माधवराव सिंधिया यांना त्यांच्याच राजवाड्यात राहण्यासाठी भाडं द्यावं लागायचं….

मध्य प्रदेशचा राजकारणाचा इतिहास निघतो तेंव्हा विजया राजे सिंधिया आणि माधवराव सिंधिया यांच्या स्टोरी सांगितल्याच जातात आणि त्या तितक्याच लोकप्रिय देखील आहेत.  

विजयाराजे प्रथम कॉंग्रेस मध्ये होत्या पण जेंव्हा इंदिरा गांधीनी संस्थानांचे विलीनीकरण करून राजघराण्यांची संपत्ती सरकारी म्हणून घोषित केली होती. त्यावरून

इंदिरा यांच्याशी वाद होऊन त्यांनी कॉंग्रेस सोडली आणि जनसंघात सामील झाल्या.

त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र माधवराव देखील जनसंघात दाखल झाले परंतु त्या ठिकाणी फार काळ टिकले नाही. ते पुन्हा कॉंग्रेस मध्ये परतले. आणि याच कारणामुळे विजयाराजे आणि माधवराव यांच्यात संबंध बिघडायला सुरुवात झाली. दोघे एकमेकांच्या विरोधात

आणीबाणीच्या काळात विजयाराजे यांना जेंव्हा अटक झाली त्यात आपल्याच मुलाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

विजयाराजे यांना जेव्हा पोलिसांकरवी मारहाण होत होती तेव्हा माधवराव तिथंच उपस्थित होते, असं सांगण्यात आलं. वास्तविक, राजमाता विजयाराजे सिंधिया या भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होत्या, त्यामुळे दोघांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आई आणि मुलामध्ये असलेले कौटुंबिक संबंध हळूहळू संपू लागले.

राजमाता विजयाराजे सिंधिया आणि त्यांचा मुलगा माधवराव यांच्यातल्या वादातले अनेक किस्से सांगितले जातात. एक काळ असा होता कि, एकुलता एक लेक असणाऱ्या माधवरावांना राजमातेने अनेक प्रकारे अडचणीत आणले होते जेंव्हा त्यांचे सबंध अत्यंत वाईट होते.

याचा अंदाज आपण यावरूनही लावू शकतो कि राजमातेने १९८५ मध्ये स्वतःच्या हातून लिहिलेल्या  त्यांच्या मृत्यूपत्रात नमूद केले होते कि, मी गेल्यानंतर माझा मुलगा अंत्यसंस्काराच्या माझ्या मुलाच्या हातून होऊ नयेत, तसेच तो यात्रेत देखील सामील होणार नाही. मात्र २००१ मध्ये त्यांचं निधन झालं तेव्हा राजमातेला मुखाग्नी माधवरावांनीच दिला होता असो.

तशीच एक गोष्ट म्हणजे, राजमातेला माधवरावांवर इतका राग होता की त्यांनी एका घरात राहून आपल्या मुलाकडून घरात राहण्यासाठी भाडे आकारले होते.

एके दिवशी राजमाता रागाने माधव राव यांना ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसमध्ये राहण्यासाठी भाडे मागितली. हे भाडे काही फार मोठे नव्हते. फक्त एक रुपया मागितला होता, पण या मागे माधवराव सिंधियाचा अपमान होण्यासाठी हि कृती त्यांनी केली होती.

हा ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसची निर्मिती १८७४ मध्ये झाली. या वाड्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्यातला दरबार हॉल.

या हॉलमध्ये ३५०० किलो वजनाचा झूमर लटकविण्यात आला आहे.

असे म्हटले जाते की छतावरून झूमर लटकवण्यापूर्वी ते छत तेवढं ओझं पेलू शकेल का हे तपासण्यासाठी  छतावर एकत्रच १० हत्तींना चढवण्यात आले होते. १४० वर्षांपासून हे झुमर अजूनही भक्कमपणे छताला लटकवलेल्या अवस्थेत आहे. 

हा झूमर बेल्जियन कारागीरांनी बनविला होता. दुसरीकडे जर आपण संपूर्ण वाड्याबद्दल सांगितले तर ते १२ लाख चौरस फूट भागात पसरलेले आहे. यात एकूण ४०० खोल्या आहेत. ज्यांच्या ४० खोल्यांत आता संग्रहालय बनविण्यात आले आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.