पांचजन्यमध्ये इन्फोसिसला देशद्रोही म्हटलं पण या वादावर RSS ने आपले हात वर केलेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी स्वयंसेवक संस्था. जी नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. आज सकाळपासून पुन्हा एकदा माध्यमांमध्ये झळकायला सुरुवात झालीये.

दरम्यान, यावेळी वाद कोणत्या राजकीय पक्षाशी नाही. तर आरएसएस विरुद्ध प्रसिद्ध विदेशी आयटी कंपनी आयटी इन्फोसिस असा आहे. आरएसएसशी संबंधित मासिक पाचजन्य मधल्या लेखामुळे सुरु झालेला हा वाद जास्तच पेट घेताना दिसतोय. 

‘साख और अघात’

तर, पाञ्चजन्य हे एक विकली मॅगझीन आहे, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रकाशित करतं. आरएसएसने आपल्या या नव्या आवृत्तीत इन्फोसिस ‘साख और अघात’ म्हणजेच प्रतिष्ठा आणि एक गंभीर नुकसान या टायटलने चार पानांची कव्हर स्टोरी पब्लिश केली. एवढंच नाही तर आपल्या मॅगझिनच्या कव्हरवर या टायटलसोबत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ति यांचा फोटो देखील छापलाय.

त्यात हाईट म्हणजे या मॅगझीनमध्ये बेंगरुळुमधल्या या कंपनीवर लेख लिहून जोरदार हल्लाबोल केलाय. ज्याचं टायटल ‘ऊंची दुकान, फीका पकवान’ असं देण्यात आलंय. 

आता खरं तर या प्रकरणाचं मूळ आहे इन्फोसिसचं पोर्टल. ७ जूनला या सॉफ्टवेअर कंपनीनं वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि टॅक्स भरण्यासाठी नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केलं. पण पोर्टल सुरु झाल्यापासूनचं ग्राहकांना हे हॅण्डल करताना बऱ्याच अडचणी येत आहेत. सोबतच, या टॅक्स पोर्टलच्या अडचणींमुळे लोकांचा टॅक्स सिस्टीमवरून विश्वासचं उडालाय. 

लोकांना भीती वाटतेय कि, आपले पैसे सुरक्षित तर आहेत ना? यात कोणती हेरगिरी, हँकिंग किंवा अँटीनॅशनल पॉवरचा कोणता संबंध तर नाही ना? असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेय, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

यावरूनचं संघानं आपल्या मॅगझिनच्या माध्यमातून इन्फोसिसवर हल्ला केलाय. लेखात म्हंटल कि, इन्फोसिसने विकसित केलेल्या पोर्टलमुळे गुंतवणूकदारांची गैरसोय होतेय. अशा घटनांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील करदात्यांचा विश्वास कमी झाला आहे. सरकारी संस्था आणि एजन्सी इन्फोसिसला प्रमुख वेबसाइट आणि पोर्टल्सचे कंत्राट देण्यास कधीचं मागेपुढे पाहत नाहीत, कारण ही भारतातील सर्वात नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.

 कोणतीही देशद्रोही शक्ती भारताच्या आर्थिक व्यवस्थेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्नात आहेत काय ? असा सवाल संघाने उपस्थित केलाय.

 संघाने लेखामध्ये  नमूद केले की, मासिकाकडे याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत, पण असेही म्हंटले गेलेय कि, इन्फोसिसने अनेक वेळा “नक्षलवादी, डावे आणि तुकडे-तुकडे टोळ्यांना” आर्थिक मदत पुरवलीये. यात अनेक संस्था आणि मीडिया पोर्टल्सचा समावेश आहे. ते उघडपणे मोदी सरकारच्या विरोधात आहेत. मॅगझीनमध्ये कंपन्यांनी पोर्टलवर अपलोड केलेल्या डेटाच्या गोपनीयतेवरही प्रश्न उपस्थित केलेयं.

या लेखात म्हंटले गेले कि, सरकारने एका सुप्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीला टॅक्स सिस्टीम सोपी करण्यासाठी कंत्राट दिले, परंतु यामुळे प्रकरणं आणखीनचं गुंतागुंतीचे झालेय. त्यामुळे इन्फोसिस आपल्या परदेशी ग्राहकांना अश्या प्रकारची खराब सर्व्हिस पुरवेल का, असा प्रश्न विचारण्यात आलाय.

‘पाञ्चजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले कि,

इन्फोसिस ही एक मोठी कंपनी आहे आणि सरकारने त्याच्या विश्वासार्हतेच्या आधारावर त्याला अत्यंत महत्त्वाची कामे दिली आहेत. पोर्टलवरचा अडथळा हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. यामुळे यासाठी जबाबदार असणाऱ्यांना जाब विचारला  आहे.

सरकारने इन्फोसिसला नोटीस पाठवलीये,

काही दिवसांपूर्वीच  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन ई-फाइलिंग पोर्टल सुरू झाल्यानंतर येणाऱ्या समस्यांसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून बोलावले होते. यांनतर इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी सलील पारेख हे काही दिवसांपूर्वी वित्त मंत्रालयात नवीन आयकर वेबसाइटमध्ये येणाऱ्या समस्यांबाबत उत्तर देण्यासाठी हजेरी लावली होती. 

अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसचे एमडी सलील पारेख यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरकार आणि करदात्यांची तीव्र निराशा व्यक्त केली आणि चिंता व्यक्त केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, ई-फाइलिंग पोर्टलच्या सध्याच्या कार्यक्षमतेवर करदात्यांना समस्या भेडसावत आहेत आणि या २.५ महिन्यांनंतरही सुटत नाहीये.

अर्थमंत्र्यांनी कंपनीला १५ सप्टेंबर २०२१  पर्यंत समस्या सोडवण्यास सांगितलेय.

या लेखाला देशद्रोही ठरवत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, हा सरकारवरचा डाग हटवण्याचा  प्रयत्न आहे आणि त्याचा निषेध केला पाहिजे.

 

आता पाञ्चजन्य हे संघाचे मुखपत्र असले तरी या लेखाबाबत संघाने आपले हात वर केलेत.  संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी ट्विट करत म्हंटले कि, 

“एक भारतीय कंपनी म्हणून, भारताच्या प्रगतीमध्ये इन्फोसिसचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इन्फोसिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या पोर्टलबाबत काही समस्या असू शकतात, परंतु पाञ्चजन्यमध्ये या संदर्भात प्रकाशित झालेला लेख हा लेखकाचा वैयक्तिक विचार आहे आणि ना कि पाञ्चजन्यचा. त्यामुळे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लेखात व्यक्त केलेल्या मतांशी जोडले जाऊ नये.”

दरम्यान, इन्फोसिसचे एमडी सलील पारेख यांनी सांगितले की, ते आणि त्यांची टीम पोर्टलचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांचे ७५० पेक्षा जास्त कर्मचारी या प्रोजेक्टवर काम करतायेत तर इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव पर्सनली हा प्रोजेक्ट हाताळतायेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.