लगान, दिल चाहता है आमिरच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले, किरण देखील त्याचा पार्ट होती.

सुरुवाती पासूनच बॉलीवूडमध्ये आपण सर्रास ऐकत, पाहत आलोय कि, या दुनियेतील मंडळी त्यांच्या नातेसंबंधामुळे ते बरेच चर्चेत असतात. आपल्याला त्याचं फारसं वावगं वाटतही नाही पण आजच्या किरण राव आणि आमीर खान यांच्या घटस्फोटाची बातमी हि मात्र सर्वांसाठीच धक्कादायक आहे.

कारण हे कपल म्हणजे अनेकांसाठी एक आयडियल कपल होते. त्यांना चाहते प्रेमाने ‘पावर कपल’ही म्हणायचे.

किरण राव हिने कदाचित बॉलिवूडमधील सर्वात सामर्थ्यवान पुरुषांपैकी एक असलेला आमीर खानसोबत विवाह केला. त्यांचे वैवाहिक आयुष्य पुढे जात होते तसेतसे ते दोघेही एक वैवाहिक जोडपे म्हणून साधे, आनंदी आणि स्वावलंबी अशी ओळख म्हणून वावरायचे.

अभिनेत्री अदिती राव हैदरी ही किरण रावची चुलत बहीण आहे. त्यांचे आजोबा जे. रामेश्वर राव हे हैदराबादच्या वनापर्थीचे राजा होते. निजामाच्या काळात वनापर्थी हा तेलंगानाचा जिल्हा होता. 

तिच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिची ओळख आमीर खानची पत्नी म्हणण्यापेक्षा तिला किरण राव म्हणलं जातं त्याचे संपूर्ण श्रेय तिला आणि तिच्या संघर्षाला जाते.

मुळची बेंगळुरची असलेली किरण ने आपले कर्तुत्व आणि तिची तल्लख बुद्धीमत्ता हि आपल्या बॉलीवूड ला दाखवूनच दिली आहे. त्यानंतर १९९२ मध्ये तीचे कुटुंब मुंबईला शिफ्ट झाले.

१९९५ मध्ये तिने सोफिया कॉलेज कॉलेजमधून फूड सायंसची डिग्री घेतली आणि नंतर करिअर साठीचा एक नवीन आणि हटके कोर्स निवडला तो म्हणजे सोशल कम्युनिकेशन्स मीडिया. आणि त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. ती त्या दरम्यान करिअरच्या योग्य ट्रॅकवर होती. तिने जामिया मिलिया इस्लामिया मधून मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटरमध्ये मध्ये डिग्री मिळवली.

आणि किरण यांनी त्यांच्या करीयरची सुरुवात केली ‘लगान’ या चित्रपटापासून…

खरं तर या ‘लगान’ चित्रपटाचे डायरेक्टर आशुतोष गोवारिकर आणि असिस्टेंट डायरेक्टर हि किरण होती. तसेच तिने ‘दिल चाहता है’ मधेही एक छोटीशी भूमिका निभावली होती. 

आमिर खानचे प्रोडक्शन हाऊस निर्मित झालेल्या ‘धोबी घाट’ फिल्म किरण राव ने लिहिली होती तसेच ती फिल्म डायरेक्टही केली होती. तसेच पाणी फौंडेशन प्रोजेक्टचे ‘तुफान आलंया’ हे मराठी गाणे किरण ने गायले होते.

मान्सून वेडिंग फिल्ममध्ये किरण राव ने सेकंड असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच चित्रपटाचा भाग असलेल्या आमीर खानच्या खाजगी आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडत होत्या, त्याच्या पहिली पत्नी रीना दत्त २००२ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. ‘कयामत से कयामत तक’ दरम्यान दोघांचे प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले होते. तब्बल १५ वर्षाचा हा प्रेमविवाह होता.

परंतु या घटस्फोटादरम्यान किरण आणि आमीरमध्ये कसल्याही प्रकारची ओळखही नव्हती.

परंतु त्याच्या बऱ्याच काळानंतर आमीर आणि किरण दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेम झालं आणि २००५ मध्ये ते लग्नही करतात.  तसेच डिसेंबर २०११ मध्ये त्या दोघांनी सेरोगेसीद्वारे एका मुलाला जन्म दिला ज्याचं नाव आझाद ठेवलं, त्यांच्या या निर्णयाचे तेंव्हा बरेच कौतुक देखील झाले होते.

तिने तिच्या मुलाखतीत सांगितले होते कि,  मला सहाय्यक दिग्दर्शक व्हायचे होते. बंगळूरमधला माझा एक जुना प्रियकर जाहिरातीमध्ये काम करीत होता तेंव्हा त्याने मला अ‍ॅड फिल्ममेकर शामिन देसाई बद्दल सांगितले. मी शमीनला माझा अर्ज पाठवला आणि तिथे माझे सिलेक्शन झाले आणि करियर मधला मार्ग आता जलदरीतीने चालू झाला होता.

तिथे तिला दरमहा १० हजार पगार मिळायचा आणि १९९८ च्या काळात हि मोठी रक्कम होती. शिवाय तिथला अनुभव तिच्यासाठी फार मोठा होता.

तिच्या डोक्यात मात्र स्वतःचा चित्रपट काढायचंच असं स्वप्न होतं.

आणि तिने ती नोकरी वर्षभरातच सोडली. आणि तिची वर्णी लगानची असिस्टंट डायरेक्टर म्हणून लागली. तिथं मात्र तिचा कसं लागला. तिच्यावर ११ भारतीय, ११ ब्रिटीश आणि १५०० गावकऱ्यांची जबाबदारी होती.

ती सांगते या लगान च्या अनुभवातून ती बरीच काही शिकली आहे, लोकांशी कसे वागावे , त्यांचे आभार कसे मानावे, इत्यादी. कलाकारांच्या शूट साठी लागणाऱ्या प्रतिभा, त्यांचे हेअरस्टाईल, कपडे, मेकअप इत्यादी कसं ठरवावं हे सर्व तिचीच जबाबदारी होती.

लगान मध्ये इतक्या मोठ्या संखेने कलाकार होते कि त्यांची हजेरी च किरण ला घ्यावी लागायची.  त्यांचे वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक होते. तिने त्यादरम्यान तिचा ९०% वेळ मेकअप रूममध्ये घालवला होता. तिने यावर काम करतांना इतिहासाची बरीच पुस्तके वाचली. त्यादरम्यान ती आमीरला ओळखत नसली तरीही त्यांची सेटवर अनेकदा भेट व्हायची.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.