मोदीच नाही तर प्रतिभा ताई पाटलांना देखील परदेशात सर्वोच्च सन्मान मिळाला होता!

हल्ली हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतान सरकारनं ‘नगदग पेल जी खोरलो’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यात आणि मोदी भूतानचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी ठरलेत.

पण फक्त नरेंद्र मोदीच नाहीत तर माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांना सुद्धा मेक्सिकोचा सर्वोच्च सन्मान मिळाला होता. 

स्वातंत्र्यलढय़ात आपले अमूल्य योगदान दिलेल्या विजयालक्ष्मी पंडित या भारताच्या मेक्सिकोतील पहिल्या राजदूत होत्या. त्या काळापासून भारत आणि मेक्सिको या देशांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत. २००७ ते २०१२ या कालखंडात प्रतिभा ताई भारताच्या राष्ट्रपती होत्या. त्या पदावर असताना मेक्सिकोचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले होते. त्यांच्या निमंत्रणावरून प्रतिभा ताई यांनी २००८ मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. भेटीच कारण होत,

मेक्सिको आणि भारत या दोन्ही देशांपुढे असलेले नागरी प्रश्न हे समान असल्याने दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यातून ते सोडवणे.

त्याच पार्श्वभूमीवर प्रतिभा ताईंनी मेक्सिकोचा दौरा केला होता. त्यांनी भेट दिल्या नंतरच्या या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले. राष्ट्रपती असताना अधिकृत दौऱ्यांमध्ये केलेला हा सर्वप्रथम दौरा होता. पुढे मेक्सिकोच्या जडणघडणीत प्रतिभा ताईंनी दिलेल्या योगदानाबाबत मेक्सिको सरकारला कृतज्ञता व्यक्त करायची होती.

म्हणून प्रतिभा ताईंच योगदान लक्षात घेऊन २०१९ मध्ये त्यांना मेक्सिको सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणारा ‘ऑर्डेन मेक्सिकाना दे अ‍ॅग्विला अ‍ॅझटेका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हा पुरस्कार शांतता प्रस्थापित करण्यासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. त्याचप्रमाणे  मानवतेसाठी उत्कृष्ट कार्य, मेक्सिको आणि इतर देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दिला जातो. प्रतिभा ताई पाटील यांच्या आधी हा पुरस्कार मिळवण्याचा मान भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जातो. त्याचप्रमाणे नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ द्वितीय, बिल गेट्स यांना यापूर्वी या पुरस्काराने गौरवण्यात आलयं.

शाही गरुड हा मेक्सिकोचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि मेक्सिकन ध्वजावर देखील त्याचे चित्र आहे. या पुरस्कारावर याचं गरुडाचं चित्र कोरण्यात आलं आहे. ते एक आवश्यक असं प्रतीक आहे जे त्यांच्या अझ्टेक भूतकाळाला आधुनिकतेकडे निघालेल्या राष्ट्राशी जोडते.

मेक्सिकोच्या भारतातील राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांनी प्रतिभा पाटील यांना प्रदान केला. हा पुरस्कार प्रतिभा ताईंनी MCCIA भवनात या पुरस्काराचा स्वीकार केला. प्रतिभा ताईंनी ही या सोहळ्याची आठवण म्हणून मेक्सिकोच्या राजदूत सॅन्युआ एल्बा प्रिया यांना म. गांधी यांच्या स्मृतीचे प्रतीक असलेला चरखा भेट म्हणून दिला होता.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.