चीनला फाईट देण्यासाठी टाटा आता या क्षेत्रात तयारीने उतरतंय

टाटा ग्रुप देशातल्या सर्वात यशस्वी उद्योगांपैकी एक. जे सतत नवनवीन क्षेत्रात उतरत असतात.  ऑटोमोबाईल, विमान, इन्शोरन्स, स्टील, केमिकल अश्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आज टाटा ग्रुपने आपली ओळख निर्माण केलीये. गेल्या महिन्यातच या कंपनीने टेलिकॉम सेक्टरमध्ये पाऊल टाकले होते. देशात ५ जी नेटवर्क जोडलेली डिव्हाईस तयार करण्यासाठी टाटाने एरटेलशी हात मिळवला होता.

आता हा टाटा समूह  सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये उतरण्याची योजना आखतंय. भारताच्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोविड -१९ महामारीमुळे चिप्स आणि सेमीकंडक्टरची निर्माण झालेली जागतिक कमतरता पाहता टाटा समूहाने हे पाऊल उचललंय. 

चीनला फाईट देण्यासाठी सेमीकंडक्टर सेक्टरमध्ये उतरण्याची तयारी

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, ‘टाटा समूह सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये एन्ट्री  करण्याच्या विचारात आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. टाटा समूहाने या मार्केटमध्ये मोठा हिस्सा मिळवण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत.

चंद्रशेखरन पुढे  म्हणाले की,

‘सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणूकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. त्यात कोरोना महामारी आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशांवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जगातील दुसरे सर्वात मोठे केंद्र बनण्याची चांगली संधी आहे.

आता सेमीकंडक्टर म्हणजे  काय तर, या सिलिकॉन चिप्स आहेत. ज्या गाड्या, कम्प्युटर आणि सेल फोन पासून इतर अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरले जातात. हे कंट्रोल आणि मेमरी फंक्शनशी संबंधित काम अधिक चांगल्या प्रकारे करते. अलीकडच्या काळात, ऑटोमोबाईल उद्योगात सेमीकंडक्टर्सचा वापर जगभरात वाढला आहे, कारण नवीन मॉडेल्स ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि हायब्रिड-इलेक्ट्रिक सिस्टीम सारख्या इलेक्ट्रॉनिक फीचरने सुसज्ज आहेत.

टाटा ग्रुप सेमीकंडक्टरमध्ये का उत्तरतंय?

सध्या, सगळ्या जगाला चिप्स आणि सेमीकंडक्टर्सची कमतरता भासतेय, जे नवीन टेक्निकल प्रॉडक्टसोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी देखील आवश्यक आहे. आता या चिपच्या कमतरतेमुळे जगातील अनेक कार उत्पादकांनी त्यांच्या गाड्यांच्या डिलिव्हरीला उशीर केलाय आणि नवीन गाड्यांच्या लॉंचिंगला देखील पुढं ढकललंय.

टाटा मोटर्सच्या यूके-आधारित युनिट जॅग्वार-लँड रोव्हरनेही आपल्या गाड्यांची लॉन्चिंग थांबवलीये. 

या सगळ्या कारणामुळेच टाटा ग्रुपने चिप बनवण्याच्या दिशेने धाव घेतलीये. ज्यामुळे फायदा असा होईल कि, केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ग्राहक मिळू शकतील.

दरम्यान, चिप्स किंवा सेमीकंडक्टर्स, जे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीच ब्रेन सेंटर आहे. पण कोविडनंतरच्या काळात त्याच उत्पादन कमी झालं आणि ते एक दुर्मिळ वस्तू बनलं.  दक्षिण कोरिया आणि तैवान सारख्या ठिकाणी अनेक मोठे कारखाने बंद आहेत. तर दुसरकडे, महामारीनंतर  स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कम्युटरची मागणी ,मोठ्या प्रमाणात वाढलीये.

गेल्या वर्षी सुरू झालेली ही कमतरता २०२२ पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे आणि भविष्यातील अशा परिस्थितीला रोखण्यासाठी अनेक कंपन्या संपूर्ण जगाला पुरवठा करणाऱ्या काही मोठ्या कारखान्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचारात आहेत. त्यातच टाटा मोटर्स  या भारतीय कंपनीने यात उडी घेण्याची तयारी केलीये. 

सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अमेरिकेचं वर्चस्व

सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अमेरिकेचा दबदबा आहे. एका आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये ग्लोबल सेमीकंडक्टर मार्केटमध्ये अमेरिकेचा वाटा ४७ टक्के होता. दक्षिण कोरिया १९ टक्के शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर जपानचा १०-१० टक्के वाटा आहे आणि युरोपियन युनियन चौथ्या क्रमांकावर आहे. तैवान ६ टक्के शेअरसह तिसऱ्या तर चीन ५ टक्के सह चौथ्या क्रमांकावर आहे. तर इतर देशांचा हिस्सा 3 टक्के आहे.

टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा डिजिटल ग्राहकांसाठी विविध प्लॅटफॉर्म तयार करत आहे. यात रिटेल, ट्रॅव्हल, आर्थिक सेवा, आरोग्य आणि शिक्षण यांचा समावेश आहे. ते म्हणाले की, आम्ही सतत खरेदी केल्या जाणाऱ्या उत्पादनांसोबत आवश्यक नसलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करीत आहोत. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड आणि डेटाचा वेगाने अवलंब करण्याची गरज आहे आणि टाटा समूह त्यास प्रमुख प्राधान्य म्हणून विचार करीत आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.