‘बोल ना आंटी आऊ क्या’ वाल्या पोरामुळे पाकिस्तान न्यूझीलंड भांडत बसलेत

बोल ना आंटी आऊ क्या आऊ क्या, घंटी में बजाऊ क्या..

लै गाजलेलं गाणं आहे हे. ज्या भिडूच हे गाणं आहे ना तो लै फेमस झालाय. अख्या जगात ते पण. आणि याला फेमस कोणी केला तर पाकिस्तानने.

का फेमस झालाय ? प्रकरण काय आहे?

तर यु ट्यूबवर नेहमीच पाहिलेला एक हिरव्या केसांचा इंडियन भिडू सोशल मीडिया, गुगल, ट्विटर सगळीकडंच व्हायरल व्हायला लागला. कारण शोधलं तर काय सापडलं, याच्या एका इमेल मुळ न्यूझीलंड आणि पाकिस्तानात भांडण सुरू झाली आहेत म्हणून.

आता या भिडूचा कारनामा तुम्ही वाचलाच पाहिजे.

तर झालं असं की, न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने आपला पाकिस्तान दौरा एकही न सामना खेळता अचानक रद्द केला. यावर पाकिस्तान च्या माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी कारण उघड करण्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यात त्यांनी जबाबदार कोणाला धराव ? तर भारतातल्या मुंबईत राहणाऱ्या एका केस रंगवलेल्या पोराला. त्याच नाव ओमप्रकाश मिश्रा.

हे मंत्री महोदय म्हणतात की,

न्यूझीलंड क्रिकेट संघाला धमकीवजा संदेश पाठवण्यासाठीचे डिव्हाईस आणि ई-मेल आयडी भारतातून चालवण्यात येत होते अशी आमच्याकडे माहिती आहे. न्यूझीलंड संघाला भारतीय ईमेल अकाऊंटवरून धमकी देण्यात आली. धमकी देण्यासाठी वापरण्यात आलेले बहुतांश ईमेल आयडी आणि ईमेल हिंदी नावांवरून बनवण्यात आले आहेत. उदा. चित्रपट, नाटक आणि संगीत.

ज्या मोबाईल डिव्हाईसमधून हे आयडी आणि अकाऊंट चालवण्यात आले ते ऑगस्ट २०१९ मध्ये भारतात सुरू करण्यात आले होते. त्यातलं सीमकार्ड २०१९ मध्ये रजिस्टर झालं होतं. याचा वापर फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीकडून झाला आहे, याची आम्हाला खात्री पटली आहे. न्यूझीलंड संघाला धमकी देण्यासाठीचा मेल आयडी महाराष्ट्रातून चालवला जात होता. त्या मागे ओम प्रकाश मिश्रा याचा हात आहे.

आता हा इमेल मिश्राने न्यूझीलंडमध्ये कोणाला पाठवला ?

तर फवाद चौधरी सांगतात, मार्टिन गप्टील या न्यूझीलंड प्लेयरच्या पत्नीला एक मेल आला. त्यामध्ये तुझ्या पतीला पाकिस्तानात ठार केलं जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. याचा आम्ही तपास केला. तर हा मेल आयडी कोणत्याही सोशल मीडिया नेटवर्कशी संबंधित नसल्याचं आम्हाला आढळून आलं.

म्हणजे यांचं कसं झालंय माहीत आहे का, खोदा पहाड निकला चुहा…

आता हे झालं पाकिस्तानच. पण भारतात याचा कल्ला सुरू झाला. सोशल मीडिया युझर्सनी या ओम प्रकाश मिश्राला तर हिरोच करून टाकला. मिम काय, त्याची गाणी काय. लैच बडेजावकी थाट केला. ट्रेंड मध्ये आला ना भाई आपला. हे मिम्स एवढे भन्नाट होते की, त्यावर सोशल मीडिया यूजर म्हणतात,

बोल ना पाकिस्तान, ईमेल भेजूँ क्या?

हा भिडू ओमप्रकाश नक्की आहे तरी कोण ?

भारतात ओम प्रकाश मिश्राची ओळख एक युट्यूबर आणि रिएलिटी शो स्पर्धक म्हणून आहे. त्याच्या काही गाण्यांमुळे त्याला इंडियन ताहीर शाह म्हंटल जातं. तो २०१६ मध्ये ‘बोल ना आंटी आऊ क्या’ या विचित्र गाण्यामुळे फेमस झाला होता. त्याच्या गाण्याला आतापर्यंत ६८ लाख व्ह्यू मिळाले आहेत.

आता यु ट्यूब कमी पडल की काय म्हणून हे पोरगं इंडियन आयडॉल आणि एमटीव्ही ऑफ स्पेस या रिएलिटी शोमध्येही गेलं होत. त्याला वाटत की तो रॅप किंग आहे. पण पब्लिक त्याच्या गाण्यांची तुलना ढिनचॅक पूजा आणि पाकिस्तानी गायक ताहीर शाह याच्याशी करते.

आता त्यानं न्यूझीलंडला मेल केला की नाही हे काय माहित नाही.

पण ज्या पोराची पब्लिक चेष्टा करायची ते पोरग कुठाय बघा आज. पण पोरग हिंमत हरलं नाही. बघा आज चक्क आपल्या शत्रू राष्ट्रान त्याला फेमस केलं. असच असतंय. शेवटी काय तर सब्र का फल मिठा होता है।

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.