मोदींच्या लाडक्या अलिगढ कुलूपाला हलक्यात घेऊ नका. त्याचा इतिहास १५० वर्षे जुनाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. काल बुधवारी ते अमेरिकेसाठी रवाना झाले होते. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार असून तेथील महत्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत.

त्यांच्या याच अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी टाकलेला त्यांचा विमानात काम करतानाचा एक फोटो पोस्ट केलाय.

 

मोदींच्या या फोटोमधील एक-एक बारीक गोष्ट नेटकऱ्यांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. ते म्हणजे मोदींच्या बाजूला ठेवलेली बॅग आणि त्याला लावलेले छोटसं कुलूप. लोकांना याचं आश्चर्य वाटलं. मोदींची हि पोस्ट सगळीकडे व्हायरल झाली आणि लोकांनी आप-आपल्या सुपीक डोक्यातून आलेले मिम्स शेअर करायला सुरु केली.

पण मोदींचा आणि कुलुपांचा तसा लै जुना संबंध आहे. तुम्हाला माहित नसेल म्हणून भिडू तुम्हाला मोदी आणि त्यांच्या कुलपांच्या गोष्टीची जुगलबंदी सांगणार आहे. 

तर मोदींनी स्वतः त्यांची गोष्ट यूपीत एका कार्यक्रम दरम्यान सांगितली होती. मोदी उत्तर प्रदेशच्या  अलीगढ यूनिवर्सिटीच्या शिलान्यास कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या लहानपणीच्या कुलुपांची गोष्ट आठवली.

ही गोष्ट आहे ५० ते ६० वर्षांपूर्वीची. मोदींच्या लहानपणी त्यांच्या घरी अलिगढ वरून एक कुलुपांचे मुस्लिम व्यापारी यायचे. ते व्यापारी मोदींच्या वडिलांचे मित्र होते. ते दर तीन महिन्यांनी मोदींच्या गावी यायचे. एक चार पाच दिवस राहायचे.

आजूबाजूच्या गावात जाऊन आपली कुलूप विकायचे. आणि त्या विक्रीतून मिळालेले पैसे मोदींच्या वडिलांकडे साठवायला द्यायचे. सगळा माल विकून झाल्यावर आपल्या गावी म्हणजेच अलिगढला परतत असताना पैसे घेऊन जाण्यासाठी परत ते मोदींच्या घरी भेट द्यायचे. मोदींना ही ते कुलूपवाले व्यक्ती आणि त्यांच्याकडची कुलूप आवडायची.

आणि त्यामुळेच मोदींच आणि अलिगढच्या कुलुपाचं विशेष असं नातं आहे.

आणि त्यादिवशी जेव्हा मोदी आपल्या लहानपणीची ही कुलुपांची गोष्ट सांगत होते तेव्हा हे ही सांगायला विसरले नाहीत की,

आजवर भारतातले लोक आपली घर आणि दुकानांची सुरक्षा अलिगढच्या कुलुपांवर टाकून निवांत होतात. माहित नाही का पण अलिगढची काहीतरी विशेष आहेत.

का आहेत अलिगढची कुलूप विशेष, थोडा अलिगढच्या कुलुपांचा इतिहास पण बघावा लागेल, कारण आपल्या पंतप्रधानांना आवडतात ही कुलूप.  

असं म्हणतात की मुघलांच्या काळापासूनच या अलिगढ मध्ये कुलूप बनतात. सुरुवातीच्या काळात ही कुलूप हॅण्डमेड होती. त्यानंतर खूप वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ १८७० मध्ये इंग्लंडवरून एक व्यक्ती अलिगढ मध्ये आला. या व्यक्तीने इंग्लंडमध्ये कुलूप बनवत असे. याने या अलिगढ मध्ये कुलूप बनवण्याचा व्यवसाय सुरु केला.

पुढं त्याच्या व्यवसायाचा विस्तार होऊन त्या व्यक्तीने जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची स्थापना केली. आणि इथूनच अलिगढ मध्ये अद्ययावत कुलुपांचे व्यापारी तयार होऊ लागले. आज देशाच्या कानाकोपऱ्यात अलिगढची कुलूप खूप प्रसिद्ध आहेत. अलिगढची कुलूप वेगवेगळ्या डिझाइन्स मध्ये मिळतात. आज या शहरात ५ हजारांपेक्षा जास्त कंपन्या तर २ लाखांपेक्षा जास्त लोक कुलूप बनवण्याच्या व्यवसायात गुंतले आहेत.

आता हे झालं कुलुपाचं आणि मोदींच्या प्रेमाचं. मोदी काय लै भारी कुलूप विकत घेऊ शकतात. पण त्यांचं राहणीमान किती साधय भाऊ. आणि मोदींच अलिगढच्या कुलुपांवर प्रेम असेल म्हणून लावलं त्यांनी कुलूप. आपण का ट्रोल करायचं त्यांना, सांगा बघू.

साधं कुलूप, साधी राहणी, उच्च विचारसरणी हे गणित आहे मोदींच.  

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.