नावात “इंडियन” आहे म्हणून पाकिस्तानात या पक्षाची शिकार केली जातेय. 

भारत आणि पाकिस्तान च्या संबधात पाकिस्ताने नेहमीच दाखवून दिल आहे की आपण भारताचा द्वेष करत असताना कोणत्याही थराला जावू शकतो. सध्या तणावपुर्ण संबध असताना भारतात पाकिस्तानी कलाकारांचा, त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यापारी संबधाना बंद करावे अशी मागणी सर्वसामान्य भारतीयांमार्फत केली जात आहे. काहीजण हे कस चुकीचं आहे ते सांगत आहेत. पण वैचारिक आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या भारतालाच वडिलकीचे दाखले दाखवले जात असताना पाकिस्तान कोणत्या थराला जातो याचा विचार करण्याची देखील गरज आहे.

हि गोष्ट पाकिस्तानच्या अशाच द्वेषाची आणि मुर्खपणाची. 

माळढोक पक्षी आपणा सर्वांना माहितच असतील. या पक्षाला ग्रेट इंडियन बस्टर्ड म्हणून ओळखण्यात येते. संकटग्रस्त असणारा पक्षी म्हणून माळढोक पक्षांची ओळख आपणास आहे. कधीकाळी मोठ्या संख्येने असणाऱ्या या पक्षाची संख्या सध्या १०० च्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येत. महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थानच्या शुष्क प्रदेशात हा माळढोक आढळून येत असल्याचं सांगितलं जातं. 

माळढोक पक्षी साधारण एक मीटर लांबीचा असतो, त्याच वजन १५ किलोपर्यन्त असतं व तो ५० ते १०० मीटरपर्यन्त झेप घेत असल्याच सांगण्यात येत. माळढोक पक्ष्याच्या या सर्वसाधारण माहितीबरोबरच माळढोक पक्ष्याची मांस व अंडी यासाठी मोठ्या प्रमाणात त्याची शिकार होत असल्याचे दाखले आहेत.

इंटरनॅशनल फॉर कॉन्झरव्हेशन ऑफ नेशन मार्फत दुर्मीळ प्रजाती म्हणून या पक्षाची नोंद करण्यात आली आहे. शिवाय भारतात या पक्ष्याची शिकार करणे हा कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधियनियम १९७२ नुसार या पक्षाची नोंद विलुप्त प्रजातीमध्ये करण्यात आली आहे. तसेच हि नोंद रेड झोनमध्ये करण्यात आली आहे. 

आत्ता महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड ची शिकार का करण्यात येते ? 

दरवर्षी थंडीच्या दिवसात हे पक्षी पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत होतं असल्याचं सांगण्यात येतं. आंतराष्ट्रीय संस्थांची दखल न घेता पाकिस्तानमध्ये या माळढोक पक्ष्यांच्या शिकार करण्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नसल्याचे सांगण्यात येतं. 

IUCN  2017 च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रेट इंडियन बस्टर्डची शिकार करण्यात आली होती. गेल्या चार वर्षांमध्ये भारतातून ६३ माळढोक पक्ष्यांनी थंडीच्या दिवसात स्थलांतर केले मात्र भारतामध्ये या पक्ष्यांपैकी फक्त ४९ पक्षीच परत आल्याची नोंद करण्यात आली आहे. 

फक्त “इंडियन” नावामुळे शिकार करण्यात येते का ? 

माळढोक पक्ष्याच्या शिकारीबद्दल असणाऱ्या अनेक कारणांपैकी हे महत्वाच कारण असल्याचं पक्षीतज्ञ सांगतात ते म्हणतात, पाकिस्तान सरकार या पक्षाच्या असणाऱ्या ग्रेड इंडियन बस्टर्ड नावामुळे कठोर कायदे करत नाही तर दूसरीकडे या पक्षाच्या नावामध्ये असणाऱ्या इंडियन नावामुळे शिकारी पक्ष्याची शिकार जाणिवपुर्वक करत असल्याचं सांगण्यात येतं. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.