कोळश्याचा तुटवडा सुरूय हे ऐकून भारतातला एकच माणूस लैच खुश झाला असेल..

गेल्या काही दिवसांपासून देशात कोळसा टंचाईचं संकट निर्माण झालंय. वीज पुरवठ्याबाबतीत देश मोठ्या संकटात जाऊ शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. साहजिकच तुम्ही आम्ही सगळेच जण टेन्शन मध्ये आलोय. की आता लाइटी गेल्या तर कस करायचं.

पण तुम्हाला म्हणून सांगतो, कोळश्याचा तुटवडा सुरूय हे ऐकून भारतातला एकच माणूस लैच खुश झाला असणारे.

व्हय तर..लैच खुश असणारे तो भिडू.. कारण त्याचे इन्व्हर्टर खपणार आहेत. म्हणजे कसाय ना लाईटीची आपल्याला इतकी सवय झालीय कि ती जाऊन चालत नसतंय. मग आपण इन्व्हर्टर खरेदी करणार. मग त्या भिडूचा फायदा म्हणल्यावर ते बी खुश आणि आपल्याकडं बाबा लाईट आहे म्हणून आपुन बी खुश.

पण हे इन्व्हर्टर भारतात तयार करणं आणि खपवणं साधी गोष्ट नव्हती. पण ‘लुमिनस’ मल्होत्रांनी ते करून दाखवलंय. त्यांचीच ही गोष्ट.

राकेश मल्होत्रा असं त्यांचं नाव.

राकेश मल्होत्रांचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर. त्यामुळं वडीलांसोबत फिरतीवर असणाऱ्या राकेश यांचं शिक्षण दिल्ली आणि पंजाबच्या पट्ट्यात झालं. बिजनेस हा काही त्यांचा पारंपरिक उद्योग किंवा मग रक्तातच नव्हता ओ. मग झालं, मध्यमवर्गीय बापानं सरळ इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं पोराचं.

पश्चिम बंगालच्या जादवपूर युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनचा आपला कोर्स पूर्ण केला. आणि पुढं कॅम्पस सिलेक्शन होऊन टाटा ग्रुपच्या नेल्कोमध्ये ते नोकरीला लागले.  घेतलं.

पुढं टाटा मध्ये मिळालेला आपला अनुभव अजून वाढावा म्हणून Mitsui आणि Siemens या दोन्ही कंपन्यांमध्ये काम केलं. एव्हाना राकेश मल्होत्रांचं वय २६ झालं होत. आता या वयात पोरांना लग्नाची स्वप्न पडू लागतात. पण राकेश साहेब काही औरच होते. त्यांना स्वप्न पडायची व्यवसाय करायची.

अशातच १९८८ साल उजाडलं. खिशात चाळीस हजार आणि हातात इंजिनीयरिंगची डिग्री आणि अंगावर आहे त्या कपड्यानिशी राकेश साहेबांनी ठरवलं काहीतरी भन्नाट करायचं. काय करायचं, कुठं जायचं, कशाचा शोध लावायचा, काही काही माहित नाही. डोक्यात फक्त इतकंच की काहीतरी करायचंय.

आता त्यांच्या या भन्नाट कल्पनेला जोड होती ती म्हणजे चांगली वेळ, नशीब आणि डेडिकेशन यांची.

आता चाळीस हजार रक्कम कमी पडू शकते म्हणून मल्होत्रांनी आपल्या लहानपणीच्या दोस्तांना पण आपल्या कल्पनेत भागीदार करून घ्यायचं ठरवलं. नवनीत कपूर आणि सुनील भल्ला अशी या चड्डीबड्डी ची नावं.

या तिघांनी ठरवलं की सारखी लाईट जाते तर आपण लोकांना लाईटचा बॅकअप देऊया. आणि यातून पुढं आली इन्व्हर्टरची कल्पना. पोरांनी जाम मेहनत केली आणि त्यातून उभं राहिलं ल्युमिनस इन्व्हर्टर.

पुढं लोक ल्युमिनस इन्व्हर्टरच्या प्रेमात पडली. कारण एकदम स्वस्त आणि मस्त असा लाईट बॅकअप देणारा पर्याय कोणाला नको असणार आहे. अर्थात सगळ्यांनाच पाहिजे असणार.

कंपनी एवढ्या झटझट वाढायला लागली की, प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स या कंपनीत इन्व्हेस्ट करायला यायला लागले. CLSA कॅपिटलने ल्युमिनस मध्ये तब्बल ८३ कोटी इन्व्हेस्ट केले. त्यानंतर बरेच इन्व्हेस्टर्स आले पण राकेश मल्होत्रांचं एकच ध्येय आणि ब्रीद राहील ते म्हणजे कंपनी वाढली पाहिजे, टिकली पाहिजे.

बघा बरं आता इतक्या दूरदृष्टीने सुरु केलेली ल्युमिनस आता कुठल्या कुठं जाऊन पोहोचली आहे ते. असं डेडिकेशन पाहिजे बघा. आज ल्युमिनस अशा स्टेजवर आहे कि आमची बत्ती झाली गुल आणि ल्युमिनसचं मीटर झालं सुरु.

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.