भारतात तयार झालेला जेल पेन हा जगभरातल्या ऑफिसमध्ये राज्य करतो.
परीक्षा आल्यावर पेपर नीट लिहिला जावा म्हणून चांगला पेन घेण्याकडे पोरांचा कल असायचा. म्हणजे बोर्डाची परीक्षा आल्यावर मुलांसाठी आईवडील महागातले पेन घेऊन द्यायचे मात्र ज्यांच्याकडे महागातले पेन घेण्याची परिस्थिती नव्हती अशा पोरांसाठी त्यावेळी सुंदर हस्ताक्षर आणि पटपट चालणारा पेन बाजारात आला होता, पुढे तो जेल पेन म्हणून प्रसिद्ध झाला. या पेनची निर्मिती आणि त्याचा इतिहास मात्र जबरदस्त आहे.
लिंक पेन अँड प्लास्टिक लिमिटेड हि ७० च्या दशकात उदयास आलेली कंपनी.
कंपनीचं उद्देश इतकचं होतं कि फायदेशीर आणि स्वस्त पेन विद्यार्थ्यांना मिळो. या कंपनीची स्थापना सुरजमल जालान यांनी केली. ज्यावेळी ते राजस्थानवरून कोलकात्याला शिकायला गेलेलं त्यावेळी त्यांना पेनासंबंधी बऱ्याच अडचणी आढळून आल्या. चांगल्या गुणवत्तेचे पेन महाग असल्यामुळे त्यांना ते विकत घेता आले नाही.
त्यावेळी भारतात पेन , पेन्सिल यांच्याविषयी जास्त संशोधन झालेलं नव्हतं. फाउंटन पेन आणि बॉल पॉईंट पेन यांची किंमत त्याकाळी जास्त होती. सुरजमल जालान यांनी दोन मित्रांच्या मदतीने कर्जाऊ पैसे घेऊन पेन तयार करण्याची कंपनी उभी केली. या पेन बनवणाऱ्या कंपनीत जर्मनी कडून शाई आणि स्वित्झर्लंडकडून पेनाची निब आयात केली. या कंपनीत तयार झालेला पेन दोन रुपयाला विकला गेला.
सुरजमल जालान हे दुकानांमध्ये आणि शाळेंमध्ये स्वतः जाऊन पेन विकायचे. विध्यार्थ्यांना पेनाबद्दल विचारायचे आणि विद्यार्थ्यांना पेन चालवणं सोयीस्कर कस पडेल अशा पद्धतीचे बदल ते करत राहिले.
पुढे त्यांचा व्यवसाय वाढीस लागला. पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील काही भागात त्यांच्या कंपनीचं नाव होऊ लागलं. १९९५ साली हि कंपनी सार्वजनिक झाली. आशियातील काही देश, यूएसए आणि आफ्रिका अशा देशांमध्ये त्यांच्या कंपनीत तयार झालेले पेन निर्यात होऊ लागले.
भारतात हा व्यवसाय पसरण्याआधीच लिंक पेन ने विदेशात आपला जम बसवला होता. २००८ साली भारतात प्रमोशन करण्यासाठी त्यांनी किंग खान शाहरुखला आपल्या जाहिरातीत काम करायला सांगितलं होतं. शाळेतल्या जवळपास बऱ्याच मुलांच्या दप्तरात आढळणारा पेन म्हणजे लिंक पेन. भारतात आणि परदेशात या पेनची प्रचंड मागणी असते.
५ रुपयांच्या या पेनच्या कंपनीची आर्थिक उलाढाल हि ४०० कोटींची आहे. हि कंपनी दर महिन्याला ५ मिलियन पेन तयार करते.
लिंक पेन कंपनीची प्रगती बघून जपानच्या मित्सुबीशी या पेन्सिल कंपनीने आपली गुंतवणूक लिंक पेनमध्ये केली आहे.
पर्यावरण संवर्धनाबाबतही हि कंपनी जागरूक असून त्यांनी आपली जुनी पद्धत मोडीत काढीत रिफिलेबल पेन बाजारात आणले. लिंक हि कंपनी केवळ पेन निर्मिती न करता स्टेशनरी आणि इतर वस्तूंचीही निर्मिती करते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि गरीब असणाऱ्या लोकांना चांगल्या क्वालिटीचा आणि उत्तम पेन आपल्याच कंपनीत तयार झाला पाहिजे असं धोरण या कंपनीचं असुन त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करतात. पेन तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत मात्र लिंक ने आपलं वजन जे बाजारपेठांमध्ये आणि जगामध्ये निर्माण केलंय त्याला स्पर्धा नाही.
ज्यावेळी इतर कंपन्यांचे जेल पेन बाजारात वीस रुपयाला विकले जात होते त्यावेळी या संधीचा फायदा उचलत लिंकने आपल्या कंपनीचा जेल पेन १० रुपयाला विकायला सुरवात केली आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी लिंक ओशल जेल पेन हा केवळ पाच रुपय किंमत ठेवून विक्री केली.
आजही या पेनची किंमत ५ रुपये आहे. लिंक ओशल जेल पेन हे परीक्षांच्या सिजनमध्ये सर्वात जास्त विक्री होणारं पेन आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पेनाची विक्री करणारी हि तिसरी कंपनी आहे.पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर असा सगळा सेट लिंकने मार्केटमध्ये आणला आहे.
सध्या या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक दीपक जालान हे आहेत. ग्रामीण भागात जी गोष्ट चालते ती जगभरात चालते याच उदाहरण म्हणजे लिंक पेन असं ते सांगतात. मार्केटिंग आणि उत्पादनाचा विस्तार चांगल्या प्रकारे केला तर व्यवसाय वधारतो , सुरवातीपासूनच आमचं हे ध्येय होतं.
हे हि वाच भिडू :
- लोखंडाचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने संपूर्ण जगाला दाढी करायला शिकवलं….
- मुंबईच्या या भिडूने उभारला वडापावचा १०० कोटींचा व्यवसाय….
- २० शेळ्यांपासून सुरवात करून आज त्यांनी करोडो रुपयांची उलाढाल केली आहे
- “अच्छा सिला दिया ” म्हणत भारताला रडवणारा हिरो आजही हजारो कोटींचा मालक आहे