तैमूर नंतर जहांगीर वरून राडा सुरु झाला. पण या छोट्या नवाबाच्या नावाचा खरा अर्थ काय आहे ?

फेब्रुवारी २०२१ मध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दुसरा मुलगा झाला. आता इथं वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याचं नाव काय ठेवलंय ते माहित आहे ? म्हणजे बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या नाही म्हणून काय झालं. सोशल मीडिया आहेच की, सगळी माहिती मिळते. पण करीना कपूरचे पप्पा आणि मुलाचे आजोबा रणधीर कपूर यांनी सांगितले, प्रत्येकजण त्याला ‘जेह’ म्हणतो. परंतु अलीकडेच करिनाने दुसऱ्या मुलाच्या पूर्ण नावाची माहिती दिली. जहांगीर असं त्याच नाव.

मग काय, आता गोंधळ सुरू झालाय ना.

नावात काय असतं ओ ?

जहांगीर. मुघल शासक ज्याने आपल्या वडिलांच्या, अकबरानंतर भारतातील मुघल सल्तनतची सत्ता मजबूत केली. कला आणि संस्कृती टिकवण्यासाठी खूप काम केले. पण आज तुम्हाला इतिहासाच्या जहाँगीरची नव्हे तर वर्तमानातील जहांगीरची गोष्ट सांगणार आहोत.

या जहांगीरची गोष्ट नुकतीच सुरू झालीय. कारण त्याचा जन्म फेब्रुवारी२०२१ मध्ये झालाय. आम्ही बोलतोय सैफ अली खान आणि करीना कपूर खानच्या पुत्ररत्नाबद्दल. करीना कपूरने नुकतेच तिच्या गर्भारपणाच्या अनुभवावरील पुस्तकाच्या प्रकाशना प्रसंगी तिच्या लहान मुलाचे नाव उघड केले.

नाव जहांगीर. मग काय, सोशल मीडियावर पार ट्रोलिंग सुरु झालं ना. नुसता राडा. मग विचार केला तर शेक्सपियरचा डायलॉग आठवला. “नावात काय आहे” पण पोकळ वाटला.

आता ट्रोल करणारे काय म्हणतात ते बघुयात..

ज्यांनी सोशल मीडियावर जहांगीरच्या नावावर राग व्यक्त केला त्यांनी अनेक प्रकारचे तर्क मांडले. लोक त्याला हिंदूविरोधी म्हणू लागले.

एकाने ट्विट केलंय.

तैमूर आणि जहांगीर ही फक्त नावे नाहीत तर हिंदूंच्या तोंडात दिलेली चपराक आहे. सैफ आपल्या मुलांची नावे कलाम आणि इरफान पण ठेवू शकला असता. 

एकाने तर हद्दच केलीय,

तैमूर हा एक दहशतवादी होता ज्याने लाखो हिंदूंची हत्या केली. जहांगीरने १६ जून १६०६ रोजी शिखांचे पाचवे गुरु अर्जन देवजी यांची हत्या केली. कारण ते गुरु नानकांची शिकवणी पुढे नेण्यापासून रोखण्यास सहमत नव्हते. 

पण या ‘जहांगीर’ला तर लोकांची काही हरकत नसायला पाहिजे. 

ट्विटरवर करीना कपूर आणि सैफ अली खानला ट्रोल करणारे विसरले की देशात स्वत:चे नाव जहाँगीर ठेवण्याची ही पहिलीच वेळ नाही. या ट्रोलर्सना काही नावांची आठवण करून द्यायची गरज आहे. पहिले नाव त्यांचे आहे जे देशाचे असे व्यापारी होते ज्यांचं नाव आपण अभिमानाने घेतो.

होय आपण जेआरडी टाटाबद्दल बोलत आहोत. त्यांचे पूर्ण नाव होते – जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. ना आपल्याला यांच्या नावापासून प्रॉब्लेम आहे ना त्यांच्या कंपनीचा प्रॉब्लेम आहे. चहापासून मोटारींपर्यंत सर्वलोक अगदी आवडीने टाटा ब्रँड घेतात.

आता आणखी एका जहाँगीरबद्दल बोलूया.

विज्ञान जगात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. विशेषत: भारतात त्यांना अग्रगण्य शास्त्रज्ञाचा दर्जा आहे. होमी जहांगीर भाभा अस नाव आहे त्यांचं. अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा हे भारताच्या अणू कार्यक्रमाची पायाभरणी करणारे पहिले व्यक्ती होते.

म्हणजे एखाद्या नावाला केवळ एखाद्या व्यक्तिमत्त्वाशी जोडूनच का पाहिले पाहिजे. मुघल शासक जहांगीर वगळता जगात अनेक जहाँगीर झाले आहेत. कोणी त्यांचा आदर्श पुढ्यात ठेऊन आपल्या मुलांना नाव देऊ शकत नाही का ?

एखाद्या व्यक्तीचे आयुष्य केवळ त्याच्या नावाशीच का जोडले पाहिजे? जर आसाराम किंवा राम रहीम तुरुंगात त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असतील तर लोकांनी आपल्या मुलांची नावे आसाराम किंवा राम आणि रहीम असे ठेवणे बंद करावे का ?

आता जहांगीर नावाचा अर्थ जाणून घेऊया.

ज्या नावाबद्दल खूप गोंधळ सुरूय ना त्या नावाचा अर्थ जाणून घ्या. तीच खरी गोष्ट आहे. जहांगीर हा फारसी भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ- संपूर्ण जगाचा विजेता. आता एक सांगा, कोणाला वाटणार नाही कि आपल्या मुलाचं नाव विश्वविजेता असू नये. आणि फारसी भाषेत असल म्हणून काय झालं. नाव तर नावच आहे. जहांगीर नावाचे एक रत्न देखील आहे.

आणि राहता राहिला प्रश्न नावाचा, तर अहो देशात एवढे गंभीर प्रश्न आहेत, पेगासस, शेतकरी मुद्दा असले प्रश्न सुरूयत आणि तुम्ही कशाला त्या करीना आणि सैफच्या घरात डोकावताय. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेऊ नाहीतर औरंगजेब आपल्याला काय करायचंय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.