कोयना की जायकवाडी ? ही आहेत महाराष्ट्रातील टॉप ५ धरणे..

महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण धरणांची संख्या ३,२६४ इतकी सांगितली जाते, तर या एकूण धरणात असणारा एकूण पाणीसाठ्याची क्षमता १७२० TMC असल्याची माहिती मिळते. साधारण कोणतही धरणं लहान किंवा मोठ्ठ हे त्याच्या आकारमानवरून न ठरवता ते धरणं किती पाणी साठवू शकत या क्षमतेवर पाहिलं जातं.

एखादं धरणं जितकं पाणी साठवतं तितकं ते मोठ्ठ. हा पाण्याचा साठा TMC मध्ये मोजला जातो. TMC म्हणजे एक हजार मिलीयन क्युबिक फूट. म्हणजेच साधारणं २८६१ कोटी लिटर. याच TMC च्या क्षमतेवरून एखादे धरणं कितपण उपयोगी पडते याचा अंदाज बांधता येतो.

याच गृहितकावर बोलभिडू आपणसमोर महाराष्ट्रातील पाच प्रमुख धरणांची माहिती देत आहे.  

१) कोयना धरण. 

Screenshot 2020 08 09 at 4.13.43 PMपहिलं धरण आहे, कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या जलसाठ्याला शिवसागर जलायश असे नाव देण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण असून धरणाची उंची १०३.२ मीटर आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. १९५४ साली हे धरण बांधण्यास सुरवात करण्यात आली तर १९६७ साली धरणाचं बांधकाम पूर्णत्वास गेले. कोयना धरणाची क्षमता 105 TMC इतकी आहे. या पाण्याचा वापर प्रामुख्याने विद्युत निर्मीतीसाठी केला जातो. ६ मोठे दरवाजे असणारे हे धरण महाराष्ट्रासाठी उपयुक्त असे धरणं समजले जाते.

Location : Patan, Satara

TMC : 105

2) जायकवाडी धरण 

Screenshot 2020 08 09 at 4.15.19 PM

मराठवाड्याच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणारे धरण म्हणजे जायकवाडी धरण. धरणाच्या मागे असणाऱ्या विस्तृत जलसाठ्यास नाथसागर म्हणून ओळखले जाते. हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण असून या धरणाची पाणीसाठवणूक क्षमता 102 TMC इतकी आहे.

धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाच्या लाभक्षेत्रातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी व नांदेड या जिल्ह्यांचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न संपतो.

९,९९७ मीटर लांबीचे हे धरण मराठवाड्याचा समुद्र म्हणून ओळखले जाते. धरणाची उंची ४१. ३ मीटर इतकी आहे. धरणाच्या बांधकामाला १९६४ साली सुरवात करण्यात आली तर १९७६ साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. डावा व उजव्या कालव्यासह वीजनिर्मीतीसाठी धरण फायद्याचे ठरत आहे.

Location : Paithan, Aurangabad

TMC : 102

३) उजनी धरण 

Screenshot 2020 08 09 at 4.18.00 PM

उजनी धरण दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरवर येतं. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापुर मधील टेंबुर्णी या दोन शहराच्या मध्ये भीमा नदीवर उजनी धरण बांधलेलं आहे. १९६९ ते १९८० या काळात धरणाचं बांधकाम झालेलं आहे. उजनी धरणाची उंची ५६.४ मीटर म्हणजेच १८६ फुट तर लांबी २५३४ मीटर म्हणजेच ८३१४ फुट इतकी आहे.

उपयुक्त जलसाठा 53 TMC इतका आहे. एकूण जलसाठा पाहिला तर तो उपयुक्त पेक्षा दुप्पट म्हणजे 110  TMC इतका आहे. या धरणाची वीजनिर्मितीची क्षमता १२ व्याट इतकी आहे. उजनीतुन दोन कालवे जातात. उजनीच्या पाणीसाठ्याला यशवंत सागर असेही म्हंटलं जातं. धरणाला एकूण तब्बल ४१ दरवाजे आहेत. जास्त दरवाजे असलेलं महाराष्ट्रातील उजनी हे पहिल्या नंबरचं धरण आहे.

Location : Temburni (Pune-solapur)

TMC : 110-53

४) तोतलाडोेह 

Screenshot 2020 08 09 at 4.19.23 PM

महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या आणि जास्त उपयुक्त पाणीसाठा असलेल्या धरणांच्या यादीतील चौथं धरण आहे, तोतलाडोह धरण. हे धरण महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेलं आहे. नागपूर आणि छिंदवाडा या दोन्हींच्या सीमेवर तोतलाडोह धरण आहे.

या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा साऱ्या राज्यात येत असल्याने हे धरण महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. पेंच नदीवर तोतलाडोह हे धरण बांधण्यात आलेलं आहे. धरणाची उंची ७४.५ मीटर म्हणजेच २४४ फुट आहे तर लांबी ६८० मीटर २२३० फुट इतकी आहे.

या धरणाचा एकूण जलसाठा  43 TMC इतका आहे. त्याचबरोबर, उपयुक्त असणारा जलसाठा फक्त 38 TMC आहे.  हे धरण १९७८ ते १९८९ मध्ये बांधून पुर्ण झालेलं आहे. धरणाला एकूण १४ दरवाजे आहेत.

Location : Totladoh Pench (Nagpur)

TMC : 43

5) इसापूर धरण

Screenshot 2020 08 09 at 4.25.56 PM

इसापूर धरण हे महाराष्ट्रातील हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर, पैनगंगा नदीवर बांधलेलं धरण आहे. या धरणाची उंची ४७ मीटर म्हणजेच १८७ फुट तर लांबी ४१२० मीटर म्हणजेच १३५१७ फुट इतकी आहे. या धरणाचा एकूण जलसाठा हा ४४. २८ टी.एम.सी आहे आणि त्यातून उपयुक्त असलेला जलसाठा हा फक्त ३३. ५८ टी.एम.सी इतका आहे. धरणाला पुर्ण व्हायला एकूण ११ वर्षं लागली. १९७१ ते १९८२ या काळात धरण बांधून पुर्ण झालं. इसापूर धरणाला एकूण १५ दरवाजे आहेत.

या धरणाची उंची 57 मीटर म्हणजेच १८७ फुट तर लांबी ४१२० मीटर म्हणजेच १३५१७ फुट इतकी आहे. या धरणाचा एकूण जलसाठा हा 44 TMC आहे आणि त्यातून उपयुक्त असलेला जलसाठा हा फक्त  33 TMC इतका आहे.

धरणाला पुर्ण होेण्यासाठी एकूण ११ वर्षं लागली. १९७१ ते १९८२ या काळात धरण बांधून पुर्ण झालं. इसापूर धरणाला एकूण १५ दरवाजे आहेत.

Location : isapur (Hingpli-yavatmal) 

Capacity : 33.58 TMC

  •  भिडू कृष्णा वाळके 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.