कधी काळी मुंबईत बटाटा विकणाऱ्या फारुखमुळेच आर्यन खानचा बाजार उठलाय ?

बॉलिवूडचा बादशाह म्हणून मिरवणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा ड्रग्जमुळे नुसता बाजार उठलाय. कालपासून प्रकरण इतकं तापलय म्हणता, सांगायलाच नको. पण आता यात एक कनेक्शन समोर येतंय ते म्हणजे,

बटाटा गँग..

क्रूझवर जे ड्रग्ज पॅडलरहोते त्यांची चौकशी झाली. त्यात, संशयाची सुई मुंबईसह दिल्ली व गुडगावकडेही वळली. क्रूझवर होणाऱ्या पार्टीबाबतचा संशय बटाटा गँगवर आहे.

एनसीबीची सूत्र म्हणतायत,

ड्रग पॅडलरच्या माध्यमातूनच युवकांपर्यंत मादकपदार्थ पोहोचविले जातात. यात बटाटा गँग सक्रीय भूमिका बजावतो. गँगच्या सदस्यांच्या इशाऱ्यावरूनच अशा प्रकारच्या पार्टींचे आयोजन केलं जातं. या पार्टीतही याच गँगने ड्रग्जचा पुरवठा केल्याचा संशय एनसीबीला आहे. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा पुरवठा करतो.

पण हि बटाटा गँग नक्की आहे तरी काय ?

मुंबईत ज्या काही हायप्रोफाईल पार्टीज होतात, त्यांना चांगल्या दर्जाच ड्रग्ज पुरवण्याच काम बटाटा गँग करते. बटाटा गँगचे सर्वेसर्वा आहेत, फारुख बटाटा त्याचा मुलगा शाहदाब बटाटा आणि सैफ बटाटा. कधीकाळी मुंबईच्या चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये हा फारुख बटाटा विकायचा. जसं का त्याने ड्रग्जच्या दुनियेत पाय ठेवला त्यानं कधी माग वळून पाहिलंच नाही.

आज मुंबईपासून ते देशभरातल्या मोठ्या मोठ्या शहरात ज्या रेव पार्ट्या होतात त्यात बटाटा गँगच नावं येतच येत.

नव्वदीच्या दशकात हा फारुख मुंबईतल्या झोपडपट्टीच्या गल्ल्यांमध्ये बटाटा विकायचा. त्या काळात या गल्ल्यांमध्ये अंडरवर्ल्डशी संबंधित छोटे मोठे गुंड राहायचे. त्या काळात सुद्धा ड्रग्जविक्री जोरात चालायची. या फारुखने अंडरवर्ल्डच्या त्या गर्दुल्यांशी ओळख वाढवायला सुरुवात केली.

या ओळखीतूनच फारुखला छोटी मोठी ड्रग्जने आण करण्याची काम मिळू लागली. यात मोठा पैसा असल्यानं फारुखला श्रीमंत होण्याची दिवास्वप्न पडू लागली. त्यानं ठरवलं की आपण असं ड्रग्ज पेडलर झालो तर आयुष्यभर तोच धंदा करावा लागेल. त्या पेक्षा आपण स्वतःचा ड्रग्जचा धंदा सुरू करू.

आता धंदा तर मोठा करायचाय आणि ते पण दाऊदशी पंगा न घेता. कारण त्या काळात सर्वात मोठा ड्रग्जचा तस्कर दाऊदच होता. मग त्याने आपल्या थोड्या फार ओळखी वापरायला सुरुवात केली. आणि तो पहिल्यांदा दाऊदची बहीण हसीना पारकर आणि नंतर तिच्या माध्यमातून दाऊद पर्यंत पोहोचला.

त्यानं पहिल्या टप्प्यात अबू सालेम आणि डी गँगच्या मदतीनं मुंबई बंदराच्या आसपास ड्रग्जची तस्करी करायला सुरुवात केली.

याच काळात त्याला या बंदरावर अशी काही नेटवर्क मिळालीत की ज्यामुळे फारुखचं स्वतःच साम्राज्य उभं राहू शकत होत. आणि ते तसं झालं ही. तो इतका मोठा ड्रग्ज सप्लायर झाला कि त्याने मुंबई आणि देशभरातली शहर वाटून घेतली.

आज पण मुंबई ही ड्रग्ज सिंडिकेट मध्ये हिश्श्यात वाटली आहे. साऊथ मुंबईमध्ये रिंकू पठाण ऍक्टिव्ह आहे तर बांद्रा आणि मीरा रोडला फारुख बटाटाचे गर्दुल्ले ड्रग्जचे सप्लायर आहेत.

बटाटाने आपल्या गॅंग मध्ये फक्त पोरांनाच नाही तर पोरींनीना सुद्धा सामील केलं होत. त्याच्यामुळे त्याचा ड्रग्जचा व्यवसाय भरभराटीला आला. फारुखने पुढे आपलं नेटवर्क इंटरनॅशनल लेव्हलला वाढवायला सुरुवात केली. त्याने नायजेरियन आणि मोरक्कन लोकांना हाताशी धरून परदेशातून ड्रग्जची तस्करी करायला सुरुवात केली.

जेव्हा फारुख बॉलीवुडच्या संपर्कात आला तेव्हा त्याला देशभरात होणाऱ्या बॉलिवूडच्या पार्ट्यांची ऑर्डर मिळू लागली. मग फारुखने मुंबई सहित गोवा आणि जिथं जिथं समुद्र किनारे आहेत अशा ठिकाणी आपलं नेटवर्क वाढवायला सुरुवात केली. आता फारुख नेटवर्क वाढवतोय म्हणून त्याला बाकीच्या ड्रग्ज तस्करांनी खुली मुभा दिली असं नव्हतं. यात माल कोण पोहचवणार म्हणून बऱ्याच गँगचे फारुख बरोबर क्लॅशेस व्हायला लागले.

पण त्यावेळी बॉलिवूडचे मोठे मोठे सितारे अभिनेते यांनी हस्तक्षेप केला आणि प्रकरण मिटलं. 

फारुख बटाटाने आणि त्याच्या मुलांनी मुंबईतल्या सगळ्या ड्रग्ज पॅडलरला त्यांच्या अंडर आणायला खूप प्रयत्न केला. यात त्याला बॉलीवुडची मदत मिळाल्याचं म्हंटल जात. बॉलिवूडशी इतके चांगले संबंध असणारा फारुख बटाटा नामनिराळाच म्हणायला पाहिजे.

या ड्रग्जच्या धंद्यात मुंबईचे गर्दुल्ले म्हणतात की, नशे का धंधा भरोसे का धंधा माना जाता है, और बटाटा ने इस धंधे में विश्वास जमाना शुरू कर दिया। 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.