हिटलरनं १० लाख ज्यू मारले हे या म्हातारीला मान्यच नाही, त्यामुळे अनेकदा जेल पण झालीय..

“मी ती रात्र कधीच विसरणार नाही, कॅम्पमधली ती पहिली रात्र, जिने माझे आयुष्य एका दीर्घ रात्रीत बदलले. सात वेळा शापित आणि सात वेळा सील झालं. मी तो धुर कधीच विसरणार नाही. मी मुलांचे ते नाजूक चेहरे कधीही विसरणार नाही, ज्यांचे मृतदेह मी शांत निळ्या आकाशात धुराच्या लोटांमध्ये  बदललेले पाहिले.”

हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पची दाहकता सांगणाऱ्या NEVER SHALL I FORGET या एली विसेल यांच्या कवितेतील या ओळी आहेत. 

नोबेल पुरस्कार विजते एली विसेल हे स्वतः ऑशविट्झ आणि बुचेनवाल्ड या हिटलरच्या दोन छळ छावण्यांमधून वाचलेले सर्व्हायवर होते. 

ऑशविट्झची छळ छावणी किंवा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आपल्यापैकी काही जणांना माहित असेल. ज्यांना माहित नाही त्यांनी नीट बघून घ्या म्हणजे हिटलरला मानवजातीच्या इतिहासातला सगळ्यात क्रूर माणूस का म्हणतात ? याची तुम्हाला आयडिया येईल. 

ऑशविट्झ हे मूळतः दक्षिण पोलंडमधील पोलिश सैन्याच्या बराकी होत्या. नाझी जर्मनीने सप्टेंबर १९३९ मध्ये पोलंडवर आक्रमण केले आणि त्यावर कब्जा केला.  मे १९४० पर्यंत हे ठिकाण राजकीय कैद्यांसाठी तुरुंग म्हणून बदलण्यात आले. मात्र वॉर जसं जसं पुढं सरकत गेलं तसा याचा वापर बदलत गेला. सुरवातीला रशियन युद्धकैद्यांना विषारी गॅसच्या चेंबरमध्ये कोंबून या ठिकाणी मारण्यात येऊ लागलं. 

मात्र युद्ध जसं जसं पुढं सरकलं तसं तसं नाझी सैन्य ज्यू नागरिकांना इथं आणलं जाऊ लागलं.

इथं आल्यावर त्यांची जे काम करू शकतील आणि जे करू शकणार नाही अशी वर्गवारी केली जायची. ज्यांचा कोणताच उपयोग होणार नव्हता त्यांची रवानगी गॅस चेंबरमध्ये पाठवले जायचे. तिथं विषारी गॅस सोडून त्यांची हत्या केली जायची. एका बॅचला तडफडून मारायला २० मिनिटांचा वेळ लागायचा. यामध्ये अपंग, जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश असायचा.

आणि असं करत हिटलर नं थोडं थोडके नव्हे तर १० लाख ज्यूंची हत्या केली होती. 

ज्यूंचं सगळ्यात मोठं होलोकास्ट सोप्या शब्दता सांगायचं तर सामूहिक हत्याकांड ऑशविट्झमध्ये घडलं होतं.

जेव्हा रशियन सैन्य या छावण्यांजवळ येऊन पोहचलं तेव्हा हिटलरने हे सगळे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या लोकांना दुसरीकडे घेऊन गेला मात्र सत्य काय बाहेर यायचं राहिलं नाही. हिटलरच्या दुष्कृत्यांची साक्ष देणारा हा कॅम्प आहे.

मात्र हे सत्य मान्य करायला उर्सुला हॅवरबेक हि आज्जी मात्र काय तयार नाहीये. 

यासाठी या ९३ वर्षांच्या आज्जीला गेल्या पाच वर्षांत तीन वेळा तुरुंगवास भोगला आहे. हॅव्हरबेक आज्जीला २०१७ मध्ये आणि पुन्हा २०२० जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. 

त्यांनतर १ एप्रिल २०२२ ला देखील या आज्जीला पुन्हा एकदा सार्वजनिकपणे होलोकॉस्ट नाकारल्यानंतर दोषी ठरवत एक वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

या आज्जीच्या मते ऑशविट्झ हा गॅस चेंबर नसलेली एक ‘श्रम छावणी’ होती. याचा या आज्जीला कोणताही पश्चात्ताप नाहीये किंवा ती तिचे मत बदलण्यासही तयार नाहीये. या कारणास्तव तिच्या तुरुंगवासाची शिक्षा दंडात बदलण्याचे अपीलही न्यायाधीशांनी नाकारले होते.

एवढंच नाही तर या आज्जी स्वतःला होलोकॉस्ट संशोधक म्हणवतात. यावरूनही न्यायाधीशाने त्यांना झापलं होतं 

 ‘तुम्ही होलोकॉस्ट संशोधक नाही आहात, तुम्ही होलोकॉस्ट नाकारत आहात आणि ते ज्ञान नाही जे तुम्ही पसरवत आहात ते विष आहे.’

असं न्यायाधीशांनी म्हटलं होतं.

जर्मन कायद्यानुसार, होलोकॉस्ट नाकारणे हा गुन्हा आहे आणि त्याला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे. त्यामुळंच वेळोवेळी या आज्जीना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या नाझी आज्जींची एवढी कट्टर मतं असण्यामागेही कारण आहे.

या हॅव्हरबेक आज्जी आणि तिचा दिवंगत पती वर्नर जॉर्ज हॅव्हरबेक दुसऱ्या महायुद्धात नाझी पक्षाचे सदस्य होते. १९७० मध्ये वर्नर जॉर्ज हॅव्हरबेक यांच्याशी लग्न केल्यानंतर, हॅव्हरबेकने अनेक दशके ‘होलोकॉस्ट रिसर्च सेंटर’च्या प्रभारी म्हणून घालवली. या रिसर्च सेंटरद्वारे ज्यूविरोधी आणि होलोकॉस्ट नाकारणारी सामग्री प्रकाशित केली जाते.

यातून अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे हिटलरचा प्रोपागंडा किती स्ट्रॉंग होता. ९३ वर्षाची आज्जी देखील जेलमध्ये जाण्यास तयार आहे पण आपले चुकीचे विचार बदलण्यास तयार नाही. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.