या ड्रोनने ओसामाचा अड्डा शोधून काढला होता, आता ते भारताच्या ताफ्यात येतंय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधानांचा हा अमेरिका दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा मानला जातो. यात आरोग्य, व्यवसाया संदर्भात अनेक महत्वाचे करार झाले. सोबतचं अत्यंत महत्वाची क्वाड बैठकही पार पडली.

त्याचप्रमाणे भारताने बायडन प्रशासनाला आपल्या संरक्षणविषयक चिंता व्यक्त केल्याचे म्हंटले जाते. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या धोक्यांदरम्यान भारत आता आपली लष्करी क्षमता वाढवण्याच्या तयारीत आहे.

रशिया आणि फ्रान्ससोबतच्या विमान करारानंतर भारत आता पहिल्यांदाचं अमेरिकेकडून सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याचा विचार करत आहे. भारत अमेरिकेकडून असे ३० ड्रोन खरेदी करत आहे, जे पाकिस्तान आणि चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकतील.

आता ड्रोन भारतीय लष्करी ताफ्यात सामील होणार या माहितीनचं चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढणार हे मात्र नक्की.

जाणून घेऊ या MQ-9 रीपर/प्रीडेटर बी ड्रोन्‍सची खासीयत

अमेरिकन सैन्यात हे ड्रोन खूप लोकप्रिय आहेत. अमेरिकेने या ड्रोनच्या मदतीने अनेक हल्ले केले आहेत. अनेक भयानक दहशतवाद्यांना ठार केले आहे. यात अल कायदाचा भयानक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा सुद्धा नंबर लागतो. कारण याचं ड्रोन च्या मदतीने ओसामा अमेरिकेच्या हाती लागला होता.

या ड्रोनद्वारे अमेरिकेने अनेक युद्धे जिंकली आहेत. हे ड्रोन इतके यशस्वी आहे की, आपल्या हल्ल्याने ते शत्रूला वाचण्याची कोणतीचं संधी देत नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान आणि चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेकडून ३० ड्रोन खरेदी करणार असल्याचं समजतंय.

या ड्रोनमध्ये सलग दोन दिवस उड्डाण करण्याची क्षमता असून ते त्यांच्यासोबत १७०० किलो भार वाहण्यास सक्षम आहेत. या सशस्त्र ड्रोनच्या माध्यमातून भारत चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेला सीमेवरील तणाव कमी करण्यास सक्षम असेल. ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्कर शत्रूचा कट आधीचं हाणून पाडू शकतो.

भारत अमेरिकेकडून खरेदी करत असलेल्या MQ-9 रीपर/प्रिडेटर बी ड्रोनची किंमत सुमारे २१,८३२ कोटी रुपये आहे. भारतातील ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेकडून हे ड्रोन खरेदी करण्याची इच्छा होती. या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतीय लष्करी ताफ्यात त्याचा समावेश होईल अशी अपेक्षा आहे. साहजिकच, या करारानंतर भारताच्या लष्करी सामर्थ्यात मोठी वाढ होईल. सध्या या ड्रोनचा वापर भारताच्या सीमेवर पाळत ठेवण्यासाठी आणि हेरगिरीसाठी केला जाईल.

गेल्या वर्षी, सीमा वादावरून जेव्हा चीन आणि भारताचे संबंध विकोपाला गेले होते. त्यावेळी देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सीमेवर पाळत ठेवण्याच्या उद्देशाने दोन निःशस्त्र MQ-9 प्रीडेटर ड्रोन भाड्याने घेतले होते. मात्र, त्यावेळी दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्रालयांनी ड्रोन खरेदीबाबत बोलण्यास नकार दिला.

असे मानले जाते की, अमेरिकेकडून येणारे ड्रोन भारतीय नौदलासह तैनात केले जातील. जेणेकरून भारताच्या दक्षिण भागावरही नजर ठेवता येईल. याशिवाय चीन आणि पाकिस्तानच्या सीमेच्या आसपासही तैनाती केली जाईल.

C-295 MW वाहतूक विमानाची चर्चा

मोदींच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिकेचे C -295 मेगावॅट वाहतूक विमानही चर्चेत आहे. C-295 MW हे ५-१० टन क्षमतेचे परिवहन विमान आहे जे कंटेम्परी टेक्नॉलॉजी सह येईल, जे भारतीय हवाई दलाच्या जुन्या Avro विमानांची जागा घेईल. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद वाढेल.

संरक्षण मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की, एअरबस संरक्षण आणि अवकाशातून १६ विमाने खरेदी केली जातील, जी उड्डाण स्थितीत असतील. याशिवाय, टाटासोबतच्या कन्सोर्टियमचा भाग म्हणून कंपनी भारतात ४० विमाने तयार करेल.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.