मोदींना दोन डझन धमक्या आल्या आहेत, पण केसाला धक्का लावण्याची हिंम्मत झाली नाही

केरळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आत्मघातकी बॉम्बनं हल्ला करण्यात येईल, अशी धमकी मोदींच्या केरळ दौऱ्याआधी देण्यात आली आहे. २४ एप्रिलला सुरु होणाऱ्या मोदींच्या दोन दिवसीय दौऱ्याआधी हे धमकीचं पत्र राज्य भाजपचे अध्यक्ष के. सुंदरन यांना मिळालं आहे.

यापूर्वी देखील २०२२ मध्ये मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये मोदींना ठार मारण्याच्या धमकीचा मेल आल्याची माहिती सूत्रांकडून मीडियाला मिळाली होती. या मेलमध्ये लिहण्यात आलं होतं… 

“मोदींना मारण्यासाठी २० स्लीपर सेल तयार होत आहेत. त्यांच्याकडे २० किलो आरडीएक्स देखील आहे. २ कोटी लोकांना मारण्याचा प्लॅन देखील तयार झाला आहे. इतकंच नाही तर या कटाबाबतची माहिती बाहेर येऊ नये म्हणून मी आत्महत्या करतोय, कारण माझा दहशतवाद्यांशी संबंध आहे, असं देखील या मेल करणाऱ्याने म्हणलं आहे.

आत्ता हे देखील फेक निघालं पण झालय अस की मोदींना जीवे मारण्याची धमकी मिळणं ही पहिलीच गोष्ट नाही, आजवर दोन डझनहून अधिकवेळा मोदींना धमक्या आलेला आहे. कधी आणि कशा तर

२००९ 

२००९ मध्ये गुजरात सरकारच्या क्राईम ब्रांचचा संदर्भ देत एका मीडिया रिपोर्टनुसार, मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारे फोन केलेल्या २ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

२०१०

त्यानंतर २०१० मध्ये दहशतवादी संघटना, लष्कर-ए-तोयबाने मोदींच्या हत्येचा कट रचण्यासाठी केरळमध्ये अनेक तळ उभारले होते.

ऑक्टोबर २०१३

पटणा येथे मोदींच्या रॅलीत गांधी मैदानाच्या ठिकाणी बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या दहशतवाद्यांनी एकूण नऊ बॉम्ब पेरले होते. मोदींना जीवे मारण्याचा  त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.

२०१४

 २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपने घोषित केले होते. अन २०१३ च्या एप्रिल ते २०१४ एप्रिल दरम्यान मीडियाने किमान ५ वेळेस मोदींना मारण्याच्या योजना आखल्या गेल्याच्या बातम्या दिल्या होत्या. 

मे २०१५  

भाजप सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने,  पं दीनदयाल उपाध्याय यांच्या वडिलोपार्जित गावातील रॅलीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्टेज उडवून देण्याची धमकी देणारा व्हॉट्सअॅप मॅसेज गुप्तचर यंत्रणेला आला होता.

फेब्रुवारी २०१७  

या दरम्यान यूपी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, मऊ जिल्ह्यात भाजपच्या प्रचार रॅलीदरम्यान एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. 

माहितीनुसार, हरेन पांड्या खून प्रकरणातील आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी पंतप्रधानांच्या ताफ्यावर रॉकेट लाँचर आणि स्फोटकांनी हल्ला करण्याची योजना आखली होती. कडेकोट बंदोबस्तात मोदींच्या रॅलीत काही घातपात झाला नव्हता.

जून २०१७

केरळचे डीजीपी टीपी सेनकुमार यांनी दावा केला होता की, कोचीच्यामेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते तेंव्हा त्यांच्या या कार्यक्रमात दहशतवादी हल्ला होणार होता पण पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला पण पोलीस दलाने त्याबाबतचा तपशील उघड करण्यास नकार दिला होता.

जून २०१८ 

या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचा माओवाद्यांचा कट असल्याचा पुणे पोलिसांनी दावा केला होता.  रोना विल्सनच्या घरी सापडलेल्या एका पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रोड शो दरम्यान टार्गेट केले जाईल अशी लिंक सापडली होती. एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या संदर्भात मुंबई, नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये विल्सनचा समावेश होता.

जून २०१८  

या दरम्यान  जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीओकेच्या रावळकोटशी संबंधित मौलान बशीर अहमद हा व्यक्ती उघड उघड असं म्हणला कि, आम्ही मोदींना फाशी देऊ. तसेच पीओकेच्या लोकांनी आपल्या मुलांना जिहाद शिकवावा असं देखील या बशीर अहमदने म्हंटलं होतं. 

२ जून २०१९

हे प्रकरण राजस्थानमधील आहे. राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन लाल सैनी यांना एक पात्र आलेलं ज्यात पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. जयपूर पोलिसांनी याप्रकरणी तीन-चार जणांची चौकशीही केली होती पण त्यात ठोस माहिती काय समोर आली नाही.

८ जून २०१९

८ जून रोजी पंतप्रधान मोदींनी केरळमधील गुरुवायूर मंदिराला भेट दिली होती. पण त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ७ जून ला एका लिफाफ्यात ५०० रुपयांच्या नोटेवर मल्याळम भाषेत पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी लिहिलेली होती. 

ऑगस्ट २०२० 

एका व्यक्तीने १०० क्रमांकावर  नोएडा पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

नोव्हेंबर २०२०

 २०२० मध्ये देखील दिल्ली पोलिसांना फोन आला होता. फोन करणाऱ्याने पंतप्रधानांना मारणार असल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. चौकशीत त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.

डिसेंबर २०२०

२६ डिसेंबर रोजी भारतीय किसान युनियन नेत्याच्या पत्नीने पंतप्रधान मोदींवर चाकूने वार करण्याची धमकी दिल्याची बातमी आली होती. 

मे २०२

या दरम्यान यूपी पोलिसांच्या व्हाट्स ऍप नंबरवर एक कॉल आलेला की, मी चार दिवसात मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींना ठार मारणार आहे. त्यानंतर असा धमकीचा कॉल केलेल्या एका किशोरवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. 

जून २०२१ 

२०२१ मध्ये मोदींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. सलमानने रात्री PCR ११२ वर पोलिसांना फोन केला आणि मला मोदींना मारायचे आहे असं थेट सांगितलं.

डिसेंबर २०२१

वाराणसीच्या फुलपूरमध्ये एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बस्फोट करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं प्रकरण घडलं होतं. सुरेरी पोलिस ठाण्याचा मेन गेटवरच हे धमकीचं पात्र चिटकवण्यात आलं होतं.. या प्रकरणात अटक केलेल्या तरुणाने पोलिसांना, अनिश अन्सारी आणि अब्दुल अन्सारी हे दोन व्यक्ती मोदींना बॉम्बने उडवून लावतील असं सांगितलं, पण तपासात हे दोन व्यक्ती काय समोर आलेच नव्हते..

या सगळ्या धमकीचे पत्र, फोन, मॅसेज इत्यादी सगळ्या घटना आणि आजची घटना. एकूण १८ घटना होतायेत…जितके मीडिया रिपोर्ट्स आम्हाला मिळालेल्या त्यातून तरी या इतक्याच नोंदी मिळाल्यात. बाकी याही पेक्षा जास्त असू शकतात यात शंका नाही.

कित्येक धमक्या आल्या पण मोदींच्या केसालाही धक्का लागला नाही हे मात्र आपल्या सुरक्षा यंत्रणांचं कौतुक म्हणायला लागेल. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.