भारतातला सर्वात बहुचर्चित सिनेमा रिलीज होत होता आणि प्रोड्युसरला कोणी तरी किडनॅप केलं

२२ सप्टेंबर १९८२ सायंकाळचे साडेचार वाजले असतील .

बॉलिवुडला अपने पराये, बैराग, कमांडो, समुंदर, विरासत असे एका पेक्षा एक हिट सिनेमे देणारे निर्माते मुशीर आलम त्यांच्या वरळी ऑफिस एम.आर. प्रॉडक्शन मधून बाहेर पडले. ते त्यांच्या पांढऱ्या कलरच्या फिएट गाडीने एका मिटींगसाठी दक्षिण मुंबईला निघाले होते. ते ऑफिसपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या अ‍ॅनी बेसेंट रोडजवळ पोहोचले. एवढ्यात एक पांढऱ्या रंगाची एम्बेसीडर गाडी वेगाने येऊन मुशीर आलम यांच्या गाडीच्या आडवी थांबली. एम्बेसीडर मधून तिघेजण उतरले.

या तिघांनी मुशीर आलम यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढलं. आणि एम्बेसीडरमध्ये बसवलं. मुशीर आलम यांच्या डोळ्यावर पांढरी पट्टी बांधण्यात आली. एका प्रसिध्द चित्रपट निर्मात्याला मुंबईतील गर्दीच्या ठिकाणावरुन किडनॅप करण्यात आल होत.

धक्कादायक गोष्ट ही कि पुढच्या दोनच दिवसात मुशीर आलम यांच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला बच्चन आणि दिलीप कुमार सारखी तगडी स्टारकास्ट असणारा बहूचर्चित शक्ती हा सिनेमा रिलीज होणार होता.

मुशीर यांचं धाबं दणाणलं. आयुष्यभराची मेहनत घेऊन हा सिनेमा बनवलेला. सुपरस्टार अमिताभ आणि दिलीपकुमार पहिल्यांदाच एका पडद्यावर झळकत होते. शोले बनवणारे रमेश सिप्पी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते. या सगळ्यांना एकत्र आणण्याचा चमत्कार मुशीर आलम यांनी घडवून आणला होता. ही संधी पुन्हा पुन्हा येणार नव्हती. सिनेपंडित आधीच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार याची भविष्यवाणी करत होते.

एवढं सगळं चांगलं घडत होतं आणि सिनेमाचा प्रोड्युसर थेट किडनॅप झाला होता. 

मुशीर यांच्या डोळ्याला पट्टी बांधल्यामुळे कोठून, कुठे घेऊन जात आहेत. हे बघण्याचा मुशीर यांनी प्रयत्न केला. त्यांना फक्त ‘शोले’ चित्रपटाचे पोस्टर दिसल होत. तिथून थोड पुढ गेल्यानंतर त्यांना लहान मुलांचा आवाज ऐकु येत होता. जिन्यावरुन चढताना पायऱ्या आल्यावर किडनॅपर मुशीर यांना सूचना करत होते. काहीवेळ चालल्यानंतर ते एका खोलीत पोहचले. या खोलीत त्यांना मारहाण करुन धमकी देण्यात आली.

अमीरजाने मुशीर यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली.

पैशांची व्यवस्था करण्यासाठी मला माझा मेहुना मोहम्मद रियाजला फोन करावा लागेल अस मुशीर यांनी त्या गुंडांना सांगितल. मुशीर यांनी रियाज मोहम्मद यांना फोन करुन आपल्या जवळ जेवढी रोख रक्कम असेल तेवढी एकत्र करुन ठेव. रियाज मोहम्मद यांनी एकत्र केलेली रक्कम २ लाख ८० हजार एवढी झाली. रियाज यांना रक्कम देण्याची एक ठिकाण सांगण्यात आले.

रात्री ९ वाजता रक्कम घेऊन रियाज यांच्यासोबत हरीश सुगंध गेले. हि रक्कम त्यांनी त्या गुंडांना दिली. त्यानंतर त्या गुंडांनी निर्माते मुशीर यांना सोडलं.

मुशीर आलम घरी पोहचले.

२४ सप्टेंबर १९८२ चा दिवस उजाडला. मुशीर आलम, दिलीप कुमार आणि रियाज यांनी सरळ मुंबई पोलिस मुख्यालय गाठलं. मुशीर आलम यांनी सगळी घटना पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांना सांगितली.

रिबेरो यांनी या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर झेंडे यांच्याकडे दिला. या घटनेच्या तपास पथकात इशाक बागवान यांचाही समावेश होता. मुशीर आलम यांना इशाक बागवान यांनी काही प्रश्न विचारले. मुशीर आलम यांनी संपूर्ण घटनाक्रम इशाक बागवान यांना सांगितला. रस्त्यात लागलेलं ‘शोले’ चित्रपटाच मोठ पोस्टर यानंतर १० मिनिटांत आलेली खोली याची सर्व माहिती त्यांनी इशाक बागवान यांना दिली.

त्यावेळी इशाक बागवान यांचे मुंबईत सगळ्या ठिकाणी खबरे होते. त्यांनी त्यांच्या एका खबऱ्याकडून या भागाची माहिती मागवली. मुशीर आलम यांना मुंबईतील कामाठीपुरातील कादर बिल्डिंग मधील एका खोलीत ठेवले होते, अशी माहिती त्या खबऱ्याने इशाक बागवान यांना दिली.

इशाक बागवान आपल्या टीमसह त्याठिकाणी पोहचले. तर सलीम नावाच्या एका मुला व्यतिरिक्त तिथे कोणही नव्हत. सलीम हा अमीरजादा आणि आमलजेब च्या कादर बिल्डिंगच्या ऑफिसची सफाईच काम करत होता. पण त्या दोघांविषयी मला काही माहिती नाही पण हि माहिती तुम्हाला आलमबेज चे वडिल देतील अस सलिमने पोलिसांना सांगितलं. लगेच पोलिसांनी आलमजेबच्या वडिलांची चौकशी केली.

अमीरजादा आणि आलमजेब अहमदाबाद मध्ये असल्याचे आलमजेबच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

इशाक बागवान यांनी पोलिसांची एक टीम अहमदाबादला पाठवली. तिथुन आरोपींना ताब्यात घेण्यात आल. मुशीर आलम यांना किडनॅप करणाऱ्या आरोपींना पकडण्यात आलं. पोलिस अधिकारी इशाक बागवान यांनी वडाळा कॉलेजमध्ये गँगस्टर मन्या सुर्वे चा एन्काउंटर केला होता. शुट आउट अ‍ॅट वडाळा या चित्रपटात पोलिस अधिकारी इशाक बागवान यांची भूमीका अनिल कपूर यांनी केली आहे.

दरम्यानच्या काळात शक्ती सिनेमा रिलीज झाला. अमिताभ आणि दिलीप कुमारची जुगलबंदी संपूर्ण भारतभरात प्रचंड गाजली. परत ते कधीच एका स्क्रीनवर झळकले नाहीत. मुशीर आलम यांनी मात्र  तुफान पैसे छापला. पुन्हा त्यांचा कोणताही सिनेमा एवढा मोठा सुपरहिट झाला नाही. आज मुशीर आलम हयात नाहीत पण

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.