अशा प्रकारे इस्लामपूराच्या एकाच कुटूंबातल्या २३ जणांना कोरोनाची लागण झाली

सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर सध्या कोरोना हब बनण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच कुटूंबातील २३ आणि त्यांचे नातेवाईक असणारी कोल्हापूर येथील एक महिला अशा एकूण २४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी काल आली.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची संख्या २३ झाल्याने चिंता व्यक्त केली जावू लागली. मात्र त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे इस्लामपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी एकाच कुटूंबातील २३ जणांना लागण झाल्याने शहरात भितीचं वातावरण निर्माण झालं. 

आजही अनेकजण या जिवघेण्या आजाराला हलक्यात घेण्याचं काम करत आहेत. असाच हलगर्जीपणा या कुटूंबाकडून करण्यात आला आणि साखळी वाढत गेली. कोरोनाची साखळी कशी वाढते हे समजून घेण्यासाठी आपण हे वाचायला हवं. फक्त माहितीपुरतीच ही गोष्ट न घेता आत्मसात करून स्वस्त:ला कोरान्टाईन करणं इतरांसोबत संपर्क न येवून देणं हे समजून घ्यायला हवं.

इस्लामपूरात नेमकं काय झालं. 

इस्लामपूरातील गांधी चौक परिसरात राहणाऱ्या एक कुटूंबातील चार व्यक्ती धार्मिक यात्रेसाठी हजला गेले होते. दिनांक १३ मार्च रोजी हे चौघेजण दिल्ली येथे विमानाने पोहचले. तिथे त्यांच्यावर कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. पुढे हे चार जण विमानमार्ग मुंबईत पोहचले मुंबईत मात्र त्यांना होम कोरोन्टाईन होण्याचे आदेश देण्यात आले.

आपल्या भाच्यासोबत हे चार जण मुंबईतून खाजगी गाडीतून इस्लामपूर येथे १४ मार्च रोजी पोहचले. 

यामध्ये ते परदेशातून आले असल्याची माहिती स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली नसल्याचं स्थानिक वार्ताहरांनी बोलभिडूशी बोलताना सांगितलं.

दिनांक १४ मार्चला या चौघांना होम कोरान्टाईन करण्याचे आदेश होते. मात्र हा आदेश धुडकावून लावत त्यांनी हजवरून आल्यानिमित्त कुटूंबासोबत कार्यक्रम केले. कुटूंबातील एकूण संख्या ३५ इतकी असल्याने हा धोका वाढत गेला.

दिनांक १९ मार्चला चारही व्यक्तींना त्रास जाणवू लागल्याने त्यांची चौकशी करण्यात येवू लागली व २१ तारखेला या कुटूंबाला सांगलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिनांक २३ मार्चला या चारही व्यक्तींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. त्यानंतर संपुर्ण कुटूंबाला ताब्यात घेवून त्यांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले.

दिनांक २५ मार्चला या कुटूंबातील ५ जणांना,

दिनांक २६ मार्चला रोजी याच कुटूंबातील २ जणांना

दिनांक २७ मार्चला रोजी याच कुटूंबातील १२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं.

एकूण २३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपुर्ण राज्यात चर्चा सुरू झाली. या २३ जणांमध्ये या कुटूंबामध्ये कामासाठी येणाऱ्या ३ मोलकरीण महिलांचा समावेश असल्याने कोरोना रुग्णांची व्याप्ती जास्त असल्याची भिती निर्माण झाली.

याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील एक वीस वर्षांची मुलगी इस्लामपूर मधील महाविद्यालयात शिक्षणाच्या निमित्ताने त्याच घरात राहत होती. तिचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिच्या कुटुंबातील सर्वजण हज यात्रेच्या कार्यक्रमासाठी इस्लामपूर येथे आले होते. त्यांना देखील निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

या कुटुंबाचे दोन मेडिकल आहेत व दैनंदिन खरेदी साठी शेकडो जणांचा त्यांच्याशी संपर्क येऊन गेला असल्याची शक्यता देखील स्थानिकांकडून व्यक्त केली जात होती. पण या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली

बुधवार पासून इस्लामपूर परिसरात 3 हजार 910 जणांचे तर गुरुवारी 3 हजार 617 व्यक्तींचे सर्वेक्षण झाले. यातील एकही व्यक्तीला कोरोना झाला आहे असे आढळले नाही. पण तरीही या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या 41 व्यक्ती हायरिस्क निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्या होत्या.

याच बरोबर त्या इस्लामपूरच्या कुटुंबाच्या प्राथमिक चौकशीवेळी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका यांचा संपर्क आल्या मुळे त्यांचीही तपासणी करण्यात आली आहे.

मला काय होतय या गोष्टीमुळे आज संपुर्ण शहर व्हेंटिरेटरवर असण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रोग गुणाकाराच्या स्वरुपात काम करत असल्याने वाढलेली संख्या निश्चितच चिंताजनक ठरलेली आहे.

आत्तातरी सर्वांनी प्रसंगाचे गांभिर्य ओळखून घरातच राहणं गरजेचं आहे इतकीच आमची कळकळीची विनंती आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.