आंब्याच्या पानात एवढी ताकत आहे की, या आजारांना मुळापासून संपवू शकते..

आंबा जसा फळाचा राजा आहे, तसाच तो आरोग्याचा राजा देखील आहे. आंबा हे फळच नव्हे तर आंब्याच्या झाडाची पाने देखील गुणकारी असल्याचे दाखले दिले जातात. मोतीबिंदू, तणाव, लठ्ठपणा आणि कॅन्सर सारख्या आजारांना आंबा बरा करतो. आंब्या सोबत त्याची पानही तेवढीच गुणकारी आहेत. आंब्यांच्या पानामध्ये मैगीफेरीन, गैलीन, ऍसिड आणि पॉलीफिनाल्स सारख्या तत्वन सोबत अनेक पोषण तत्वे सापडतात.

आंब्यांच्या पानांपासून होणारे फायदे. 

  • ब्लडप्रेशरच्या समस्येला दूर ठेवतो. 

ब्लडप्रेशर ची समस्या असणाऱ्या लोकांसाठी देखील आंब्याचे पान खूप उपयुक्त ठरते. ज्या व्यक्तीला ब्लडप्रेशर चा त्रास आहे त्याने आंब्याची पाने पाण्यात उकळवून त्या पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे हा प्रॉब्लेम कमी होतो.

  • अस्थमाच्या पेशंटसाठी गुणकारी. 

श्वासाचा त्रास असणाऱ्या व्यक्तीसाठी आंब्याची पान लाभदायक ठरतात. अस्थमा असणाऱ्या रुग्णांनी जर आंब्याच्या पानांचा काढा करून नियमित घेतले तर त्यापासून आराम मिळतो. अस्थमा असणाऱ्या माणसाला श्वास घ्यायला त्रास होत असतो. त्याच्यासाठी हा काढा रामबाण उपाय म्हणून काम करतो.

  • शुगर आणि किडनीस्टोन साठी उपयुक्त.

आंब्याच्या पानामध्ये अँटीडायबिटिक चे गुणधर्म असतात. त्यामुळे व्यक्तीचा वाढलेली शुगर लेवल कमी होण्यास मदत होते. त्याच्यासाठी आपल्याला आंब्याची पान सुकवून त्याची पावडर बनवावी लागेल. आणि त्याचे नियमित सेवन करावे लागेल. असं केल्याने काहीच दिवसांमध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये येईल. तसेच ते किडनी स्टोन साठी देखील उपयुक्त आहे. काही दिवस या पावडरचे सेवन केल्यानंतर किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.

  • उचकी येण थांबवतो.

काही जणांना उचकी आली कि त्याच्या वर कितीही उपाय केले तरी ती काही थांबायचं नाव घेत नाही. अशा वेळेस आंब्याच्या पानाची मदत घेता येते. आंब्याच्या पानांना उकळवून त्याच्या गुळण्या केल्या कि उचकी थांबते.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.