थेट घरपोच मटण मासे पुरवून कंपनी वर्षाला ४२० कोटींचा गल्ला करतेय

काळ्या रस्श्यातलं झणझणीत मटण, थोडी ग्रेव्ही आणि थोडा रस्सा असणारं चिकन, मसाला लावून तव्यावर फ्राय केलेले मासे आणि तब्येतीला चांगलं असतंय म्हणून रोज सकाळी उठून उकडून खाल्लेली अंडी असा हा तोंडाला पाणी आणणारा नॉनव्हेजिटेरियन लोकांचा भरपेट आहार. आता आमच्या घरातलं सांगायचं झालं तर नॉनव्हेज केल्यावर सगळी नुसती तुटून पडतात, पण हेच नॉनव्हेज मार्केट मध्ये जाणून आणायचं म्हणलं कि, सगळ्यांची नाक तोंड मुरडलेली. 

कारण, संध्याकाळच्या टायमाला मिळतंय का नाही या विचारानं धावतपळत त्या मार्केटमध्ये जायचं, कितीही भारीतला मास्क वापरा नाहीतर २-३ रुमाल बांधा येणारा वास काही जायचा नाही, त्यात आपला नंबर येईपर्यंत त्या दुकानदारांना मस्का मारत बसायचं, बरं एवढं होऊन घरी आणल्यावर ते परत धुवायची झंझट. त्यामुळं खायची वासना तिथंच संपते.

पण अर्ध्या -निम्म्या भारतीयांचं हेचं दुःख समजून घेतलं विवेक गुप्ता आणि अभय हंजूरा या दोघां दोस्तांनी, ज्यांनी लिशिअस हा नॉनव्हेजचा D2C स्टार्टअप लॉन्च केला. ज्यामुळे आज घरबसल्या नुसत्या क्लिकवर पाहिजे ते आणि पाहिजे तितकं फ्रेश नॉनव्हेज आपल्या दारापर्यंत येऊन मिळतंय.

जम्मू काश्मीरचा असलेला अभय हंजूरा आणि चंदीगडचा असणारा विवेक गुप्ता. दोघांनी कित्येक मोठंमोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर आणि चांगल्या पगाराची नोकरी केली. आपापल्या कंपनीत काम करता असतानाचं कामानिमित्तानं या दोघांनी ओळख झाली. दोघे नॉनव्हेजचे मोठे फॅन.

असचं एकदा बोलताना विषय अभयनं विषय काढला कि, भारत नॉनव्हेजच मोठं मार्केट आहे, ज्यात करोडोंची उलाढाल होते. पण ९० टक्के मार्केट हे ऑफलाईनचं काम करत आणि या सेक्टरमध्ये कोणता असा मोठा ब्रँड सुद्धा नाहीये.

तेव्हाचं अभयनं विवेकला सुचवलं की, या मार्केटमध्ये आपण एन्ट्री मारायची आणि वेगळी सर्व्हिस सुरु करायची. म्हणजे आपला एक ऑनलाईन स्टार्टअप सुरु करायचा, ज्यात चांगल्या क्वालिटीचं नॉनव्हेज फूड लोकांना आपल्या ब्रँडखाली डिलिव्हर करायचं. अभयला विवेकची ही आयडिया पटली.

पण त्यांच्या घरच्यांना चांगल्या पगाराची नोकरी सोडून हे स्टार्टअप करणं काही पटलं नव्हतं. यामुळं  दोघांनी आपापली नोकरी सुरूचं ठेवली आणि आपल्या सेविंगने २०१५ साली बंगळुरूमध्ये आपला ऑनलाईन स्टार्टअप सुरु केला. 

आता कुठलाही स्टार्टअप सक्सेसफुल करायचा म्हंटल्यावर बाकीच्यांपेक्षा काहीतरी युनिक असणं गरजेचं होत. तसं आधीचं नॉनव्हेजच ऑफलाईन मार्केट मोठं होत, त्यात काही ऑनलाईन कंपन्यासुद्धा होत्या पण मुद्दा होता क्वालिटीचा, जे कोणीच देत नव्हतं. त्यामुळं अभय आणि विवेक यांनी क्वालिटी आणि हायजिन फॅक्टरवर काम करायला सुरुवात केली. 

 म्हणजे जे मटण चिकन ते प्रोव्हाइड करायचे, ते स्वच्छ करण्यासाठी लागणार पाण्याचे प्लांट त्यांनी स्वतः उभे केले, परत ते स्टोअर करण्याची लागणार बर्फ सुद्धा त्यानी स्वतःच्या प्लॅनमध्ये तयार करायला सुरुवात केली. म्हणजे सगळी सप्लाय चेन कंपनीने स्वतः उभी केली. 

त्यांनतर प्रश्न मोठा तो मार्केटिंगचा. तसं त्यांनी आपली सर्व्हिस तर सुरु केली होती, त्यात बाकी काही  कंपन्यांनी फंडिंग सुद्धा केली होती. त्यामुळे मार्केटिंगसाठी त्यांनी इव्हेन्ट, छोटे सेशन्स घ्यायला सुरुवात केली. त्यांची ही स्ट्रॅटेजी कामाला आली आणि जवळपास ७० टक्के कस्टमर त्यांचे या माऊथ पब्लिसिटीमुळेचं तयार झाले. त्यात कुठल्याही थर्ड पार्टीशिवाय डायरेक्ट कस्टमरपर्यंत प्रोडक्ट जात असल्यामुळं आपोआप कस्टमर वाढत गेले. 

लिशिअसने आता बंगळुरूमध्ये चांगलं मार्केट तयार केलं होत, त्यामुळे अभय आणि विवेकनं आपला बिजनेस वाढवायचा ठरवलं. आणि बंगळुरूनंतर हैद्राबाद, दिल्ली, एनसीआर, पुणे, मुंबई, चेन्नई अश्या कित्येक शहरांमध्ये आपल्या ब्रांच सुरु केल्या. या मधल्या काळात स्टार्टअपने युनिकोर्न क्लबमध्ये एन्ट्री केली होती आणि करोडो रुपयांचा फंड सुद्धा गोळा केला होता.

या सगळ्या गोष्टींमुळेचं ४ वर्षातच कंपनीने ३०० टक्केच्यावर ग्रोथ केली. गुडगाव आणि बंगळुरूमध्ये २ ऑफलाईन स्टोअर सुद्धा सुरु केले. कंपनीचे आज ५ प्रोसेसिंग सेंटर आहे. आणि ९० पेक्षा जास्त डिलिव्हरी सेंटर आहेत. तर ३५०० लोक आज कंपनीसोबत काम करत आहेत. आणि कंपनीचा टर्नओव्हर म्हणाल तर गेल्या वर्षी कंपनी ४२० कोटींच्यावर पोहोचली आहे. 

 हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.