या संघटनेमुळे अफगाणिस्तानमधला एक भाग तालिबानला कधीही जिंकता आला नाही

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका सैन्य मागाहरी घेणार असं घोषित केल्यानंतर, तालिबानने हळू हळू संपूर्ण तालिबानवर ताबा मिळवलाय. काबूलच्या संसदेवरचा अफगाणिस्तानचा झेंडा उतरवून तालिबान्यांनी आपले काळे -पांढरे झेंडे फडकले.

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने जाहीर केले कि,

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध आता संपले आहे आणि आता अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असेल .

मात्र, याच दरम्यान अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती यांनी ‘जंग अभी बाकी है’ असं म्हणतं स्वतः देशाचा राष्ट्रपती म्हटलंय. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटलं कि, 

‘अफगाणिस्तानच्या घटनेनुसार, राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यास FVP काळजीवाहू राष्ट्रपती बनतो. मी सध्या माझ्या देशात आहे आणि कायदेशीर काळजी घेणारा राष्ट्रपती आहे. सर्व नेत्यांना त्यांचे समर्थन आणि एकमत मिळवण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहे.

आता उपराष्ट्रपतींच्या या ट्विटनंतर अफगाणिस्तानात तालिबान्यांविरुद्ध मोठ्या लढाईची तयारी सुरु असल्याच म्हंटल जातंय. यात सगळ्या माध्यमांत पुन्हा एकदा नॉर्दर्न अलायन्स झळकू लागलाय.

ते का तर, यामागचं कारण म्हणजे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांच्यासह अनेक वॉरलॉर्ड्स इथं लपून बसली असल्याचं बोललं जातंय. 

आता नॉर्दर्न अलायन्स म्हणजे नक्की  आहे तरी काय ?

तर सध्याच्या संदर्भ द्यायचा म्हणतात तर, तालिबाननं  सगळ्या अफगाणिस्तानावर आपला ताबा मिळवलाय, मात्र काही भागांशिवाय. यातलाचं एक म्हणजे पंजशीर. जे काबुल पासून अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर आहे.  जिथे तालिबानने याआधीही आणि आत्ताही नियंत्रण मिळवण्याचा दावा केला नाहीये. 

यामागचं कारण म्हणजे पंजशीर भागातला नॉर्दर्न अलायन्सचा दबदबा

आता हे नॉर्दर्न अलायन्स घेण्यासाठी जरा मागे जावं लागलं.

तर १९९६ साली सुद्दा आता सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. अफगाणिस्तानातल्या महत्वाच्या शहरांवर तालिबाननं कब्जा मिळवला होता. आता त्याची नजर काबूलवर होती. काबुल आपलंच होणार यावर त्यांचा ठाम विश्वास होता. फक्त संधीची वाट होती.

अश्यातच एका व्यक्तीनं तालिबान नेत्यांशी बोलण्यासाठी थेट तालिबान्यांचा अड्डा गाठला. त्याला थांबवण्याचा प्रयत्नही केला गेला, पण नाव समजताच सगळे एकदम स्तब्ध झाले. 

तो व्यक्ती होता अहमद शाह मसूद, अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारचे संरक्षण मंत्री

मसूद यांना ‘शेर-ए-पंजशीर’ म्हंटल जात. त्यांच्या भादुरीच्या शपथ घेतल्या जातात. असे म्हटले जाते की, सोव्हिएत सैन्याने पंजशेर (पाच सिंहाची घाटी) घाटात ९ वेळा प्रवेश केला होता, पण प्रत्येक वेळी त्यांना हार मानून परत यावे लागले.  ते या अहमद शाह मसूद यांच्यामुळेच. आणि हेच अहमद शाह मसूद तालिबानच्या अड्ड्यावर एकटेच घुसले. 

त्यांना अफगाणिस्तानच्या भविष्यासाठी आणि शांततेसाठी महत्वाची चर्चा करायची होती. मसूदने तालिबान्यांना म्हंटल कि,

‘तुम्हाला अफगाणिस्तानात इस्लामिक राज्य हवे आहे, मलाही तेच हवे आहे. पण मला एवढेच म्हणायचय की, यापुढे रक्तपात होणार नाही. एकत्रितपणे आपण सरकार चालवू शकतो. एक उदारमतवादी आणि परकीय वर्चस्वापासून मुक्त असे सरकार.

पण अहमद मसूदची ही  सोपी भाषा तालिबान्यांच्या डोक्यात घुसली नाही. आणि ते तिथून माघारी फिरले. यांनतर अहमद शाह मसूदने संघर्षाचा मार्ग निवडला.

दरम्यान, सततच्या लढाईला कंटाळलेल्या अफगाण सैन्याने या तालिबान्यांपुढे गुडघे टेकले. ज्यानंतर २७ सप्टेंबर १९९९ ला तत्कालीन  नजीबुल्लाहच्या हत्येनंतर तालिबानने काबूलवर कब्जा मिळवला. आणि अहमद शाह मसूद आपल्या विश्वासार्ह लोकांसह पंजशेरला निघून गेले.

या पंजशेरमध्येच त्यांनी ‘नॉर्दर्न अलायन्सची’ स्थापन केली.

अहमद शाह मसूद यांच्या या संघटनेला इराण, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि भारतासह इतर अनेक देशांचा पाठिंबा मिळाला. हा तालिबानविरोधी गट होता. नंतर, आणखी बरेच मुजाहिदीन नेतेही यात सामील झाले.

असे म्हंटले जाते कि, ९/११ च्या हल्ल्यानंतर जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी नॉर्दर्न अलायन्सला आपलं पार्टनर बनवला. याले बरेच जण सरकारमध्ययेही आहेत. 

दरम्यान, २० वर्षानंतर पुन्हा एकदा तालिबाननं अफगाणिस्तानवर काबा केल्यानं हा जुना गट पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचं म्हंटल जातंय. कारण बंदुकीचा धाक दाखवून तयार झालेलं  सरकार त्याना नकोय.  ते आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. या गटाला ‘नॉर्दर्न अलायन्स २.०’ असे नाव दिले जातेय.

महत्वाचं म्हणजे सध्या या नॉर्दर्न अलायन्सचा मुखिया अहमद शाह मसूदचा एकुलता एक मुलगा अहमद मसूद आहे.

पंजशेरमध्ये सतत बैठका घेतल्या जातायेत. मुजाहिदीनचे अनेक नेते आपले सैन्य गोळा करण्यात व्यस्त आहेत. अहमद मसूद यांनी म्हटले की, 

जर तालिबान शांततेसाठी तयार नसेल तर मुजाहिदीन पुन्हा एकदा शस्त्र घेतील. 

त्यात आता वादाची ठिणगी पडायला सुरुवात झालीये. नुकताच अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये अफगाण नागरिकांनी तालिबानी सरकारचा विरोध केला. तालिबानी झेंडा खाली उतरवत या गर्दीनं अफगाणिस्तानचा झेंडा फडकावला. 

मात्र, काही वेळातच तालिबान्यांनी तिथं गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाला. 

या प्रकरणानंतर असे म्हंटले जातेय कि, नॉर्दर्ड अलायन्स पुन्हा एकदा सक्रिय झाले असून तालिबान्यांचा झालेला हा विरोध या गटाकडूनच करण्यात आला होता. त्यामुळे आता येणारे काही दिवस अफगाणिस्तानासाठी निर्णायक असल्याचे म्हंटले जातेय.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.