जिहादसाठी अफगाणिस्तानला गेलेल्या पोरींना भारतात परतायचं आहे पण सरकार परवानगी देईना.

धार्मिक कट्टरता शेवटी माणसाला आयुष्याच्या त्या टप्प्यावर नेऊन सोडते जिथे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो !

हो असंच काहीसं घडलंय मेरियम सोबत …जीने थेट केरळ सोडलं आणि अफगाणिस्तान गाठलं तेही इसिस जॉईन करण्यासाठी.. अफगाणीस्तान मध्ये इसिस ची नवीन शाखा सुरु झाली होती.यातच सहभागी होण्यासाठी तिच्यासोबत इतरही २१ भारतीय पुरुष आणि महिला होत्या. 

2015 मधली घटना आहे, 22 वर्षाची मेरियम मुंबईत एका चांगल्या कंपनीत नोकरीला होती. त्या दरम्यान तिचा एक जुना क्लासमेट बेस्टीन व्हिन्सेंट तिच्या संपर्कात आला. व्हिन्सेंटने नेमकंच धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि स्वतःचे नवीन नाव ठेवले होते याहीया. त्याने मेरियम ला कुराण भेट दिले आणि समजावले कि आत्तापर्यंत शिकलेले सर्व काही विसरून जा आणि इस्लाम धर्म स्वीकार. इस्लाम हा स्वर्गात जाण्याचाच एक मार्ग आहे,

दुर्देवाने त्याच्या या ब्रेनवॉशला मेरियम बळी पडली.

आणि परिणाम व्हायचा तोच झाला, मेरियमने मुंबईतील नोकरी सोडली आणि ती थेट केरळात पोहचली, घरी जाऊन तिने स्वतःचा धर्म बदलला, ख्रिश्चन धर्म बदलून ती इस्लाम धर्माची झाली, आणि स्वतःचे नाव ठेवले मेरिन जेकब.

मेरियमने नंतर बेस्टिन व्हिन्सेंटशी लग्न केलं आणि दोघेही २०१६ मध्ये अफगाणिस्तानला पळून गेले. अफगाणी एजन्सीने सांगितल्याप्रमाणे,

“या जोडप्याने अफगाणिस्तानमध्ये आयएस आणि जिहादच्या समर्थनार्थ गुप्त वर्ग घेतले होते, तसेच जिहादी प्रोपगंडासाठी तो काही लेखन हि करायचा”

त्यानंतर एकाच आठवड्यात व्हिन्सेंटचा भाऊ बेक्सन यानेही धर्मांतर केलं आणि निमिषासोबत लग्न केलं आणि तीनेही इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःच नाव ठेवलं फातिमा. कुणालाही याचा संशय आला नाही कि दोन्ही भाऊ काय करायला चालले होते. लग्नानंतर फातिमाने घरी खोटे सांगितले कि,आम्ही श्रीलंकेला एका बिझनेस साठी जातोय, असे सांगून ते अफगाणिस्तान ला निघून गेले. काही दिवस ती घरच्यांच्या संपर्कात होती मात्र अचानक तिचे निरोप येणे बंद झाले आणि घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली. तेंव्हा हा प्रकार समोर आला.

तर त्यांच्यात अजून एक महिला होती रेफिला, तिचे लग्न कासारगोडच्या इजस कल्लुकेटिया पुराईल याच्याशी झाले होते. तो आयएसचा दहशतवादी होता.  त्याने अफगाणिस्तानच्या जलालाबाद येथील तुरुंगावर हल्ला केला होता, त्या हल्ल्यात ३० लोकं ठार झाले होते.

काहीच काळात एका हल्ल्यात व्हिन्सेंट अफगाणिस्तानात मारला गेला, एकएक करत ४ हि महिलांचे पती वेगवेगळ्या हल्यात मारले गेले.

तुम्ही म्हणाल हे सगळं मी आत्ता का सांगतेय ?

त्याला निमित्त असं कि मेरियम सोबत गेलेल्या अजून ३ महिला आणि ती स्वतः अशा ४ महिला भारतात परत येऊ इच्छित आहेत आणि आपलं भारत सरकार त्याला परवानगी द्यायला टाळत आहे. 

मागच्या २ महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाचे प्रमुख अहमद झिया सराज यांनी काबुलमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि जाहीरपणे सांगितले की,

१३ देशांतील इस्लामिक स्टेटचे 408 सदस्य अफगाणिस्तानच्या तुरुंगात आहेत. यामध्ये चार भारतीय, १६ चिनी, २९९ पाकिस्तानी, दोन बांगलादेशी, दोन मालदीवमधील दोन यांचा समावेश आहे. त्यांनी हि देखील माहिती दिली कि, अफगाणिस्तान सरकार सध्या १३ देशांसोबत चर्चा करतंय कि, तुमच्या तुमच्या कैद्यांना तुम्ही घेऊन जा. थोडक्यात अफगाणिस्तान सरकार या सर्व कैद्यांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

काबूलमधील वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली कि, आम्ही वाट पाहत आहोत कि भारत सरकार या प्रस्तावाबद्दल काय उत्तर देईल, मात्र दिल्लीतील अफगाणी अधिकाऱ्यांनी यावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. 

मात्र सूत्रांकडून अशी माहिती माध्यमांना मिळाली कि, या चार महिलांच्या भारतात परत येण्याबद्दल आपल्या सरकारी एजन्सींमध्ये एकमत झाले नाही आणि त्यांना परत येऊ दिले जाण्याची शक्यता नाही असेही त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तान मध्ये या सर्व महिलांनी जेंव्हा आत्मसमर्पण केले तेंव्हा त्याच्या एका महिन्यानंतर म्हणजेच २०१९ च्या डिसेंबर महिन्यात काबुलमध्ये असणाऱ्या भारतीय सुरक्षा एजन्सींनी त्या महिलांची मुलाखत घेतली होती, तेंव्हा त्या महिलांना मुलं होती.

त्यानंतर २०२० च्या मार्च मध्ये स्ट्रॅटन्यूजग्लोबल डॉट कॉम यांनी त्यांच्या वेबसाईट वर त्या महिलांच्या चौकशीचा व्हिडिओ प्रकाशित केला होता. व्हिडिओमध्ये दिसलेल्या या चार महिलांची नावे सोनिया सेबॅस्टियन उर्फ आयशा, रफिला, मेरिन जेकब उर्फ मरीयम आणि निमिशा उर्फ फातिमा ईसा अशी आहेत. 

अफिगानिस्ताणच्या एका वरिष्ठअधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे या ४ भारतीय महिलांनी तेथील अधिकाऱ्यांसमोर त्यांनी शरणागती पत्करली होती.  

त्या महिलांचं म्हणणं आहे कि, आम्ही शरण येतो आम्हाला भारतात परत यायचं आहे, त्यासाठी आम्हाला जी काही शिक्षा करायची आहे ती भारतातच व्हावी, जेणेकरून आमच्या मुलाबाळांचे भविष्य आम्हाला सुरक्षित करता येईल, त्यांना भारतात वाढवता येईल.

वर मी सांगितलं होतं ना, जेंव्हा काही मूर्ख जनता माथेफेरू कट्टर धर्मांधतेला बळी पडते तेंव्हा त्यांच्या कडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा मार्ग च नसतो.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.