दहशतवाद्यांचा ठिकाणा शोधून काढायला जेलमधून बाहेर काढलं, पण चकमकीत तोच मारला गेला

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेटिव्ह दहशतवादी जिया मुस्तफा ठार झाला आहे. जो सुरक्षा दलांसाठी अत्यंत ‘महत्त्वाची लिंक’ होता. सुरक्षा आस्थापनाच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तो दहशतवाद्यांच्या ठावठिकाणाविषयी माहिती देऊन त्यांचा शोध घेण्यासाठी चालू ऑपरेशन संपवण्यास मदत करू शकला असता.

पण पूंछ जिल्ह्यातील मेंढार कोट बलवाल कारागृहातून पोलीस मुस्तफाला १० दिवसांच्या कोठडीत घेऊन जात होते. वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, मुस्तफा नुकताच पुंछमध्ये लष्कराच्या जवानांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता, त्यानंतर पोलीस त्याला घेऊन जात होते.

खरं तर ११ ते १४ ऑक्टोबर दरम्यान पाकिस्तानातून घुसखोरी करून लष्कराच्या नऊ जवानांची हत्या करणाऱ्या या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेल्या १४ दिवसांपासून कारवाई सुरू आहे.

असे सांगण्यात येत आहे की, शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला, ज्यात दोन पोलीस आणि एक लष्करी जवान जखमी झाले, मुस्तफाही या हल्ल्यात जखमी झाला, घटनास्थळी आग लागल्याने त्याला बाहेर काढता आले नाही. नंतर पोलिसांनी जिया मुस्तफाच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

१० ऑक्टोबर रोजी सुरणकोटमधील डीकेजीजवळील जंगलात दहशतवादी लपल्याची बातमी मिळताच लष्कराचे जवान त्यांच्या शोधात निघाले, मात्र घनदाट जंगल आणि हवामानाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी ११ ऑक्टोबरला सकाळी जवानांवर ग्रेनेड हल्ला झाला, ज्यात लष्कराचे ५ जवान शहीद झाले.

११ ऑक्टोबर रोजी ५ जवानांवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी मंडेरच्या जंगलात लपून बसले होते, त्यांना पकडण्यासाठी लष्कराचे ऑपरेशन चालू होते, परंतु दुर्दैवाने दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. या कारवाईदरम्यान एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ)सह आणखी चार लष्करी जवान शहीद झाले.

जिया मुस्तफाला २००३ मध्ये काश्मीर पोलिसांनी अटक केली होती.

गेली १८ वर्षे तुरुंगात होता. तो फोनद्वारे पाकिस्तानात बसलेल्या लष्कराच्या बॉसच्या सतत संपर्कात होता आणि पूंछमधील घुसखोरांच्या लपण्याच्या ठिकाणांबद्दलही सांगत होता.

वृतसंस्थेच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरचे तत्कालीन डीजीपी एके सूरी यांनी १० एप्रिल रोजी मुस्तफाला अटक झाल्याची माहिती दिली होती. झिया हा लष्करचा डिस्ट्रिक्ट कमांडर होता आणि त्याच्यावर २४ काश्मिरी पंडितांच्या हत्येचा आरोप होता. हे काश्मिरी पंडित पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्ग गावात त्यांच्या घरी थांबले होते तेव्हा त्यांची हत्या झाली.

नदीमार्ग हत्याकांड घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने त्याला पाठवले होते, अशी कबुली मुस्तफाने चौकशीदरम्यान दिली होती, असा दावा पोलिसांनी केला.

२३ मार्च २००३ चा तो दिवस, जेव्हा २४ काश्मिरी पंडित एकाच वेळी मारले गेले. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थलांतर करताना बहुतेक लोक नदीमार्ग सोडून गेले. पण जवळपास ५० लोक तिथे थांबले. त्यादिवशी लष्कराच्या पोशाखात आलेल्या दहशतवाद्यांनी घराबाहेर उभ्या असलेल्या १२ पुरुष, ११ महिला आणि २ मुलांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांची निर्घृण हत्या केली होती.

या हत्याकांडाच्या एफआयआरमध्ये मुस्तफाशिवाय इतर तीन दहशतवाद्यांचीही नावे आहेत, परंतु एप्रिल २००३ मध्ये कुलगाममध्ये बीएसएफसोबत झालेल्या चकमकीत ते मारले गेले.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.