मातीची घरं बनवायची जुनी पद्धत वापरून दोघी मैत्रिणींनी सक्सेसफुल आर्किटेक्चरचं उदाहरण मांडलय

भारत आपल्या जुन्या आणि पारंपरिक गोष्टींसाठी अख्ख्या जगात फेमस आहे. त्यातलीच एक ओळख इथली वास्तुकला. म्हणजे प्राचीन काळातली घरं, मंदिर, लेण्या, त्यांच्यावर असलेलं कोरीव काम हे  त्यांचं उदाहरणं आणि यांच वैशिष्टय म्हणजे फक्त माती आणि दगड. ज्यांच्या वापर करून बांधलेल्या अनेक वास्तू आजही जैसे थे… अवस्थेत आहेत.  या आपल्या वास्तुकलेवर बाहेरच्या देशात पार अभ्यास सुद्धा सुरु आहे.

पण दुसरीकडे आपणच आपली वास्तुकला सोडून बाकीच्या गोष्टींचं अनुकरण करण्याच्या मागे लागलोय. म्हणजे सिमेंट काँक्रीटची घरं, जी मजबुतीचा वादा करतात. पण याच बांधकामाच्या क्षेत्रात आजच्या काळातल्या दोन मैत्रिणी आपल्या जुन्या पद्धतीचा वापर करून वास्तुकला तर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तर करत आहेतच, पण यासोबत आर्किटेक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करत पुढच्या पिढीला सुद्धा त्याचं शिक्षण देतायेत. 

रोजी पॉल आणि श्रीदेवी चंगाली बंगळुरूमधल्या या दोघी मैत्रिणी. श्रीदेवीनं युकेच्या यॉर्क युनिव्हर्सिटीमधून आर्किटेक्चर क्षेत्रात मास्टर्स पूर्ण केलेलं. २०१० साली पुद्दुचेरीच्या ऑरोविले अर्थ इन्स्टिट्यूटमध्ये या दोघींनी ट्रेनिंग घेतली आणि इथूनच त्यांना पारंपरिक वास्तुकलेबद्दल आवड निर्माण झाली. त्यामुळे २०१३ साली त्यांनी मिळून काम करण्याचा निर्णय घेतला आणि मेसन्स इंकची स्थापना केली. 

 मेसन्स इंकचा उद्देश आपल्या जुन्या वास्तू पद्धतीला प्रोत्साहन देणं तर होता, पण यासोबतच सामान्य लोकांमध्ये सुद्धा या जुन्या वास्तुकलेबद्दल जागरूकता निर्माण करायची होती. ज्यासाठी त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला या वास्तुकलेशी जोडण्यासाठी अनेक फ्री वर्कशॉप आणि एक्सिबिशन सुद्धा घेतलेत. ज्याअंतर्गत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि आर्किटेक्चर्सना ट्रेनिंग देण्यात आलीये. 

एका मुलाखतीत बोलताना रोझी सांगते कि, कंपनी जेव्हा सुरु केली तेव्हा पहिला प्रोजेक्ट एका ऑरगॅनिक फार्मचा मिळाला होता, जे कस्टमरच्या मागणीनुसार पारंपरिक पद्धतीने तयार करायचं होत. आता ऑरगॅनिक फार्म म्हंटल्यावर रोझी आणि श्रीदेवी यांनी यासाठी स्पेशली मातीचा वापर केला. पहिलाच प्रोजेक्ट होता त्यामुळं फारशी कल्पना नव्हती, पण बाकी आर्किटेक्चरची मदत घेऊन ते पहिलं काम पूर्ण केलं. 

त्यांच्या या कामाची वाहवाह झाली त्यांना एकामागून एक अनेक छोटेमोठे प्रोजेक्ट मिळत गेले. मेसन्स टीमने  मिळून आत्तापर्यंत ४० पेक्षा जास्त इमारतींचं काम केलंय.  पण महत्वाची गोष्ट म्हणजे यात स्थानिक संसाधन म्हणजे  माती आणि दगडांचा वापर करण्यात आलाय, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यासाठी मदत झाली. या वास्तूंची खास गोष्ट म्हणजे ही सगळी पर्यावरणाच्या दृष्टीनं बनवण्यात आलीत.

रोझी आणि श्रीदेवी यांच्या कामाचं उत्तम उदाहरण म्हणजे केरळातल्या कोच्ची भागात असलेलं द कोर्टयार्ड. केरळी पारंपरिक लूक असलेली ही वास्तू पहिली तर  कोणालाही वाटणार नाही कि ती मातीपासून बनवण्यात आलीये. 

ही एक वर्कस्पेस आहे, ज्यात दोन प्रकारच्या माती वापरण्यात आल्यात, एक म्हणजे सीएसईबी आणि रॅम्ड अर्थ. यात तिथल्याच काही लोकल लाकूड आणि दगडांचा सुद्धा वापर करण्यात आलाय. या सगळ्या कामात ऑक्साईड फ्लोरिंगचे अनेक शेड आहे. 

Woman Architects tbi

दुसरं एक उदाहरण म्हणजे बंगळुरूमधल्या चंदापुरमधलं यश फार्म. तुम्ही नुसत्या नावानं जरी सर्च केलं तरी आपल्याला त्याचे फोटो पाहायला मिळतील. हे एक ऑरगॅनिक फार्म आहे. हा प्रोजेक्ट सोलर पॅसिव्ह टेक्निकचा वापर करून बनवण्यात आलंय.  ज्यामुळे ऊर्जेची गरज कमी होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट मॅनेजमेंट, बायोगॅस, सोलर एनर्जी  अशा अनेक सुविधा यात देण्यात आल्यात. 

रोझी आणि श्रीदेवी यांनी आपली बांधकामाची जुनी पद्धत पुढच्या पिढीला समजावी म्हणून प्रत्येक प्रोजक्टच्या वेळे आर्किटेक्चरचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना, बाकीच्या आर्किटेक्चर्सना स्वतः सोबत काम करायची संधी दिलीये. म्हणजे काम सुरु असताना अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीये. जेणेकरून आपली ही भारतीय वास्तुकला पुढेही जिवंत राहील. आपल्या या कामासाठी रोझी आणि श्रीदेवी यांना अनेक बड्या प्लॅटफॉर्मवर सन्मानित सुद्धा करण्यात आलंय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.