रेमंडनं एक मोठं काम केलं, कंडोममध्ये स्टाईल असते हे भारताला शिकवलं…

आज कुणी कामसूत्र म्हणलं की लगीच विषय बदलला जातो. त्याबाबत उघडपणे कुणीही बोलत नाही; पण गुप्तपणी बऱ्याच क्रिया घडत असतात. यावर बरीच चर्चा होते. कामसूत्र नावानी एकेकाळी एक कंडोम वैदकीय बाजारात विक्रीस आला व्हता, हे बऱ्याच जणांना माहित असल; अनेकांनी वापरला पण असेल. तरीही त्याच्याविषयी बोलायला सगळेच टाळाटाळ करतात.

म्हंजी कसं ‘आपलं ठेवायचं झाकून आणि बाकीचं वाचायचं पार डोळे फाडून, बघायचं वाकून ’, तरीही हरकत नाही.

ज्या गोष्टी वापरतो त्याच्याबद्दल काय लाजायचं ? बोलायचं बिनधास्त. त्याला काय होतंय…

कामसूत्र कंडोमची एक जाहिरात १९९० च्या काळात खूप कमी वेळात लई तुफान फेमस झाली होती. त्याचं कारण असं की त्यावेळी निरोध म्हणून सरकार निर्मित कंडोमचा एकच ब्रँड वैद्यकीय बाजारात होता.

त्यात तो काय फार लई भारी होता अशातली गोष्ट नाय; पण चला ब्वा, नाय काही तर हे. कामात काम तर होतंय. अश्या विचाराने लोकं वापरायची. (हे आम्हाला त्या लोकांनीच सांगितलं)

पण कसंय, जशी पाच किलोमीटरवर भाषा, तिचा लहेजा बदलतो तसं दर दिवसाला काहीतरी नवीन पाहिजे माणसाला. जुनं ते सोनं हे नाय जमत आता.

काहीतरी बदल पाहिजे हे ओळखलं रेमंडच्या गौतम सिंघानिया यांनी.

त्यांनी काय केलं, तर कामसूत्र नावाची कल्पना डोक्यातुन बाहेर आणली. ठरवलं की कामसूत्र कंडोम असं जर आपण बाजारात आणलं तर लोकांना आकर्षण वाटण आणि कंडोम घेतील.

शारीरिक सुखापायी विनाकंडोमने होणारी कुटुंबाची वाढ थांबवता येणार आणि ग्राहकांना नवं काहीतरी देऊन आनंदात भर घालता येणार. रेमंडच्या गौतम सिंघानिया यांचं पक्कं ठरलं की, आता कामसूत्र आणून लोकांची सूत्र हालवायची, कंडोम खरेदी करण्यासाठीची.

गौतम सिंघानिया ‘ कामसूत्र कंडोम ’ ही कल्पना घेऊन अलेक पदमसी यांच्याकडे गेले. पदमसी म्हणजे जाहिरात क्षेत्रातली मोठी हस्ती.

दोघांच्या भेटीनंतर पदमसी म्हणाले की आम्ही पुरुषांच्या कंडोम वापरा संबंधी बराच रिसर्च केलेला आहे. तो असं सांगतो की कौटुंबिक सुरक्षेसाठी निरोध म्हणून कंडोम वापरण्यात लोकांना काय इंटरेस्ट राहिला नाय. आनंद तर लांबच पण कंडोम म्हणलं की भीती वाटत्या.

त्यांच्या संशोधनातून असं लक्षात आलं की सेक्स करायचं म्हणलं की कंडोम हा शेवटचा पर्याय होता आणि तोही निरोध नावाचा सरकारी होता.

फार काही स्पेशल वगैरे अश्यातला भाग नाही. मग त्यांनी मिळून ठरवलं मार्केटमध्ये आणायचा सेक्सी कंडोम. ज्यानं लोकांना आनंद मिळेल. भीती वाटणार नाही.

अश्या प्रकारे रेमंडच्या गौतम सिंघानिया यांच्या कल्पनेवर कामसूत्र कंडोम तयार करायचं ठरलं.

पुढं कामसूत्र कंडोम बाजारात आला. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. कामसूत्र नावानेच अल्ट्रा थिन, डॉटेड सारख्या अनेक कंडोमची रचना गौतम सिंघानिया आणि पदमसी यांच्या टीमने मिळून केली.

तेव्हापासून घरातली लोकसंख्या उगाच चीनच्या लोकसंखेइतकी होऊ नये म्हणून निरोधासाठी वापरण्यात येणारा कंडोम जीवनशैली आनंद देणारा कंडोम म्हणून सकारात्मक भावनेनं वापरण्यात येऊ लागला. यातून एक लोकांना कळालं की मादकता वाढवण्यासाठी शरीराने नग्नच व्हावं लागतं असं नाही. इतर अनेक पर्याय आहेत.

१९९० नंतरच्या काळात पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला कामसूत्र कंडोमची प्रसिद्धी करण्यात येक लई वाढीव जाहिरात बनवण्यात आली व्हती.

ही जाहिरात दिवंगत लेखक प्रबुद्ध दास गुप्ता यांनी लिहिली होती. ती जाहिरात अशी होती की पूजा बेदी शॉवरने पाणी अंगावर घेते. त्यात ती तिची मादकता दाखवती. आणि बोलत राहती की कामसूत्र, कामसूत्र तिचं हे बोलणं सुद्धा लई डेंजर मादक असतं.

त्यात नंतर तिकडून हिरो येतो आणि मगआणि जाहिरातीचा शेवट होतो, प्रीमियम कंडोम कामसुत्र.

विशेष म्हणजे जाहिरातीमध्ये कुठंचं फार नग्नता दाखवली नाही. पण फिलिंग लई बेक्कार मादक.

ही जाहिरात, जाहिरात गुरु म्हणून प्रसिद्ध असलेल्या अलेक पदमसी यांच्या लिंटासा या जाहिरात एजन्सीकडून बनवण्यात आली होती. ती सगळ्या चॅनेलवर यायची. असं म्हणतात की लोकं जाहिरात बघायसाठी टीव्ही बघायचे. पण दूरदर्शनने मात्र तिचं प्रसारण केलं नाही. तिच्यावर बंदी आणली. तरीही इतर चॅनेलमार्फत ती लोकांपर्यंत आलीच..

आणि भारताला कळली आणखी एक नवी स्टाईल.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.