रामगोपाल वर्मा म्हणालेला, “आमिरपेक्षा भारी ॲक्टिंग त्या वेटरने केलीय.”

रामगोपाल वर्माचा बॉलिवूडमध्ये एक वेगळा पॅटर्न आहे. त्याचा चाहतावर्ग वेगळा आहे. जवळपास २५ वर्षांपूर्वी रामगोपाल वर्माने बॉलीवूडला एक मास्टरपीस सिनेमा दिला होता. आमिर खान, जॅकी श्रो आणि उर्मिला मातोंडकर अशी तंगडी स्टारकास्ट असल्याने हा सिनेमा तेव्हा जबरदस्त चालला होता. इतकी वर्ष उलटून गेली तरीही हा सिनेमा प्रेक्षकांच्या ध्यानातून गेलेला नाही हेच या सिनेमाचं यश म्हणावं लागेल.

पण रंगीला सिनेमानंतर आमिर खान आणि राम गोपाल वर्माने परत कधी एकत्र काम केलं नाही. यामागे एक मोठी कॉंट्रोव्हर्सी झाली होती. हि कॉंट्रोव्हर्सी इतकी गाजली होती कि परत हे दोन अभिनेता-दिग्दर्शक सोबत दिसले नाही. याच सिनेमानंतर आमिर खान परत कुठल्याही फिल्म अवॉर्ड फंक्शनला गेला नाही. अगोदर हि कॉंट्रोव्हर्सी काय होती ते जरा डिटेलमध्ये बघूया. 

रंगीला रिलीज झाल्यानंतर राम गोपाल वर्मा म्हणाला होता कि,

रंगिलामध्ये अमीरपेक्षा भारी ॲक्टिंग वेटरने केली होती.

आता राम गोपाल वर्माच्या या स्टेटमेन्टवर भयंकर राडे झाले. वेटरच्या रोलमध्ये होते छोट्या पडद्यावरील मोठे ऍक्टर राजीव मेहता. आमिर खानला रंगीला सिनेमासाठी बेस्ट ऍक्टरचं नॉमिनेशन होतं, आणि इकडे राम गोपाल वर्मा म्हणतोय कि आमीरपेक्षा वेटरने भारी ॲक्टिंग केली. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. 

या प्रकरणाची उकल स्वतः रामगोपाल वर्मानेच केली होती. त्याने सांगितलं कि मी एकदा पत्रकार खालिद मोहम्मद यांना मुलाखत देत होतो तेव्हा मी टेक्निकल पॉईंट मांडला कि कार्य प्रदर्शन कस केलं जात हे लोकांना समजत नाही. या वाक्यासाठी मी उदाहरण दिलं कि सिनेमात वेटरचा सिन आहे, ज्यात आमिरखान म्हणतो कि एसी है तो इधर घुमा ना. यावर लोकं वेटरच्या हावभावांवर हसतात ना कि आमिरच्या वाक्यावर. 

 

या सीनला लाफ्टर मिळाल्याने लोकांना वाटले कि हि आमिरची कॉमेडी आहे पण ते तस नव्हतं इथं वेटरच्या एक्सप्रेशनमुळे हा सिन उचलला गेला. म्हणून त्या सीनला आमिर खान पेक्षा भारी ॲक्टिंग वेटरने केली होती.

हि वेटरची कास्टिंग सुद्धा राम गोपाल वर्माने केली होती. राजीव मेहता हे एक उत्तम कॉमेडी अभिनेते आहेत. त्यामुळे तो सिन राजीव मेहतांच्या वेटरच्या रोलने खाल्ला असं रामू म्हणतो.

आता रामूचं हे स्टेटमेंट खालिद मोहम्मदने हायलाईट केलं आणि बातमी दिली कि राम गोपाल वर्मा म्हणतो कि अमीरपेक्षा भारी ॲक्टिंग वेटरने केली. त्या काळी आमिर खान अवॉर्ड सोहळ्याला जात नसायचा. रामूचं हे स्टेटमेंट ऐकून आमिरने त्याला फोन केला पण रामू शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याने फोन घेतला नाही आणि आमिरचा गैरसमज पक्का झाला कि रामूचं हे वाक्य बोलला असावा. 

पण आमिरने रंगीलात साकारलेला मुन्ना हा रामूचा सुरवातीच्या काळातला मित्र होता. तो हॉटेलवाला सिन खरोखर घडलेला होता. त्या मित्राच्या आठ्वणीवरून रामूने रंगीला सिनेमा बनवला होता. रामू आजही आमिरला ग्रेट अभिनेता म्हणतो आणि गैरसमजामुळे अमीरखानला तो वाईट सुद्धा म्हणतो. या कॉंट्रोव्हर्सीमुळे दोघांनी परत एकत्र काम केलं नाही.

यातला वेटरचा रोल केलेले राजीव मेहता यांनी छोट्या पडद्यावर खिचडी या मालिकेत काम केलेलं सोबतच बा बहू और और बेबी या सिरियलमध्येही काम केलं होतं. छोट्या पडद्यावर विनोदी अभिनेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्या सीनच क्रेडिट कोणी खाल्लं आमिर कि वेटर याच उत्तर देऊन रामूने जे स्टेटमेंट केलं ते चांगलंच गाजलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.