पाणबुडी रोखल्याच्या आरोपावरून पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडलं
भारतावर बोट दाखवण्याची संधी पाकिस्तान कधीचं सोडत नाही. मग ते आपल्या देशातले अंतर्गत मुद्दे असो, किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, पाकिस्तानला स्वतःच्या देशापेक्षा भारतात ढवळाढवळ करण्याची आणि आरोप करण्याची घाण सवयचं लागलीये. हा, प्रत्येक वेळी तोंडावर आपटतो सुद्धा पण पुन्हा त्याच गोष्टी करत.
आता सुद्धा असाच काही नवा आरोप घेऊन पाकिस्तान समोर आलं होत. खरं तर काही दिवसांपूर्वी पाकच्या नौदलानं आरडाओरड केली कि, भारतीय नौदलाच्या पाणबुडीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलाय. ही भारतीय पाणबुडी आपण माघारी पाठवल्याचेही त्यांनी म्हंटल. पाकिस्तान नौदलाच्या सर्व्हिलंस विमानाला ही भारतीय पाणबुडी दिसल्याचा दावा केला. एवढंच नाही तर पाकिस्तानने याचा व्हिडिओ सुद्धा व्हरायल केला होता.
आता तो व्हिडिओ बघाचं
Indian submarine prevented from entering Pakistan's waters by the Pakistan Navy. #Pakistan #Navy #India #PakvsInd pic.twitter.com/TrzaZnNLcg
— Hamza Azhar Salam (@HamzaAzhrSalam) October 19, 2021
आता पाकच्या आरोपांची हद्द म्हणजे त्यानं म्हंटल कि, आपल्या सागरी हद्दीत भारतीवय पाणबुडी प्रवेश करण्याची ही जवळपास तिसरी चौथी घटना आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या नौदलाकडून देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी दक्षता बाळगली जात असल्याचेही या निवेदनात म्हटले होते. पाकिस्तान हा आरोप करत भारताला कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करत होतं.
पण भारतानं पाकचा हा डाव सुद्धा उधळून लावलाय. भारतीय नौदलाने पाकचा त्यांच्या हद्दीत पाणबुडी घुसल्याच्या दावा खोटा असल्याचे स्पष्ट केलेआहे. पाणबुडीच्या ठावठिकाण्याचा डेटा मिळाल्यानंतर भारतीय पाणबुडी भारतीय हद्दीबाहेर गेलीचं नसल्याचे बुधवारी स्पष्ट झाले आहे.
एवढंच नाही भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी म्हंटले कि,
पाकिस्तानचा हा आरोप बिनबुडाचा आहे. कारण जर कुठल्याही देशाला दुसऱ्या देशाच्या हद्दीत पाणबुडी पाठवायची असेल तर तो पाणबुडी पाण्याखालून पाठवेल. ना कि व्हिडिओ काढता येईल इतक्या वरून. त्यामुळे पाकचे हे आरोप खोटे आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले कि, पाकने व्हिडिओत दाखवलेली पाणबुडी हि कलावरी पाणबुडी होती. जी फ्रान्सकडून नुकताच नौदलात दाखल झालेली स्कॉर्पियन क्लास पाणबुडी आहे . आणि महत्वाचं म्हणजे ती त्याच भागात असते. त्यामुळे जरी पाकनं तिला उध्वस्त करण्याचा प्लॅन बनवला असता, तर तो फ़ेलचं गेला असता.
पाकिस्तानच्या सागरी सीमांची हद्द त्यांच्या किनारपट्टीपासून १२ मैलांपर्यंत पसरलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे पाकिस्तानने ज्यावेळी दावा केला होता. त्यावेळी भारतीय पाणबुडीचं ठिकाण कराची बंदरापासून १५० समुद्री मैल दूर होते आणि हे क्षेत्र पाकिस्तानी सागरी सीमेबाहेर आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वीच म्हणजे मार्च २०१९ मध्ये सुद्धा पाकिस्तानने आरोप केला होता की, “भारतीय पाणबुडीने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश केला होता. आम्ही या पाणबुडीला नष्ट सुद्धा करू शकलो असतो, पण पाकच्या नौदलाने तसे काही केले नाही.”
पाकच्या त्यावेळेच्या आरोपावरही भारतीय नौदलाने चांगलंच प्रतिउत्तर दिलं होत. पण बहुधा त्यावेळच्या अपमानानं पोट भरलं नसेल, म्हणून आता पुन्हा एकदा पाकनं कट रचला होता. पण नेहमीप्रमाण त्यांच्याच भाषेत त्याला उत्तर मिळालं.
हे ही वाचं भिडू :
- भारत विरुद्ध पाकिस्तान : कोणाचं सैन्यदल सर्वात ताकदवान, वाचा.
- या तीस कोटींच्या घोटाळ्यामुळे भारताला पाणबुड्या बनवण्याचे तंत्रज्ञान मिळू शकले नव्हते.
- जीव वाचवणं शक्य असूनही नौसेनेची परंपरा जपण्यासाठी त्यांनी हसत-हसत जलसमाधी घेतली!