माणसाच्या शरीरात नवीन अवयव सापडलाय, भिडू…!

माणसाच्या अंगात काय घावंल सांगता येत नाही. इवल्याइवल्या व्हायरसपासून मीटरभर लांब नारूपर्यंत सगळी पैदास माणसाच्या शरीरात घावते. वारं आल्यावर कितीक देव्यांपासून ते सुशांतसिंगच्या आत्म्यापर्यंत सगळं अंगात आणून दाखवत्यात.

माणसाच्या अंगात उपजत रहमानी किडा पण असतोय. आणि त्यो आजपर्यंत कुणालाच घावलेला नाही असा इतिहास आहेय.

पण शास्त्रज्ञांनी माणसाविषयी माहीत नसणारी अजून एक गोष्ट शोधून काढलीय. आपल्याला डॉक्टर झालो म्हणून सगळं बरं करता येतं म्हणणाऱ्यांनी सावध राहा

माणसाच्या अंगात नवीन अवयव घावलाय.

आता इतकी वर्षे एवढी ऑपरेशनं करून, पोस्टमार्टमा करून माणसात काय घावलं नाही असं नसल हे कोणालाबी वाटणं साहाजिके. तुझं सगळं किडं महितीयत म्हणणाऱ्याच्या तोंडावर हा शब्द फेका,

ट्युबारियल स्लाइव्हरी ग्रंथी..!

नया हैं ये…

नेदरलँडच्या माणसानी वीर्य तयार करणाऱ्या एक ग्रंथीचा शोध घेताना हा अवयव शोधलाय.

आता हा गळ्यात वीर्य का म्हणून शोधत असल ते त्यानं काय लिहिलेलं नाय. पण तिकडल्या राजधानीत एमस्टरडॅममध्ये लय नावाजलेली कॅन्सरवर काम करणारी संशोधन संस्था आहे.

या संस्थेतले तज्ञ लोक PSMA PET सिटीस्कॅन करत होते तेव्हा त्यांना ह्यो किडा हाती घावला.

अशा ग्रंथी आपल्या मांस आणि स्नायूंसोबत बेमालूम मिसळून गेलेल्या अस्त्यात. त्यांना शोधायला म्हणून परंपरागत साधनं उपयोगी पडत नाहीत. त्यामुळं त्यांना थोडं ऍक्टिव्ह करून वळखु येईपर्यंत कार्यरत करायला लागतं. (पोरगं आघावय का सोशिकय हे कळायला पोरी त्याला मुद्दाम तरास देऊन बघत्यात, ती ट्रिक)

जेवताना पाचकरस सोडणाऱ्या ग्रंथी आणि प्रोस्टेट सारखंबारक काम करत अस्त्यात. त्यात किरणोत्सर्ग (म्हणजे आतली ऊर्जा डोळ्याला न दिसणाऱ्या लहरींच्या रुपात बाहेर फेकणाऱ्या वस्तू) पदार्थांना माणसाचा शरीरात टाकलं होतं. हा पदार्थ ट्रेसर म्हणून काम करतो. विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीत तो ऍक्टिव्ह होतो. त्यामुळं तो जिथं जाईल तिथं तो ओळखता येतो.

हा पदार्थ ट्युबारियल ग्रंथीत लक बाय चान्स घुसला तेच्यामुळं आपल्याला या अवयवाची माहिती झालीय.

लाळ बनवणाऱ्या इतर ग्रंथी अस्त्यात त्याच प्रकारचं काम हा नवीन अवयव करतो. गळ्याच्या वरच्या भागात, घश्याला जोडून, टाळूच्या नेमकं वरती (थोडं इकडं, हा इथंच!) हा अवयव असतोय.

आकृती बघा ना.. अजूनही या अवयवाबद्दल पूर्ण माहिती मिळालेली नायय.

हा अवयव जवळपास दीड इंचाचा असतो. आधी ज्या पेशंटमध्ये हा सापडला तेव्हा डॉक्टर लोकांना वाटलं की ही स्पेशल केस आहे. पण नंतर जेव्हा सगळ्या 100 रुग्णांवर ही तपासणी केली तेव्हा त्या सगळ्या लोकांच्यात हा अवयव सापडला.

त्यांना हे एकदम अनपेक्षित होतं. इतक्या वर्षांनी कितीक संशोधनानंतर अजूनही माणसाच्या अंगात एवढे किडे अस्त्याल असं त्यांनाही वाटलं नव्हतं.

माणसाच्या अंगात वंगण टिकवून ठेवायचं काम हा अवयव करत असतोय असं शास्त्रज्ञांचं मतय. माणसाच्या अंगात १००० पेक्षा जास्त छोट्यामोठ्या अशा ग्रंथी असतात जे फक्त पचनसंबंधी कामासाठी रस सोडत असतात.

रेडिओलॉजी म्हणजे विविध किरणांचा मारा करून उपचार किंवा निदान करायची पद्धत असत्या. आपलं एक्स रे आणि यमारआय ह्यातच येतं. तर यावर संशोधन करून या डच संशोधकांनी असं शोधून काढलंय की जव्हा जव्हा आपण रुग्णावर रेडिएशनची ट्रीटमेंट करतो तेव्हा आपण या ग्रंथींचा विचारच करत नाय.

जर आपण ह्या अवयवाला जपलं तर रुग्णाला फायदा होऊ शकतो असे शास्त्रज्ञ लोकं म्हणत आहेत. आता या अवयवाला टाळून पुढल्या काळात शस्त्रक्रिया करता येतील असं शास्त्रज्ञ म्हणत आहेत.

आता या ग्रंथीला मेजर ग्रंथीचा दर्जा मिळतो की एक अवयव म्हणून मान्यता मिळत्या, की मायनर बारकाल्या ग्रंथीतच त्याची वर्णी लागतेय ते बघावं लागल.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.