समीर कालिया दहशतवादी असेल असं त्याच्या शेजाऱ्यांना देखील कधी वाटलं नाही..

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने १४ सप्टेंबरला दहशतवाद्यांचा मोठा प्लॅन उधळून लावला. पाकिस्तान समर्थित मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करताना पोलिसांच्या या स्पेशल सेलने पाकिस्तान प्रशिक्षित दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक केली. माहितीनुसार येणाऱ्या सणासुदीच्या काळात वेगेवगेळ्या राज्यांमध्ये हे दहशतवादी ऑपरेशन चालवणार होते.

या सगळ्या दहशतवाद्यांना दिल्ली, युपी आणि महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीये. ज्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि हत्यारं जप्त करण्यात आलीये. माहितीनुसार अटक केलेल्या दहशतवाद्यांना दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या सांगण्यावरून नवरात्री आणि रामलीला दरम्यान सीरियल ब्लास्ट करायचा प्लॅन होता.

या ६ जणांपैकी एक दहशतवादी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया मुंबईच्या सायन- धारावी भागातला रहिवासी आहे.  मुंबई पोलीस  त्याच्या कुटुंबीयांची आणि परिसरातील लोकांची कसून चौकशी करत आहे.  कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार समीर कालिया १२ सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता. ज्यानंतर थेट त्याच्या इतकेच बातमी मिळाली.

दिल्ली गुन्हे शाखेच्या माहितीनुसार  १४ तारखेला त्याला शेखला कोटा येथून मुंबईतून दिल्लीकडे जाताना एका ट्रेनमध्ये अटक करण्यात आली.

समीरच्या पत्नीने महाराष्ट्र एटीएस टीमला सांगितले कि, समीर दहशतवादी आहे हे समजल्यानंतर आम्हा सगळयांनाच धक्का बसला.  तिला समीर दहशतवादी असल्याचा कधीच संशय आला नाही. तर आसपासच्या लोकांनी सांगितले कि, तो एक फॅमिली मॅन आहे. तो कधी कोणाशी मोठ्या आवाजात सुद्धा बोलत नाही.

समीरचे कुटुंब मुंबई सेंट्रलच्या सायन परिसरातील एमजी रोडवरील कालाबाखर परिसरातील झोपडपट्टीत राहतं. त्याला दोन मुली आहेत. तो कमी शिकलेला असल्यानं कार ड्रायव्हर म्हणून काम करायचा. कधी तो टूर ट्रॅव्हल कार, कंपनीची गाडी तर कधी टॅक्सी चालवत असायचा. तो अंडरवर्ल्डचा  ऑपरेटिव्ह होता.

दरम्यान, आरोपी जान मोहम्मद अर्थात समीरविरुद्ध २००१ मध्ये मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांचे एक पथक गुन्ह्याचे सर्व रेकॉर्ड तपासत आहे.

कुटुंबासह पोलिसांनी त्यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली आहे. समीर दहशतवादी असल्याने जवळजवळ प्रत्येकाने आश्चर्य व्यक्त केलेयं. या प्रकरणात रात्री मुंबईच्या इतर काही भागातही छापे टाकण्यात आले आहेत. पोलीस त्याच्या इतर संपर्काबद्दल चौकशी करतंय.

माहितीनुसार, समीर हा प्रशिक्षित दहशतवादी नव्हता, तो शस्त्रे आणि स्फोटके सप्लाय करण्याचं काम करायचा. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमने समीरला भारतातील विविध घटकांना आयईडी, शस्त्रे आणि ग्रेनेड पोहोचवण्याची जबाबदारी दिली होती. तपास संस्थेच्या मते, अनीसने येत्या सणासुदीच्या काळात दिल्ली, यूपी, महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांमध्ये हत्या आणि स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया, ओसामा उर्फ ​​सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ​​’साजू’ उर्फ ​​लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली गेलीये. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा धमाका करण्याची योजना आखत होते.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संगितले कि, अटक केलेल्यांपैकी ओसामा उर्फ ​​सामी आणि जीशान कमर यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतले होते. हे दोघे पहिल्यांदा विमानाने मस्कटला गेले आणि नंतर समुद्रमार्गे पाकिस्तानातील ग्वादर बंदरात गेले. त्यांना शस्त्रांचा वापर आणि स्फोटके बनवण्यासाठी पाकिस्तानमध्ये १५ दिवस प्रशिक्षण देण्यात आले, त्यानंतर हे दोघेही त्याचं मार्गाने भारतात परतले. भारतात परतल्यावर त्यांना आयईडी लावण्यासाठी दिल्ली आणि यूपीच्या विविध ठिकाणी रेकीचे काम देण्यात आले.

सध्या अटक केलेल्या या ६ जणांपैकी ४ दहशतवाद्यांना मंगळवारी रात्री न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर चौघांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दिल्ली पोलिसांचे पथक आज दुपारी २ जणांना न्यायालयात हजर करणार आहे.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.