ब्रिटनचं सरकार हादरवून सोडणारी फेमस कॉल गर्ल सध्या गोव्यात छोट्याश्या खोलीत राहत होती…
२०१० साली डेली मेलमध्ये खाली दिलेला फोटो छापून आलेला. फोटोकडे बघुन काय वाटतं. कोणतरी साध्या घरातली महिला कुठल्यातरी मार्केटमध्ये जायला लागलेय. तिच्याकडे गाडी आहे ती पण साधीच मारूती सुझूकीची व्हॅगनआर..
पण हा फोटो पाहून लय जणांच्या आठवणी चाळवलेल्या, काही लोकांचे धाबे दणाणलेले आणि काही लोकांनी आत्ता परत हिची चर्चा नको म्हणून शांत राहणं गरजेचं समजलेलं..
हिचं पूर्ण नाव पामेल सिंग-बार्डोस
म्हणजे फक्त पामेला या नावानेच हि ओळखली गेली. १९८२ साली ती मीस इंडिया झालेली. त्यानंतर तिनं मोठ्या प्रमाणात पब्लिक गोळा केलं ते १९८९ साली. त्या काळात ब्रिटनच्या प्रत्येक मॅक्झिनमध्ये हिचं नाव असायचं,
कशासाठी तर एक हाय फ्रोफाईल कॉल गर्ल म्हणून…
१९८९ साली जेव्हा तिचं नाव वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालं तेव्हा ती अज्ञातवासात गेलेली. तेव्हा तीने ब्रिटीनचं सरकार पाडणार म्हणून धमकी देखील दिलेली. बर ही धमकी देखील सिरीयस घेण्यासारखी होती कारण तिचे संबंध ब्रिटनचे मंत्री, न्यूज चॅनेलचे एडिटर यांच्यासोबत जोडले जात होते.
एका हत्याराच्या व्यापाऱ्यासोबत तिने काही काळासाठी लग्न देखील केलं होतं. तिचे कोणासोबत संबध होते यातली दोन चार नावं वाचल्यानंतरच तुमच्या समोर सगळा कार्यक्रम आला असेल.
दोन भूमिका करायची संसद रिसर्च असिस्टंट आणि कॉल गर्ल
याचा पहिला खुलासा एका ब्रिटीश मॅक्झिनने केलेला. त्यांनी सांगितलं की पामेला सत्ताधारी टोरी पार्टीच्या एका खासदारांच्या रिसर्च असिस्टंच्या रुपात काम करते तर दूसरीकडे एक कॉल गर्ल म्हणून. ब्रिटीश मिडीयाने या स्कॅन्डलला अश्लिल स्वरूपात प्रेजेंन्ड करण्यास सुरवात केली. अस सांगण्यात येवू लागलं की पामेला तिच्या साडे सात लाख पाऊंडच्या पेंटहाऊसला सोडून आत्ता गायब झालेली आहे.
एका मासिकात पामेलाचं म्हणणं छापण्यात आलं, ती म्हणालेली…
मी जर सगळ्या गोष्टी सांगण्यास सुरवात केली तर सगळा देश गारद होईल. पण मला १० लाख पाऊंड मिळणार असतील तरच मी सगळ्या गोष्टी उघडकीस आणेल. मी कोणासोबत प्रेम केलं, कोणासोबत झोपली या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर ब्रिटनचं सरकार कोसळून जाईल.
इव्हनिंग स्टॅण्डर्ड या वर्तमानपत्राने दावा केला की पामेला लिबियाची गुप्तहेर आहे. लिबीयाच्या गुप्तहेर संघटनेच्या कर्नल मुअम्मर गद्दाफी यांचा भाऊ कर्नल अहमद गेद्दा फेद्दम यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहे. पामेला त्याला भेटण्यासाठी पॅरिसला जायची.
दूसऱ्या वर्तमानपत्राने सांगितलं की स्पेशल ब्रॅन्च ऑफिसर हे पी. सिंह आणि पी. चौधरी नावाचे बॅंक अकाऊंट सीझ करण्यात आल्याची माहिती दिली.
तिच्या लाईफस्टोरी साठी एका मासिकाने २० लाख पौंडची तिला ऑफर दिली तर दूसऱ्या मासिकाने तिच न्यूड फोटो छापण्यासाठी तिला साडेसात लाख पौंड देण्याची ऑफर दिली. पण या गोष्टी पुढे जावू शकल्या नाहीत.
तिचा वार्षिक पगार होता ३ हजार पौंड. अशा वेळी ती रहात होती त्या घराची किंमत साडेसात लाख पौंड होती. ती असंख्य पार्टींमध्ये असायची. जेव्हा जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ब्रिटनमधल्या अमेरिकन दुतावासात पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये देखील ती सामिल झाली होती. एक ३ हजार पौंड पगार असणारी रिसर्च असिस्टंट इतकी उच्चभ्रू कशी? या प्रश्नाचा शोध घेण्याच्या नादातूनच तिच्याबद्दलच्या बातम्या बाहेर पडू लागल्या होत्या.
पामेलाचा भूतकाळ नेमका काय होता..? व ती इथपर्यन्त पोहचली तरी कशी…?
पामेला हरियाणाची होती. एका टिपीकल जाट कुटूंबातली. तिचे वडिल मेजर होते. १९६२ च्या युद्धात ते शहिद झाले होते. त्या वेळी पामेला फक्त दोन महिन्यांची होती. पामेलाची आई शकुंतला आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर चंदिगडच्या होस्टेलमध्ये वॉर्डनचं काम करू लागली.
हरियाणात तेव्हा बन्सीलाल यांच सरकार होतं. त्यांची मुलगी याच हॉस्टेलमध्ये होती. बन्सीलाल यांच्या पोरीची ओळख काढून 1975 सालात पामेलाची आई हरियाणा पब्लिक सर्वीस कमिशन मधून अधिकारी झाली. अस सांगितलं जातं की तिने कोणतिही परिक्षा दिली नव्हती तर फक्त ओळखीतून तिची थेट नियुक्ती करण्यात आली होती.
पामेलाची आई शकुंतला ही सर्वात वाईट आई होती अस पामेलाच्या मैत्रीणी सांगायच्या. ती पामेलाला कुत्र्याच्या पट्ट्याने मारायची. ती शिकायला लहानपणापासून बोर्डिंगला होती. जेव्हा सुट्ट्यामध्ये ती घरी जायची तेव्हा तिला भयानक मारहाण व्हायची. हेच पाठीवरचे ओळ घेवून ती पुन्हा बोर्डिंग स्कूलला यायची.
या सगळ्या जाचातून तिची सुटका झाली ती दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजला गेल्यानंतर. तिथे ती श्रीमंत मुलांना पटवू लागली. कपड्यांची भिती गेली, दारू, सिगरेट सवयचीचं झालं..
पामेलाच्या मैत्रिणी तिची आठवण सांगताना म्हणतात ती कॉलेजमध्ये अचानक ओरडायची, मी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळी खायची विसरले…?
तीला अशा गोष्टी करताना मज्जा यायची.
१९८० च्या सुरवातीला ती दिल्लीच्या मॉडेलिंग एजेंन्सी मार्फत मॉडेलिंग करु लागली. १९८१ साली ती मुंबईत गेली. १९८२ साली फेमिना मीस इंडिया जिंकून प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिचं नशीब बदलत गेलं. ती पेरू या देशात गेली. तिथे एका स्पर्धेत भाग घेवून पुढे न्यूयॉर्कला गेली.
अस सांगितलं जातं की १९८२ साली मिस इंडिया जिंकून जेव्हा ती न्यूयॉर्कला पोहचली तेव्हा ती सउदी अरबच्या हत्यार स्मगलर अदनान खाशोगीच्या संपर्कात आली. त्याची ही मुलाखत धर्मगुरू चंद्रास्वामीने करून दिल्याचं देखील सांगण्यात येत.
पुढे ती एक एक पायऱ्या चढत वर गेली. ब्रिटीशांसाठी ती सर्वात महाग कॉलगर्ल ठरली. त्यानंतर ती बातम्यांमधून गेली.. हळुहळु लोक देखील तिला विसरून गेले..
आणि अचानक डेली मेलमध्ये तिचे फोटो आहे. ते देखील तब्बल २० साल बाद वगैरे. २०१० साली ती गोव्यात आपल्या छोट्याश्या घरात एकटी रहात असल्याच सांगण्यात आलं. आज नेमकी ती कुठे आहे हे ठामपणे सांगता येत नाही हे देखील खरं…
हे ही वाच भिडू
- हनी ट्रॅपमध्ये अडकून रॉ च सगळ्यात जास्त नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याची गोष्ट?
- या बाईने राकेश मारियांना फसवलं नसत तर तेव्हाच अबू सालेम चा खात्मा झाला असता.
- फक्त ब्लॅक लेबल व्हिस्कीसाठी देशाची गोपनीय कागदपत्रे विकली गेली होती.