पाचव्यांदा पंतप्रधान झालेल्या देउबा यांच्यामुळे नेपाळ- भारत संबंध सुधारणार आहेत

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा पुन्हा एकदा नेपाळ काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  जिंकून आलेत. यंदाच्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना ४,६२३ पैकी २,७३३ मते  मिळाली, त्यामुळे शेर बहादूर देउबा यांच्याकडे पाचव्यांदा हे पंतप्रधान पद आलंय. देउबा यांनी डॉ. शेखर कोईराला यांचा पराभव केला.

नेपाळ काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत पंतप्रधान शेर बहादूर देउबा, डॉ शेखर कोईराला, प्रकाश मान सिंग, बिमलेंद्र निधी आणि कल्याण गुरुंग हे १४ व्या महापरिषदेअंतर्गत उमेदवार होते. ही निवडणूक सोमवारी पार पडली.

निवडणुकीच्या पहिल्या फेरीत देउबा यांना २२५८ मते मिळाली. तर डॉ. कोईराला यांना १७०२, प्रकाश मान सिंग यांना ३७१, बिमलेंद्र निधी यांना २४९  तर गुरुंग यांना २२ मतं मिळाली. पहिल्या फेरीत कोणत्याच उमेदवाराला ५०% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत.

यानंतर दुपारी ३.३० वाजता दुसऱ्या फेरीचे मतदान सुरू झाले. तेव्हाही कुठलाच उमेदवार चांगली कामगिरी करू शकला नाही. ज्यानंतर शेर बहादूर देउबा आणि डॉ शेखर कोईराला यांना सोडून बाकीच्या उमेदवारांनी दुसऱ्या टप्प्यातचं माघार घेतली.

पुढे झालेल्या फायनल राउंडमध्ये देउबा यांनी कोईराला यांचा पराभव करून निवडणुकीत बाजी मारली.  दरम्यान, निवडणूक मंडळाने अजूनतरी अधिकृतपणे हे निकाल जाहीर केलेले नाहीत, पण पीएम देउबा यांची पक्षाध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवड झाली आहे. आणि ते पंचव्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले.

तसं  पाहिलं तर देउबा  यांचा हा विजय मोठ्या जोखमीचा होता कारण गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापाऊस नेपाळमध्ये राजकीय असंतोष आहे. नेपाळमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाला आपल्या अंतगर्त वादामुळे जास्त काळ सरकार चालवता आले नाही. ज्यामुळे पंतप्रधान ओली यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपतींनी २० डिसेंबर २०२० ला संसद विसर्जित केली आणि  २०२१ च्या ३० एप्रिल आणि १० मे रोजी निवडणुका जाहीर केल्या. पण फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने संसद पुनर्संचयित केली होती. ज्यांनंतर आता शेर बहादूर सिंह पंतप्रधान म्हणून  समोर आलेत.

पंतप्रधानपदी बाजी मारण्याची देउबा यांची ही पहिलीवेळ नाही. १९९५ साली त्यांनी पहिल्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदाचा कारभार सांभाळला होता. त्यांचा हा कार्यकाळ १९९५  ते १९९७ असा दोन वर्ष राहिला. त्यांनतर २००१ मध्ये ते पुन्हा निवडून आले. यावेळी ते फक्त १ वर्षचं देशाचा कारभार पाहू शकले.

पुढे देउबा जून २००४ ते फेब्रुवारी २००५  या एका वर्षाच्या काळात पुन्हा पंतप्रधान बनले.त्यांनतर जून २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान देउबा चौथ्यांदा नेपाळचे पंतप्रधान होते. ज्यांनंतर आता पाचव्यांदा ते नेपाळच्या पंतप्रधानपदी कारभार पाहतील.

हा.. सध्या तिथल्या समितीने यांची अधिकृत घोषणा केलेली नाही. कारण पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर देउबा यांना ३० दिवसांत विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागणार आहे. पण ओली यांच्यामुळे तयार झालेल्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत देउबा याना हे काम जास्तच अवघड जाणार असल्याचं समजतंय.

आता नेपाळच्या या राजकीय गोंधळात निकाल लागेलचं, पण देउबा जर विश्वासदर्शक ठराव मांडू शकले तर ते भारतासाठी फायद्याचचं आहे. कारण शेर बहादूर देउबा हे भारताचे समर्थक मानले जातात. २०१७ मध्ये जेव्हा ते नेपाळचे चौथ्यांदा पंतप्रधान बनले होते, त्यावेळी त्यांनी भारत दौरा केला होता. दिल्लीत येऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि नेपाळ – भारत संबंधावर चर्चा केली. भारतासोबत आर्थिक संबंधांपासून ते मधेशींच्या बाबतीत देउबा यांनी नेहमीच नरमाईची भूमिका स्वीकारली आहे.

त्यात देउबा यांच्या आघाडी सरकारमध्ये नेपाळी काँग्रेससह जनता समाजवादी पक्षाचा समावेश आहे. आणि जनता समाजवादी पक्ष हा मधेशी नेत्यांचा पक्ष म्हणूनही ओळखला जात असे. हे तेच मधेशी नेते आहेत ज्यांच्याशी अनेक नियमांबाबत ओली यांच्याशी मतभेत आहेत. आणि मधेशी लोक भारतासोबत रोटी-बेटी संबंध ठेवण्याच्या बाजूने आहेत, तर ओली यांनी भारतीय मुलींशी लग्न करण्यावर अनेक निर्बंधआणले होते.

त्यामुळे देउबा यांची नेपाळच्या पंत्रधानपदी निवड ही आपले शेजारचे संबंध आणखी दृढ करण्यासाठी अर्थातचं फायदेशीर आहे.

हे ही वाच भिडू :

English Summary :

The delegates of Nepal’s largest democratic party, the Nepali Congress, on Wednesday re-elected Prime Minister Sher Bahadur Deuba as the president. Deuba, who secured 2,733 votes during the second round of the election, defeated Shekhar Koirala, who secured 1,855 votes, according to the 14th General Convention of the Nepali Congress. Koirala is the nephew of former prime minister Girija Prasad Koirala. The total number of votes cast during Tuesday’s election was 4,623 while 35 votes were declared void.

WebTitle: Nepal election update: Sher Bahadur Deuba fifth prime minister of nepal for the fifth time.

Leave A Reply

Your email address will not be published.