स्वतःच्याचं एका पुस्तकामुळं ती आजही आपल्या देशात जाऊ शकत नाहीये

तस्लिमा नसरीन.

बांगलादेशाची एक सुप्रसिद्ध लेखिका. जिने आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिलीत, कविता लिहिल्या. आपल्या लेखणीमुळं तिला फेम तर मिळालचं पण याच लेखणीमूळ तिच्या देशाची दार तिच्यासाठी कायमची बंद झालीत.

जगात वादग्रस्त लेखिका म्हणूनही तिची ओळख कायम आहे

तस्लिमा मूळची बांग्लादेशातल्या मयमनसिंह शहरातली. १९८६ साली तीन डॉक्टरची पदवी घेतली. शाळेत असल्यापासूनचं कविता लिहिण्याच्या छंद लागला.

१९७० च्या दशकात कवयित्री म्हणून उदयास आलेली तस्लिमा १९९०  च्या सुरुवातीला खूप प्रसिद्ध झाली. ती आपल्या बेधडक स्त्रीवादी विचारामूळं. प्रकाशन, व्याख्याने आणि प्रचाराद्वारे विचार स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचे ती समर्थन करते.

एका पूस्तकामूळं सोडावा लागला देश

१९९३ चं ते सालं. आपल्या साहित्यात आणखी एक भर म्हणून तिनं ‘लज्जा’ हे पुस्तक लिहिलं.

नसरीनने “भारतीय लोकांना” हे पुस्तक समर्पित केले आणि “धर्माचे दुसरे नाव मानवतावाद असू द्या” अशा शब्दांनी मजकुराची सुरुवात केली.

डिसेंबर १९९२ ला भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर लगेचच बांगलादेशच्या काही भागांत उफाळलेल्या हिंदूविरोधी दंगलींना विरोध करणारं  लज्जा हे पुस्तक होत. ज्यात सूचित केलं की, जातीय भावना वाढत होत्या, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर दबाव आणला जातं होता.

या पुस्तकाची काहीशी अशी …

भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या नगरीत ६ डिसेंबर १९९२  रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली.  या विध्वंसाचे परिणाम बांगलादेशातही दिसून आले. तिथे जातीय दंगलीची आग भडकते आणि तिथल्या हिंदू कुटुंबाला जातीय द्वेषाला सामोरे जावे लागते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे  याविषयी स्वतंत्र विचार होते.

कुटुंब प्रमुखाला वाटते की, बांगलादेश त्याची मातृभूमी त्याला कधीही निराश करू देणार नाही.  एक विश्वासू पत्नी म्हणून किरणमयी तिच्या पतीच्या मतांच्या बाजूने उभी आहे.

त्यांचा मुलगा सुरंजनचा असा विश्वास आहे की, जातीयवादापेक्षा राष्ट्रवाद अधिक मजबूत असेल पण तो हळूहळू निराश होतो.  तो स्वत: ला जातीय प्रतिक्रियांचा अवलंब करताना दिसतो जो देशभक्तीच्या विचारसरणीशी पूर्णपणे विरोधाभास करतो ज्यावर तो नेहमीच विश्वास ठेवतो. तर निलांजना आपल्या भावाला त्यांच्या कुटुंबाला सुरक्षिततेसाठी मुस्लिम मित्राच्या घरी नेण्यास भाग पाडते.

ही एक वेगाने बदलत जाणारी कथा आहे, ज्यात काही घटनांमुळे हिंसा आणि असंतोष निर्माण होतो.

तिच्या ‘लज्जा’ या पुस्तकावर भारतात चित्रपटही बनलाय

तस्लिमाच्या याचं पूस्तकामूळे बांगलादेशातील मुस्लिम कट्टरपंथ्यांनी तिच्याविरूद्ध फतवा जारी केला. त्यानंतर १९९३ साली जीव वाचवण्यासाठी लेखिकेला आपला देश सोडून भारतात यावं लागलं.

भारतात ती पश्चिम बंगालमध्ये राहिली, मात्र तिथंही काही कट्टरपंथ्यांनी तिच्याविरूद्ध फतवा जारी केला.

यानंतर ती काही दिवस दिल्लीत राहिली, मग यूरोपात राहिली. तिच्याकडे स्वीडनचं नागरिकत्व आहे. दरम्यान ती प्रत्येक वेळी आपला वीजा  वाढवून भारतात राहते.

तस्लिमा २००४ पासून भारतात राहतेय. भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी तिने बरेच प्रयत्नही केलेत, पण अजूनही तिचे प्रयत्न सूरूचं आहेत.

इस्लामवर भाष्य केल्यामुळे तिच्यावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न झाले. स्त्रीवादी चळवळीशीही संबंधित तस्लीमाला भारतातील प्रत्येक क्षेत्रात महिलांचा भक्कम सहभाग हवा आहे.

आपल्या मुलाखतींमध्ये, ती बऱ्याच वेळा तिच्या देशात,  बांगलादेशला परत जाण्याबद्दल बोलते, पण जिवाला धोका असल्यामूळे ती तिथे जाऊ शकत नाही.

लेखिका सतत पळतेय, पण मृत्यूचे फतवे तिचा पाठलाग करतचं  आहे.

ते काहीही असलं तरी लेखिका तस्लिमा आपणं म्हणणं मांडतचं असते, कागदावर तर लिहितेच, पण बदलत्या काळानुसार सोशल मीडियावरही ती कट्टरपंथीयांविरूद्ध आवाज उठवत असते. जगभरातल्या घडामोडींवर तिची मत अनेकदा नवा वाद निर्माण करतात.

ज्याची इस्लामिक कट्टरपंथीयांकडून टीका तर होतेचं, पण बरेच जण उघडपणे तिला समर्थन करताना दिसतात.

हे ही वाचं भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.