आपण फोटो बघत राहतो, पण सेलिब्रेटींच्या लग्न कारण्यातही कोटींच्या बिझनेसचं गणित असतंय

रणबीर कपूर आणि आलीया यांचं लग्न झालं. माहीत नाय पंडितजी असले काय जोक मारत होता की यांचे नुसते हसल्याचेच फोटो बाहेर आले. बरं त्यांना भरभरून लाइक्स देखील मिळाले. पार आलियाच्या नागरिकत्वावरून ते त्यांनी लग्नात चारंच फेरे का घेतले याच्या तिखटमीठ लावून चर्चा झाल्या.

पण या दोघांच्या लग्नामागचं बिझनेस गणित कोणी बघितलं का?

पाहिलंच सांगून टाकतो रणबीर आलियाने लग्नात फक्त २८ लोकंच बोलवली आणि लाखो रुपये वाचवले हा असलं पांचटपणा या स्टोरीमध्ये नाहीये. तर विषय त्या पेक्षाही बराच डीप आहे.

आलीय भट आणि रणबीर यांच्या लग्नानंतर विरुष्का ,दीपवीर नंतर एक नवीन पॉवर कपल इंडस्ट्रीला मिळालं आहे.

आणि या पॉवर कपलची ब्रँड व्हॅल्यू कोट्यवधींच्या घरात जाणारी आहे. २०२१ मध्ये डफ अँड फेल्प्सच्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन अहवालानुसार आलीय भटची ब्रँड व्हॅल्यू आहे ६८ मिलियन डॉलर. तर रणबीर कपूरची ब्रँड व्हॅल्यू आहे २६ मिलियन डॉलरच्या घरात आहे. आणि जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा नुसत्या या आकडेवारीवरून त्यांची ब्रँड व्हॅल्यू करोडोंच्या घरात जाईल.

आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हा तिसरा ब्रँड तयार होतो तो म्हणजे या दोघांचा कपल म्हणून असलेला ब्रँड.

याची सुरवात होते कपल म्हणून असलेली या दोघांची क्रेज. रणबीर आलीय यांच्या लग्नानंतर अजूनही #Ralia हा ब्रँड ट्रेंडिंगवर आहे. त्यावर होणाऱ्या लाखो एंगेजमेंट्सवरून आपल्याला या जोडीच्या फॅनफॉलोविंगचा अंदाज येतो.

याआधीही रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाच्या वेळी सोशल मीडियावर #DeepVeer  या हॅशटॅगला ०.५६ मिलियन मेन्शन मिळाले होते. विराट आणि अनुष्काच्या लग्नावेळीही #Virushka हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. आणि एवढी लोकप्रियता मोठे ब्रॅण्ड्स कॅप्चार करणार नाहीत असं होईल का?

आणि यातूनच हे सेलिब्रिटी बनतात पॉवर कपल.

पॉवर कपलचा प्रभाव आणि पोहोच कोणत्याही ब्रँडला एक नवीन चेहरा देऊ शकते ज्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक आकर्षित होऊ शकतात. त्या ब्रँडशी कनेक्ट होऊ शकतात. त्यात भारतातील बहुतेक ग्राहक बॉलिवूडचे  फॅन्स आहेत त्यामुळे सेलिब्रिटीजनी केलेली जाहिरात नेहमीच फायद्याची राहिलेली आहे. आणि त्यात असं जोडपं भेटला तर विषयच वेगळा असतो.

त्यामुळं आलिया भट्ट आणि रणबीर कपूर गुरुवारी लग्नाच्या बेडीत अडकत होते त्या आधीच तज्ञांनी सांगितले होते की त्यांच्या ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

जाहिरातदारांमध्ये या सेलिब्रिटी जोडप्याच्या भोवतीच्या चर्चांचा फायदा घेण्यासाठी स्पर्धा असणार आहे.

द हिंदू बिझनेसलाइनशी बोलताना  ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट हरीश बिजूर सांगतात

“मला विश्वास आहे की, विराट आणि अनुष्का, दीपिका आणि रणवीरच्या रँकिंगला आलिया आणि रणबीर ही जोडी तगडं आव्हान देऊ शकते. पॉवर-कपल मधली केमिस्ट्री ब्रँड एंडोर्सर्सच्या खेळात ब्रँडला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकते. त्यामुळं इथं एक अधिक एक म्हणजे दोन नं राहता ते पाच होतं.”

असं भारताच्या लोकसंख्येचं गणित पण इजा कपल्सला फायद्याचं ठरतं.

भारतात २५ ते ३४ वर्षे वयोगटातील सुमारे ८०% लोकसंख्या विवाहित आहे. त्यामुळं हा जनतेला टार्गेट करण्यासाठी  पॉवर कपल्स आपल्या ब्रँडसाठी एकदम परफेक्ट चॉईस ठरतात.

त्यामुळेच लग्नाआधीच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सने डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या भारतातील टॉप पॉवर कपल्सच्या सर्व्हेमध्ये भट आणि कपूर चौथ्या क्रमांकावर होते.

याबाबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (आयआयएचबी) चे चीफ मेंटर संदीप गोयल सांगतात

“रानलिया हे निश्चितपणे पॉवर कपल आहेत. त्या दोघांकडेही जबरदस्त अर्बन स्वॅग आहे आणि हे ब्रँडसाठी आकर्षक आहे. मिलेनियल जनरेशन ला टारगेट करण्यासाठी हि जोडी  परफेक्ट फिट बसते.”

आता सांगितलं रणबीर आलीय यांना कसा फायदा आहे ते बघितलं. आता जाणून घेऊया या आधी ज्यांची लग्न झाली आहेत त्यांना कसा फायदा झाला आहे. याची जास्त नाहीत पण एक दोन उदाहरणं तरी बघू.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 

मिंत्रा, मान्यवर या ब्रँड्स विरुष्काला साइन करण्यासाठी चढाओढ लागली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रँड एंडोर्समेंट फी म्हणून जोडपं १० कोटीच्या खाली उतरतच नाही.

विरुष्काची ब्रँड मूल्य सुमारे २०० दशलक्ष डॉलर्सच्या घरात असल्याचं सांगण्यात येतं.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सच्या रँकिंगनुसार भारतातलं तिसरं पॉवरफुल कपल असलेलं हे जोडपं त्यांच्या हाय क्वालिटी, ऑथेंटिक, फिट आणि ऍक्टिव्ह या फीचर्ससाठी ओळखलं जातं.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 

दोन एकदम विरुद्ध पर्सनॅलिटीच्या या जोडप्याची ब्रँड व्हॅल्यू पण जबरदस्त आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्सच्या रँकिंगनुसार भारतातलं हे दुसरं पॉवरफुल कपल आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे फन लविंग, चार्मिंग आणि एक वेगळंच कपल असल्याने त्यांची इंडस्ट्रीत जबरदस्त मागणी असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

आता विषय जरी पॉवर कपलचा असाल तरी इथं ही टॉपला अंबानीच आहेत. नीता आणि मुकेश अंबानी हे भारतातलं सगळ्यात पॉवरफुल ब्रँड असलेलं जोडपं आहे.

त्यामुळं लग्नाच्या मागे पण कसा करोडोंचा बिझनेस आहे हे मात्र आता फिक्स झालंय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.