलो करणाऱ्या लोकांना प्रथम फॉलो करा. ज्यांना तुमचे उत्पादन, तुमच्या पोस्ट्स आवडतील ते अवश्य फॉलो-बॅक करतील. हे करताना एक मात्र लक्षात ठेवायला हवे की आपल्याला माहीत नसलेल्या लोकांच्या तीन किंवा त्याहून अधिक पोस्ट्स जर तुम्ही लाईक केल्यात तर तुम्हाला स्पॅमर ठरवले जाते.
  • एकदा २०० फॉलोवर्स गाठलेत, की वेळ येते पेड जाहिरातीची. इन्स्टाग्रामवर एखादी जाहिरात करण्याचा खर्च साधारण दीड हजार रुपयांच्या आसपास जातो, परंतु ही एक महत्त्वाची गुंतवणूक ठरते. इंस्टाग्राम स्वतःहून एक टारगेट सेगमेंट ठरवते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्वतःचे सेगमेंट ठरवूनही प्रमोशन करू शकता. जितका जास्त ऑडिअन्स ठरवाल तेवढे जास्त पैसे हे लक्षात असावे.
  • सध्या बाजारात अनेक चुकीच्या मार्गांनी पेड अथवा फुकटात देखील फॉलोवर्स मिळतात, पण हे फॉलोवर्स ॲक्टिव नसतात त्यामुळे फक्त फॉलोवर्स वाढतात, परंतु फॉलोवर्स ची संख्या हजार आणि लाईक्स फक्त दहा हे पाहिल्यावर तुम्ही लगेच पकडले जाल आणि इन्स्टाग्राम तुमचे अकाउंट बंद करेल.                                                     

हे ही वाचा भिडू. 

1 Comment
  1. Sartha_k56 says

    Sarthak Sathe

Leave A Reply

Your email address will not be published.