रेमंडवाल्यांनी कंडोम बनवलं आणि भारताला कळालं यात पण स्टाईल असते

आज कुणी कामसूत्र म्हणलं की लगीच विषय बदलला जातो. त्याबाबत उघडपणे कुणीही बोलत नाही; पण गुप्तपणी बऱ्याच क्रिया घडत असतात. यावर बरीच चर्चा होते. कामसूत्र नावानी एकेकाळी एक कंडोम वैदकीय बाजारात विक्रीस आला व्हता, हे बऱ्याच जणांना माहित असल; अनेकांनी वापरला पण असेल. तरीही त्याच्याविषयी बोलायला सगळेच टाळाटाळ करतात.

म्हंजी कसं ‘ आपलं ठेवायचं झाकून आणि बाकीचं वाचायचं पार डोळे फाडून, बघायचं वाकू वाकून ’, तरीही हरकत नाही.

ज्या गोष्टी वापरतू त्याच्याबद्दल काय लाजायचं ? बोलायचं बिनधास्त. त्याला काय होतं. त्यामुळे आज आपुन त्याबाबत जाणुन घेणार आहोत.

कामसूत्र कंडोमची एक जाहिरात १९९० च्या काळात खूप कमी वेळात लई तुफान फेमस झाली व्हती. त्याचं कारण आसं की त्यावेळी निरोध म्हणून सरकार निर्मित कंडोमचा एकच ब्र्यांड वैद्यकीय बाजारात व्हता.

त्यात तो काय फार लई भारी व्हता अश्यातली गोष्ट नाय; पण चला ब्वा, नाय काही तर हे. कामात काम तर होतंय. अश्या विचाराने लोकं वापरायची. पण समाधानी व्हते असं नव्हतं. त्यात आपल्या लोकांची सवय आपल्याला माहित नाय व्ह्य, की जशी पाच किलोमीटर वर भाषा तिचा लहेजा बदलतो तसं दर दिवसाला काहीतरी नवीन पाहिजे माणसाला. जुनं ते सोनं हे नाय जमत आता. लग्न सुद्धा एक सोडून दोन दोन तीन तीन करतेत लोकं तर, अजून काय घ्याता !

काहीतरी बदल मिळण या हिशोबानी रेमंडच्या गौतम सिंघानिया यांच्या डोक्यात एक कल्पना आली कीका नाय आपुन लोकांच्या लैंगिक विषयावर हात घालावा.

नाय म्हंजी सध्या ते ज्येवं कंडोम वापरीतेत, त्यानं कंटाळलेले आसतील ना. मग कल्पनेचा विस्तार करून सविस्तर पणे त्यांनी कामसूत्र नावाची कल्पना डोक्यात तुन बाहेर आणली. ठरवलं की कामसूत्र कंडोम असं जर आपण बाजारात आणलं तर लोकांना आकर्षण वाटण आणि कंडोम घेतेन.

शारीरिक सुखापायी विनाकंडोम ने होणारी कुटुंबाची वाढ थांबवता येणार. आणि ग्राहकांना नवं काहीतरी देऊन आनंदात भर घालता येणार. रेमंडच्या गौतम सिंघानिया यांचं पक्कं ठरलं. की आता कामसूत्र आणून लोकांची सूत्र हालवायचे, म्हंजी कंडोम खरेदी करण्यासाठी.

गौतम सिंघानिया ‘ कामसूत्र कंडोम ’ ही कल्पना घेऊन अलेक पदमसी यांच्याकडे गेले.

दोघांच्या भेटीनंतर पदमसी म्हणाले की आम्ही पुरुषांच्या कंडोम वापरा संबंधी बराच रिसर्च केलेला आहे. म्हणजे झालं आसं की कौटुंबिक सुरक्षेच्यासाठी निरोध म्हणून कंडोम वापरण्यात लोकांना काय इंटरेस्ट राहिला नव्हता. आनंद तर लांबच पण कंडोम म्हणलं की भ्याव वाटायचं.

काय ये की संभोग संशोधनातून आमच्या आस लक्षात आलं की सेक्स करायचं म्हणलं की कंडोम हा शेवटचा पर्याय होता आणि तोही निरोध नावाचा सरकारी होता.

फार काही स्पेशल वगैरे अश्यातला भाग नाही. मग आम्ही ठरवलं की का नाही आपन सेक्सी कंडोम तयार करू शकत ? देऊ लोकांना सेक्सी कंडोम. ज्याने त्यांना आनंद मिळेल. भयाव वाटणार नाही.

अश्या प्रकारे रेमंडच्या गौतम सिंघानिया यांच्या कल्पनेवर कामसूत्र कंडोम तयार करायचं ठरलं.

पुढं कामसूत्र कंडोम बाजारात आला. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. कारण कंडोम म्हंजी जिव्हाभावाचा विषय होऊन बसलाय न लोकांच्या. कामसूत्र नावानेच नंतर आत्ता जसे मोबाईल चे प्रकार येत ना सतराशे साठ, तशे अल्ट्रा थिन, डॉटेड सारख्या अनेक कंडोमची रचना गौतम सिंघानिया आणि पदमसी यांच्या टीमने मिळून केली.

तेव्हा पासून घरातली लोकसंख्या उगाच चीनच्या लोकसंखेइतकी होऊ नये म्हणून निरोधासाठी वापरण्यात येणारा कंडोम जीवनशैली आनंद देणारा कंडोम म्हणून सकारात्मक वापरण्यात येऊ लागला. यातून एक लोकांना कळालं की मादकता वाढवण्यासाठी शरीराने नग्नच व्हावं लागतं असं नाही. इतर अनेक पर्याय आहेत.

१९९० नंतरच्या काळात पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला कामसूत्र कंडोमची प्रसिद्धी करण्यात येक लई सेक्सी जाहिरात बनवण्यात आली व्हती.

ही जाहिरात दिवंगत लेखक प्रबुद्ध दास गुप्ता यांनी लिहिली होती. ती जाहिरात अशी होती की पूजा बेदी शॉवर ने पाणी अंगावर घेते. त्यात ती तिची मादकता दाखवती. आणि बोलत राहती की कामसूत्र, कामसूत्र तिचं हे बोलणं सुद्धा लई डेंजर मादक आसतं.

त्यामुळे जाहिरात पाहायला लागलं की भावनेचा पूर वाहायला लागू शकतो. त्यात नंतर तिकडून हिरो येतो आणि मग दोघांचं लगड चलतं. आणि जाहिरातीचा शेवट व्हतो. प्रीमियम कंडोम कामसुत्र. लई तुफान पुरुषप्रिय झाली होती जाहिरात. त्यात हिरोची भूमिका मार्क्स रोबिन्स ने केलेली हाय.

त्यांच्या दोघांच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या मादक कामसुत्राने देशातल्या लैगिंग लाजाळू पणा येका प्रकारे नाहीसा केला व्हता.

त्यात विशेष म्हंजी जाहिराती मध्ये कुठंचं फार नग्नता दाखवली नाही. पण फिलिंग लई बेक्कार मादक भरलेली व्हती. ती लोकांच्या डायरेक्ट केंद्रबिंदू पर्यंत गेली आसणार, हे नक्की.

ही जाहिरात, जाहिरात गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले अलेक पदमसी यांच्या लिंटासा या जाहिरात एजन्सीकडून कामसूत्र कंडोम ची जाहिरात बनवण्यात आली व्हती. ती सगळ्या चॅनेलवर यायची. त्यावेळी ती लई चालायची. असं म्हनतेत की लोकं जाहिरात बघायसाठी टीव्ही बघायचे. बघा कशी आसल मग जाहिरात. पण दूरदर्शन ने मात्र तिचं प्रसारण केलं नाही. तिच्यावर बंदी आणली. तरीही इतर चॅनेलमार्फत ती लोकांपर्यंत आलीच..

तर असं हाय १९९० च्या काळात जन्मलेलं कामसूत्र कंडोम प्रकरण…

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.