जगावर राज्य करणारी व्हिक्टोरिया राणी एका भारतीय माणसाच्या प्रेमात पडली होती..

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात राणी व्हिक्टोरिया बद्दल अशी एक गोष्ट समोर आली होती कि इंग्लंडच्या राजेशाही परिवाराला आणि ब्रिटिश नागरिकांना ती घटना मान्यच नव्हती. एखाद्या पिच्चरला शोभेल असा हा किस्सा आहे म्हणजे यावर पिच्चर सुद्धा आला होता.

राजेशाही परिवारात वाढलेली महाराणी व्हिक्टोरिया एका भारतीय माणसावर भाळली होती. नक्की काय प्रकरण होतं जाणून घेऊया.

राणी व्हिक्टोरियाचं संगोपन हे अगदी शिस्तीचं होतं. तिच्या जन्माच्या ८ महिन्यानंतर तिच्या वडिलांचं निधन झालं आणि तीच पुढील शिक्षण हे तिच्या मामाने पूर्ण केलं. तीच हे शिक्षण इतकं कडक शिस्तीचं होतं कि तिच्याजवळ पुरुषांना फिरकू दिल जात नव्हतं कि तिला पुरुषांशी बोलायची मोकळीक दिली जात नसे.

वयाने मोठे असलेले नोकर चाकर यांनासुद्धा तिला भेटण्याची परवानगी नसे.

तिला शिकवायला जे शिक्षक येत ते जोपर्यंत शिकवत असे तोवर तिथे एखादी दासी किंवा तिची आई तिथे तिच्यावर लक्ष ठेवून असे. इतक्या शिस्तीत वाढलेल्या राणी व्हिक्टोरियाची एक गोष्ट पुढे भरपूर प्रसिद्ध झाली आणि ती ब्रिटिशाना कायम सलत राहिली.

तर ती घटना अशी होती कि त्यावेळी बोललं जाऊ लागलं कि राणीला प्रेम झालंय, आता ती ब्रिटनची राणी आहे म्हणल्यावर एखाद्या राजबिंड्या राजकुमाराशी तिला प्रेम झालं असेल पण जेव्हा मेन गोष्ट समोर आली तेव्हा सगळेच कोमात गेले होते.

ब्रिटनच्या पहिल्या राणीला व्हिक्टोरियाला प्रेम हे कोण्या राजकुमाराशी झालं नव्हतं तर एका भारतीय नोकराशी झालं होतं. साधा सरळ असलेला तो भारतीय होता अब्दुल करीम. साध्या भोळ्या अब्दुल करीमवर राणी व्हिक्टोरिया भाळली होती. 

आता हि लव्ह स्टोरी कशी सुरु झाली….

ज्यावेळी अब्दुल करीम २४ वर्षाचा होता तेव्हा तो १८८७ साली आग्र्याहून इंग्लंडला गेला होता. त्याला भारताकडून एक भेट म्हणून राणी व्हिक्टोरियासाठी पाठवण्यात आलं होतं. अब्दुल करीम हा देखणा तरुण होता आणि हुशारही होता, एका वर्षाच्या आतच त्याला शिक्षकाचा दर्जा देण्यात आला. त्याला आदेश देण्यात आला कि महाराणीला हिंदी आणि उर्दू भाषा शिकवावी.

आता अब्दुल करीम आणि राणी व्हिक्टोरिया यांची हि लव्ह स्टोरी उजेडात कधी आली तर अब्दुल करीमला डायरी लिहिण्याची सवय होती. त्यातून कळलं कि एका भारतीय नोकराच्या प्रेमात राणी व्हिक्टोरिया पडली आहे. व्हिक्टोरिया आणि अब्दुलची लव्ह स्टोरी एकदम फिल्मीचं होती म्हणजे गरीब घरातला मुलगा आणि श्रीमंत घरातील मुलगी. 

अब्दुल करीम हा अंगकाठीने अगदीच साधारण होता पण तो हुशार होता आणी त्याच्याकडे बोलण्याची जी ताकद होती त्यावर महाराणी भाळली. दोघांमध्ये अगदीच आपुलकीचं नातं तयार झालं होतं. अब्दुलच्या स्वभावामुळे व्हिक्टोरिया त्याच्या जवळ येत गेली.

व्हिक्टोरियाने अब्दुलला पुढे मुन्शी हे नाव दिलं. भारताचा सचिव म्हणून त्याचा गौरव केला. हे प्रेमप्रकरण सुरु झालं तेव्हा व्हिक्टोरियाचं वय होतं ६० वर्ष. 

महाराणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर १९०१ मध्ये मुन्शी अब्दुल करीमला भारतात पाठवण्यात आलं. इतकंच नाही तर व्हिक्टोरियाच्या राजेशाही परिवाराने अब्दुल क्रीम आणि व्हिक्टोरियामध्ये झालेला जो पत्रव्यवहार होता तो सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अब्दुल करीम हे १५ वर्ष महाराणी सोबत राहिले.

भारतात आल्यानंतर आग्रा मध्ये अब्दुल करीम हे एकटेच राहत होते. आग्रामध्ये व्हिक्टोरियाने त्याला दिलेल्या संपत्तीसोबत त्यांनी आपला शेवटचा काळ घालवला. वयाच्या ४६ व्या वर्षी अब्दुल करीमचं निधन झालं.

या दोघांच्या लव्ह स्टोरीवर आधारित ” THE MUNSHI ” नावाचा सिनेमाही आला होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.