१४० कोटी लोकसंख्येच्या देशात २१२६ जणांच्या सॅम्पलने सिद्ध केलं, “मोदीच जगात भारी आहेत “

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सुद्धा भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा चाहता वर्ग कमी झालेला दिसत नाहीये.  हेच कारण आहे कि, अमेरिकेतल्या डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कंसल्टने  मोदींना रेटिंगमध्ये १०० पैकी ६६ पॉईंट दिले आहेत. आणि  ते या यादीत जो बायडन आणि   इतर जागतिक प्रमख नेत्यांपेक्षा पुढे आहेत.

या मॉर्निंग कंसल्टनच्या म्हणण्यानुसार  अमेरिका, ब्रिटन, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनी या १३ देशांच्या पंतप्रधानांपेक्षा पंतप्रधान मोदी रेटिंगमध्ये  पुढे आहेत. 

मॉर्निंग कन्सल्टनं १३ देशांच्या निवडणून आलेल्या लीडरच्या नॅशनल  रेटिंगचा मागोवा घेतलाय.  या कंपनीच्या डेटानुसार मोदींच्या लोकप्रियतेत मागील वर्षापेक्षा २० पॉईंटने घसरण झाली असली तरी ते या यादीत टॉपला आहे.

केवळ २,१२६ लोकांचा डेटा  गोळा केला 

कंपनीने ग्लोबल लीडर अप्रूवल रेटिंग गुरुवारी अपडेट केले, ज्यात या सर्वेसाठी भारतातल्या २,१२६  लोकांचा डेटा  गोळा केला गेलाय. ज्यानुसार ६६ टक्के  लोकांनी मोदींची बाजू घेतलीये, तर २८ टक्के लोक पंतप्रधानांवर नाखूष असल्याचे दिसतायेत. 

मात्र, या सँपल डेटावरून  नवीनच प्रश्न निर्माण व्हायला लागलेत.  सोशल मीडियावर लोक याबाबत बोलायला लागलेत. अनेकांनी हा अकाउंट डेटा फेक असल्याचे म्हटलंय.  एका युजरच्या म्हणण्यानुसार,

“१४० कोटीची लोकसंख्या असलेल्या देशांतून सव्वा दोन हजार फेक अकाऊंटच्या बळावर जगभरात लोकप्रिय नेते ठरणारे मोदी हे एकमात्र नेते असावेत.”

तसं, पाहायचं झालं तर सर्वेक्षणात असलेल्या  इतर देशांच्या मानानं भारताची लोकसंख्या जास्त आहे. यात केवळ २ हजार लोकांच्या म्हणण्यावरून ग्लोबल लीडर म्हणून अप्रूव्ह करण संशयास्पद वाटत. आता सगळ्या १४० कोटी जणांचं मत तर मांडता येणार नाही. पण सर्वेक्षणातला हा आकडा  सुद्धा लोकसंख्येच्या बेसिसवर किरकोळ असल्याचं म्हणतील जातंय.

ट्विटरवर अनेकांनी याबाबत मोदींची बाजू घेतली. तर  अनेकांनी त्यांची मस्करी देखील उडवली.

मॉर्निंग कन्सल्ट  पॉलिटिकल इंटेलिजन्स युनिटद्वारे डेटा गोळा करते, जे  राजकीय निवडणुकांच्या वेळी रियल टाइम पोलिंग   डेटा प्रदान करत. याआधी  ऑगस्ट २०१९ मध्ये मोदींनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणार कलम ३७० रद्द केलं होत. त्यावेळी त्यांच्या पॉझिटिव्ह रेटिंगचे प्रमाण ८२ टक्के तर निगेटिव्ह रेटिंगचं प्रमाण ११ टक्के होत.

https://twitter.com/anirbanganguly/status/1405761168203943936/photo/1

मात्र, यंदा यात घसरण झालेली पाहायला मिळतेय. यामागे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतली अनियंत्रित परिस्थिती असल्याचे म्हंटल  जातंय. या दरम्यान राज्य विरुद्ध केंद्र अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती.  एका वृत्तपत्राने सुद्धा गेल्या महिन्यात जगातील ५ नेते ज्यांनी कोरोनाच्या काळात खराब कामगिरी केली होती. यात नरेंद्र मोदींचे नाव जोडले होते. 

ग्लोबल लीडरच्या या अप्रूव्हलमध्ये मोदीं (६६%)च्या खालोखाल इटलीचे पंतप्रधान मॅरिओ ड्रॅगी (६५%), तर तिसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकन राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर (६३%) यांचा नंबर लागतो.

Leave A Reply

Your email address will not be published.