मोदींनी पाय धुतलेल्या त्या पाच जणांना काय वाटलं.

कुंभमेळ्या दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना गंगा साफ करणाऱ्या पाच सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. पंतप्रधानांना चक्क पाय धुताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशलमिडीयावरुन चांगल्या वाईट ट्रोलधाडी पडू लागल्या. बघा बघा आपले पंतप्रधान म्हणून मोदी फॉलोअर्स व्हिडीओ शेअर करु लागले, तर तिकडे कॉंग्रेससह इतर पक्ष आणि विरोधकांनी पुरे झाली स्टंटबाजी म्हणून सफाई कामगारांबद्दल मोदींच्या फसलेल्या, न केलेल्या धोरणांचा कागदच तोंडावर फेकून मारला.

या सर्व घडामोडी दरम्यान आपण बापुडे प्रेक्षक लोक दोन्ही कडून मज्जा घेत होतो. आणि याच अलगत क्षणी इंडियन एक्सप्रेसने एक स्टोरी छापली. आपण हि स्टोरी या लिंकवर जावून वाचू शकताच.

नेमक काय सांगण्यात आलय या स्टोरीत तर मोदींनी पाय धुतल्यानंतर या कर्मचाऱ्यांच आयुष्य कितपत बदललं याचा आढावा या स्टोरीत घेतला आहे, पाय धुतल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना काय वाटलं. हे आज काय विचार करतात आणि मुळ मुद्दा म्हणजे ते कोण आहे या सर्व गोष्टी मांडण्यात आल्या आहेत.

1. होरी लाल. 

होरीलाल मुळचे उत्तरप्रदेशातल्या धौरेता गावचे. सफाई काम करण्यासाठी ते कुंभमेळ्यात आले. ते सांगतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटणार आहेत इतकीच कल्पना त्यांना देण्यात आली होती. ते आमचे पाय धुणार आहेत याची पुसटशी कल्पना देखील आम्हाला नव्हती. इतका मोठ्ठा व्यक्ती  माझे पाय धुवत होता तेव्हा मला अपमानकारक वाटत होते. मात्र या घटनेनंतर माझ्या आयुष्यात काहीच बदल झालेला नाही. मी यापुर्वी देखील सफाई कामगार होतो आणि आत्ता सुद्धा तेच आहे. मात्र मला सफाई काम करणं आवडत नाही. सारखं इकडं तिकडं फिरावं लागतं. काम कोणतंही असो ते कायमस्वरुपी असायला हवं,

मोदींजीनी मला नोकरी दिली असती तर खुप बंर झालं असंत.

2. ज्योति मेहतर. 

21 वर्षाची ज्योती सुद्धा त्या पाचपैकी आहे. तीचा नवरासुद्धा सफाई कामच करतो, आम्हाला दिवसाला 500 रूपये मिळायला हवेत. मात्र ते मिळत नाहीत, या कामात अजिबातच सुख नाहीये. मात्र ती प्राथर्ना करते की आमच्या कामाबद्दल मोदींना सांगावं, मात्र मोदी एवढे मोठे आहेत त्यांना असं अचानक कसं सांगायचं.

ज्योेतीला वाटतं की तीच्या नवऱ्याला नोकरी मिळावी, हे मैला उचलण्याचं काम कुठं तरी संपावं, आणि दोन सुखाचे घास भेटावेत.

3. प्यारे लाल. 

Screenshot 2019 03 05 at 6.15.50 PM
https://indianexpress.com/article/india/narendra-modi-sanitation-workers-kumbh-2019-manual-scavenging-5611133/

प्यारे लाल आपल्या पत्नीसोबत काम करण्यासाठी या कुंभमेळ्यात आलेले आहेत. मोदींना भेटलेला तो ऐतिहासिक क्षण आठवत ते म्हणतात की,

मोदींना आम्ही जेमतेम एक मिनीट भेटलो, त्यांना परत एकदा भेटायला मिळावं.

त्यांचं म्हणणं आहे की, त्यांना सफाई काम करून जे पैसे भेटतात ते जेमतेम आहेत, आम्ही घरदार सोडून इकडं येतोत. त्यामुळे मोदींनी आमचा पगार वाढवायला हवा. मात्र त्याचा पगार काही वाढला नाही, मात्र मोदी आपल्याला भेटले याचाच त्यांना जास्त आनंद आहे. त्यामुळे मोदीनं दिलेलं उपरणं त्यांनी अजूनही खांद्यावरून काढलेलं नाही.

4. चौबी. 

त्या दिवशी सकाळी 11 वाजताच मी हाँलमध्ये गेली होती. बाकी चार जणांसोबत मोदी येण्याची वाट पाहत होतोत. संध्याकाळी मोदी आले आणि त्यांनी आमचे पाय धुतले. चौबीचं पतीनं सांगितलं की चौबी मोदींना काहीच बोलली नाही, मात्र मी असतो तर नक्की बोललो असतो, मात्र, मोदी आम्हा पाचजणांना फक्त पाच मिनिटेच भेटले तुम्ही तिथं असतात तर तुम्हाला कळलं असतं, असं चौबीनं नवऱ्याला सांगितलं.

मोदींनी आमचा पगार 15000 वरून 20000 करायला हवं, असं तीच म्हणणं आहे.

5. नरेश कुमार. 

Screenshot 2019 03 05 at 6.15.37 PM
https://indianexpress.com/article/india/narendra-modi-sanitation-workers-kumbh-2019-manual-scavenging-5611133/

नरेश कुमार याबाबत नाराज आहेत, त्याचं म्हणणं आहे की, सरकार गरिब लोकांकडे लक्ष देत नाही, जात-पात हाच सगळ्यात मोठी समस्या आहे. मोदींनी आमचे पाय धुतले ही सन्मानाची गोष्ट आहे, मात्र मला मोदींना बोलण्याची संधी दिली असती तर, आमचा पगार वाढवण्य़ाबाबत आणि जात- पात नष्ट करण्याबाबत बोललो असतो.  मात्र देशात बदल घडाय़ला हवा, मात्र तो होतांना दिसत नाही, गरिब आणि मागास वर्ग अडचणीत आहे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.